जिजामाता प्रबोधन केंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जिजामाता प्रबोधन केंद्र ही ज्ञान प्रबोधिनीच्या प्रेरणेतून २००७ या साली सुरू झालेली एक संस्था आहे.

सदस्यत्व[संपादन]

  • संस्थेचे सदस्यत्व फक्त महिलांना मिळू शकते.

कार्यक्षेत्र[संपादन]

पुणे जिल्ह्यातील दक्षिण भागात भोर, वेल्हेहवेली या तालुक्यात संस्थेचे काम चालते. केवळ महिलांनी महिलांसाठीच केलेले काम हे या कामाचे वैशिष्ट्य आहे. संस्था आरोग्य, स्वयंरोजगार व नेतृत्व या विषयावर शिवगंगा व गुंजवणी खोऱ्यात काम करते. सातत्याने केलेल्या कामामुळे महिलांचे सबलीकरण तर होतेच होते पण त्या बरोबरच प्रबोधन सुद्धा होते.