जी.एस. मेडिकल कॉलेज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जी.एस. मेडिकल कॉलेज
Admin. staff ३९०


'सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज’ या नावाचे, मुंबईतील आचार्य दोंदे मार्गावर परळ येथे एक वैद्यकीय महाविद्यालय आहे. ते जी.एस.मेडिकल कॉलेज या नावाने ओळखले जाते. हे कॉलेज के.ई.एम.(किंग एडवर्ड मेमोरियल) या रुग्णालयाशी संलग्न आहे.

इ.स.१९१०-१९२०पर्यंत भारतामधील कोणत्याही मेडिकल कॉलेजांतील विविध शाखांचे प्रमुख फक्त ब्रिटिश वैद्यकीय सेवांमधून आलेले डॉक्टरच असत. भारतीयांना ते जास्त हुशार असले तरी अशी पदे नाकारली जात. या अपमानातूनच १९२५ साली जी.एस.मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. या महाविद्यालयामुळे परदेशी गेलेले अनेक डॉक्टर भारतात परत आले.