जेंगु
जेंगू (बहुभाषिक मिएंगू, ज्याला बिसिमा देखील म्हणतात) हा कॅमेरूनमधील सवाबांतू गटांच्या पारंपारिक श्रद्धांमध्ये एक जल आत्मा आहे. सवाबांतू गटांमध्ये दुआला, बाकवेरी, मालिम्बा, सुबू, बाकोको आणि ओरोको लोक हे गट येतात . बाकवेरीमध्ये जेंगूला लिएंगू (बहुवचन: माएंगू ) हा शब्द वापरला जातो.[१] मिएंगू हे बाकोंगो अध्यात्मात बिसिम्बी (एकवचन: सिम्बी) आणि अनेक पश्चिम आणि मध्य आफ्रिकन संस्कृतींमध्ये उपस्थित असलेल्या मांबा मुंटूसारखेच आहे.
याचे वर्णन जलपरीसारखे आत्मे म्हणून केलेले आहे. ते नद्या आणि समुद्रात राहतात असे मानले जाते. त्यांची पूजा करणाऱ्यांचे भाग्य ते सुधारतात. ते रोग बरे करू शकतात. उपासक आणि आत्म्यांच्या जगात मध्यस्थ म्हणून काम करू शकतात. या कारणास्तव, दुआला लोकांमध्ये जेंगू पंथ फार पूर्वीपासून लोकप्रिय आहे. बकवेरीमध्ये, हा पंथ तरुण मुलीच्या स्त्रीत्वात प्रवेश करण्याच्या विधीचा एक महत्त्वाचा भाग आहे.[१]
जल आत्मा
[संपादन]दिसणे
[संपादन]प्रत्येक वांशिक गटानुसार मिएंगूचे (जेंगूचे) वर्णन थोड्याफार प्रमाणात बदलते. परंतु सामान्यतः त्यांना लांब केस आणि सुंदर दात असलेले सुंदर, जलपरीसारखे प्राणी म्हटले जाते.[१]
श्रद्धा
[संपादन]कॅमेरूनच्या किनाऱ्यावरील सवाबंटू भाषिक लोकांच्या पारंपारिक अध्यात्मात, जेंगू (बहुभाषिक मिएंगू) हा एक जल आत्मा असल्याचे मानले जाते. जो जिवंतांच्या भौतिक जगामध्ये आणि पूर्वजांच्या आध्यात्मिक जगात मध्यस्थ म्हणून काम करतो.[२] त्यांचा वास कॅमेरूनच्या महासागर, नद्या आणि तलावांमध्ये आहे असे म्हटले जाते.[३] काँगो धर्मातील सिम्बी प्रमाणेच, जेंगूला नैसर्गिक जगाचा संरक्षक म्हणून पाहिले जाते.[३] जो आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून काम करतो आणि मध्य आफ्रिकेच्या जलमार्गांमध्ये मानव किंवा मुंटू आणि प्राण्यांचे भवितव्य नियंत्रित करतो.[१][४]
जेंगूला नशिबाशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्यांचा आदर (प्रार्थना) करणाऱ्यांना ते सौभाग्य आणतात असे मानले जाते. परिणामी, सवाबंटू लोक मिएंगू आत्म्यांसाठी बळी देतात. त्यांच्या सन्मानार्थ भव्य उत्सव आयोजित करतात.[३] हे सण शासक कुटुंबांद्वारे निश्चित केले जातात. जे न्गोंडो नावाच्या राजकीय संस्थेचे सदस्य आहेत. हे न्गोंडो सदस्य घोषित करतात की जेंगू उत्सव कधी सुरू होईल. त्या दरम्यान जेंगू अध्यात्मवाद्यांकडून गावांमधून अर्पण गोळा केले जाते. काँगो संस्कृतीत बांगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सवाबंटू लोकांमध्ये जेंगू तज्ञ किंवा "पृथ्वी पुजारी" देखील असतात. जे मिएंगू समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी अचूक विधी शिकण्यासाठी व्यापक प्रशिक्षण घेतात.[३] सणांच्या आदल्या रात्री, हे तज्ञ वौरी नदीतील जेबाले बेटांवर एक पवित्र समारंभ आयोजित करतात. दुसऱ्या दिवशी, ते समुद्रकिनाऱ्यावर एका सार्वजनिक समारंभात न्गोंडोचे प्रमुख असलेल्या दुआला प्रमुखांना श्रद्धांजली वाहतात. न्गोंडो लोकांनी श्रद्धांजली पाहिल्यानंतर, एक जेंगू तज्ञ अर्पण खोल पाण्याखाली जातो आणि प्रमुखांच्या वतीने तो मिएंगूला गोष्टी अर्पण करतो.[३] तज्ञ नंतर मिएंगूकडून येणाऱ्या वर्षाबद्दल भविष्यसूचक संदेश घेऊन परत येतो आणि तिथे असलेल्या भाविकांमध्ये तो संदेश पसरवतो.[२][३]
जेंगू पंथ
