Jump to content

जुगल किशोर मुखर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जुगल किशोर मुखर्जी (जन्म: ९ जुलै १९२५, मृत्यू: १५ डिसेंबर २००९) श्रीअरविंद आश्रमातील ज्येष्ठ साधक आणि विद्वान म्हणून परिचित होते. श्रीअरविंद तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि लेखक म्हणूनही ते ओळखले जात. आश्रमवासीयांमध्ये ते जुगल-दा या नावाने परिचित होते.

अध्ययन व अध्यापन

[संपादन]

कलकत्ता विद्यापीठातून विज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण (त्यांचा विशेष पेपर न्यूक्लियर फिजिक्स होता) पूर्ण केल्यानंतर, ते ऑगस्ट १९४९ मध्ये आश्रमात सामील झाले. मेघनाद साहा हे त्यांचे शिक्षक होते.[] सुरुवातीच्या काळात, जुगल-दा यांना आश्रमाच्या प्रकाशन विभागात काम सोपवण्यात आले.

पुढे ते श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन येथे भौतिकशास्त्राचे अध्यापन करत असत. नंतर स्वतः श्रीमाताजींनी त्यांच्यावर उच्च अभ्यासक्रम आयोजित करण्याची जबाबदारी सोपवली. ते "नॉलेज" या उच्च अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख होते.[]

प्रकाशित ग्रंथ

[संपादन]
  1. The Destiny of the Body (The Vision and Realisation in Sri Aurobindo's Yoga). - (दडेस्टिनी ऑफ द बॉडी) - १९७५
  2. From Man Human to Man Divine (Sri Aurobindo's Vision of the Evolutionary Destiny of Man).- (फ्रॉम मॅन ह्युमन टू मॅन डिव्हाईन) - १९९०
  3. K.D. Sethna: The Wonder that is Amal Kiran (१९९४) ISBN: 81-7058-408-6
  4. Sri Aurobindo Ashram: Its Role, Responsibility and Future Destiny. - (श्रीअरबिंदो आश्रम: इट्स रोल, रेस्पॉन्सिबिलिटी अँड फ्युचर डेस्टिनी)
  5. Sri Aurobindo: The Smiling Master (Humour in Sri Aurobindo's Writings). - (श्रीअरबिंदो - द स्माईलिंग मास्टर) - १९९५
  6. Sri Aurobindo's Poetry and Sanskrit Rhetoric. - (श्रीअरबिंदो ज पोएट्री अँड संस्कृत ह्रेटोरिक) - १९८९
  7. "Mysteries of Death, Fate, Karma and Rebirth - (मिस्टरिज ऑफ डेथ, फेट, कर्म अँड रिबर्थ) (प्रकाशन वर्ष २००४) ISBN: 81-7058-772-7
  8. The Practice of the Integral Yoga - (द प्रॅक्टिस ऑफ द इंटिग्रल योग) - २००३ []
  9. The Ascent of Sight in Sri Aurobindo’s Savitri
  10. Mrityu Rahasya - मृत्यू रहस्य - (बंगाली भाषेतील पुस्तक) -
  11. Purna Yoger Sadhan Paddhati - पूर्ण योगर साधन पद्धती - (बंगाली भाषेतील पुस्तक) []

संदर्भ

[संपादन]
  1. "Jugal Kishore Mukherjee - author of 'The Destiny of the Body'". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-09-02 रोजी पाहिले.
  2. 1 2 "Personalia / Jugal Kishore". sri-aurobindo.co.in. 2025-09-02 रोजी पाहिले.
  3. "Mysteries of Death, Fate, Karma and Rebirth : Book by Jugal". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-09-02 रोजी पाहिले.