Jump to content

जिली कूपर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जिल सॅलिट या पानावरून पुनर्निर्देशित)
जिली कूपर
जन्म नाव जिली कूपर
जन्म २१ फेब्रुवारी १९३७
हॉर्नचर्च, इसेक्स, इंग्लंड
मृत्यू ५ ऑक्टोबर २०२५
राष्ट्रीयत्व Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा इंग्लिश
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती रटशायर क्रॉनिकल्स
अपत्ये फेलिक्स, एमिली
संकेतस्थळ jillycooper.co.uk

जिली कूपर ही एक ब्रिटिश लेखिका आहे.[]

जीवन व कारकीर्द

[संपादन]

जिली कूपर यांचा जन्म ब्रिटन मधील इसेक्स परगण्यातील हॉर्नचर्च येथे २१ फेब्रुवारी १९३७ रोजी झाला.त्यांचे बालपण यॉर्कशायरसरे परगण्यात गेले.त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ब्रिटिश वर्तमानपत्रात काम करण्याचा प्रयत्न केला.गॉडफ्रे स्मिथ संपादन करीत असलेल्या द संडे टाईम्स मासिकात त्यांनी स्वतःच्या अनुभवावर आधारित स्तंभ लिहायला सुरुवात केली आणि त्यांच्या लेखन कारकिर्दीला जोमाने सुरुवात झाली.त्यांनी हा स्तंभ १३ वर्षे लिहिला. नंतर त्यांनी द मेल ऑन संडे या वर्तमानपत्रात पाच वर्षे लिहिले.या स्तंभावर आधारित त्यांचे पहिले पुस्तक इसवी सन १९६९ मध्ये प्रसिद्ध झाले.त्या पुस्तकाचे शीर्षक होते -हाऊ टू स्टे मँरिड.त्यांनी सर्वसामान्य लोकांना आवडणाऱ्या मनोरंजक, काल्पनिक कथा आणि कांदबऱ्या लिहिल्या.घर, संसार, प्रेम, प्रणय इत्यादी गोष्टींवर त्यांनी हलकेफुलके लिहिले जे वाचकांना फार आवडले.त्यांची रटशायर क्रॉनिकल्स ही कादंबरी मालिका फार गाजली. त्या कादंबरीत तत्कालीन उच्चमध्यमवर्गातील ब्रिटिश समाजाचे प्रतिबिंब पडले होते त्यामुळे ती कादंबरी इंग्लिश वाचकांना आवडलीच आणि जगभरातील वाचकांमध्येसुद्धा लोकप्रिय झाली.

मृत्यू

[संपादन]

रविवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, बुधवार,८ ऑक्टोबर २०२५