[संपादन]दुआला आणि संबंधित गट जेंगू पंथाला खूप महत्त्व देतात. या पंथाची उत्पत्ती बहुतेक अफ्रिकेच्या पश्चिमेकडील लोकांपासून (इजो) झाली असावी. नंतर तेथून इतर लोकांपर्यंत पसरले गेले असावेत. ते नंतर अफ्रिकेच्या पूर्वेकडील भागात, बटांगा येथे, पोहोचले. सुरुवातीच्या काळात, जेंगू-पूजा चार वरदानांचा स्रोत म्हणून पाण्याच्या आत्म्यांवर केंद्रित होती: क्रेफिश, जगातील सर्वात ओल्या प्रदेशांपैकी एकामध्ये पावसाळ्याचा शेवट, पिरोग वंशांमध्ये विजय आणि रोगांच्या साथीपासून संरक्षण. दुआलामध्ये, सदस्यत्व मूळतः "मुक्त" (शुद्ध रक्ताच्या) दुआलासाठी राखीव होते, एक अशी अट जी प्रतिष्ठित अक्वा कुळातील सदस्यांना देखील वगळत असे कारण त्यांच्या पूर्वजांपैकी एक लोंगासे महिला होती ( किनारी प्रदेशातील सनागा-सागरी जिल्ह्यातील कॅमेरूनियन वांशिक गट). युरोपियन व्यापारी आणि संशोधकांच्या निरीक्षणांवरून असे सिद्ध होते की जेंगू-पूजा १९ व्या शतकाच्या सुरुवातीला चांगली स्थापित झाली होती. सुरुवातीला मिशनऱ्यांना या देवाची प्रसिद्धी दडपण्यास मोठ्या प्रमाणात अपयश आले परंतु नंतर इतर प्रलोभने दाखवून मिशनऱ्यांनी ख्रिस्ताची ख्याती पसरवली.[२]
कॅमेरूनच्या लिटोरल आणि नैऋत्य प्रांतांमध्ये हा पंथ अजूनही सक्रिय आहे. पुरुष आणि महिला दोघेही सामील होण्यास पात्र असतात. ही मोकळीक अलिकडच्या काळात देण्यात आली आहे. जेंगू-पूजा प्रामुख्याने दुआला, मालिम्बा, मध्ये पुरुषांमध्ये आहे, परंतु दुसरीकडे, बाकवेरीमध्ये, हा पंथ प्रामुख्याने महिलांसाठी आहे.[२]
समारंभ आणि विधी
[संपादन]जेंगू पूजा एका व्यक्तीच्या नेतृत्वाखालील गुप्त समाजाने केली जात होती. ही व्यक्ती पारंपारिकपणे सर्व सभांमध्ये मुखवटा घालून ही पूजा करत होती. ही प्रथा इतर धर्मांच्या प्रभावामुळे २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत जवळजवळ नष्ट झाली होती. कोणीही मिएंगूची प्रार्थना करू शकतो आणि प्रसाद चढवी शकतो. सर्वसाधारणपणे मासेमारी करण्यापूर्वी किंवा पाण्यातून प्रवास करण्यापूर्वी जेंगूची प्रार्थना किंवा जेंगूला बलिदान देण्याची विधी केली जाते.[२]
सुरुवातीचे जेंगू उपासक वौरी नदी, तिच्या उपनद्या आणि नदीमुख आणि त्या जवळच्या बेटांवर पिरोग्यूजमध्ये धार्मिक विधी करत असत. ती व्यक्ती प्रथम औपचारिक पोशाख, केप, स्कर्ट आणि रॅफिया फ्रॉन्ड्सचा शिरपेच परिधान करत असे. ताडाची फळे आणि लाकडी पॅडल्स घेऊन जात असे. त्यानंतर तो जेंगूला बोलावून त्यांना अन्न आणि पेय अर्पण करत असे. त्यानंतर वौरीच्या पुढे असलेल्या जेंगू मंदिराला भेट देत असे.[२]
इतर लोकप्रिय संस्कृतीत
[संपादन]- रिव्हर्स सोलोमन यांची कादंबरी ' द डीप' मध्ये जलपरीसारख्या लोकांच्या कृष्णवर्णीय अमेरिकन लोककथांचा समावेश आहे, ज्यांना कथेत वाजिनरू म्हटले जाते. ते गर्भवती आफ्रिकन महिलांपासून आले आहेत ज्यांना एकतर समुद्रात फेकून देण्यात आले होते किंवा जाणूनबुजून गुलामगिरीच्या जहाजातून उडी मारण्यात आली होती, गुलामगिरीऐवजी मृत्यू निवडला होता.[५]
संदर्भ
[संपादन]- 1 2 3 4 Ardener, Edwin (1975). "Belief and the Problem of Women". In Ardener, Shirley (ed.). Perceiving Women (इंग्रजी भाषेत). London: Malaby Press. pp. 6–11. ISBN 9780460140065.Ardener, Edwin (1975). "Belief and the Problem of Women". In Ardener, Shirley (ed.). Perceiving Women. London: Malaby Press. pp. 6–11. ISBN 9780460140065.
- 1 2 3 4 5 6 Tande, Dibussi (2005-11-14). "The Jengu Cult". www.peuplesawa.com. 2023-09-12 रोजी पाहिले.
- 1 2 3 4 5 6 Austen, Ralph (1992). "Tradition, Invention and History: The Case of the Ngondo, (Cameroon) (Tradition, invention et histoire: le cas du Ngondo (Cameroun))". Cahiers d'Études Africaines. 32 (126): 302–304. doi:10.3406/cea.1992.1557. ISSN 0008-0055. JSTOR 4392382.
- ↑ Austen, Ralph A.; Derrick, Jonathan (1999-01-21). Middlemen of the Cameroons Rivers: The Duala and Their Hinterland, C.1600-c.1960 (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. p. 21. ISBN 978-0-521-56664-3.
- ↑ Austen, Ralph A.; Derrick, Jonathan (1999-01-21). Middlemen of the Cameroons Rivers: The Duala and Their Hinterland, C.1600-c.1960 (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. p. 21. ISBN 978-0-521-56664-3.