जिओ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jio (azienda) (it); জিও (bn); Jio (fr); જિઓ (gu); Jio (vi); जिओ (mr); Jio (de); ଜିଓ (or); జియో (te); ریلاینس جیو (fa); Jio (zh); Jio (es); Jio (en); جیو (ur); Jio (pt-br); Jio (pt); Jio (id); Jio (pl); ജിയോ (ml); ರಿಲಯನ್ಸ್ ಜಿಯೋ (kn); जिओ (mai); जियो (hi); ᱡᱤᱭᱳ (sat); ਜੀਓ (pa); জিঅ' (as); جيو (ar); ジオ (ja); ரிலையன்ஸ் ஜியோ (ta) empresa de telecomunicaciones en India (es); ভারতীয় মোবাইল নেটওয়ার্ক পরিষেবা প্রদানকারী সংস্থা (bn); Empresa indiana de comunicações. (pt-br); रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (mr); indyjskie przedsiębiorstwo telekomunikacyjne (pl); భారత టెలికమ్యూనికేషన్ కంపెనీ (te); empresa indiana de comunicações (pt); Telecommunications network in India (en); भारतीय दूरसंचार कंपनी (hi); indisches Telekommunikations-Unternehmen (de); ଭାରତୀୟ ଦୂରସଂଚାର କମ୍ପାନୀ (or); ভাৰতীয় টেলিকমিউনিকেচন নেটৱৰ্ক (as); شبكة اتصالات في الهند (ar); 印度電信公司 (zh); தொலைத்தொடர்பு நிறுவனம் (ta) रिलायंस जियो (hi); Reliance Jio Infocomm (fr); Reliance Jio Infocomm, Reliance Jio, Reliance Jio Infocomm Limited (de); Reliancce Jio Infocomm, Reliance Jio, Reliance Jio Infocomm Limited, RELIANCE JIO INFOCOMM LIMITED, Jio TV, JioTV (en); Reliance Jio Infocomm, Reliance Jio Infocomm Limited, Reliance Jio Infocomm Ltd (pl); Reliance Jio (zh); リライアンス・ジオ (ja)
जिओ 
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड
 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारtelephone company
उद्योगदूरसंचार उद्योग,
मोबाइल फोन उद्योग
स्थान भारत
मालक संस्था
मुख्यालयाचे स्थान
संस्थापक
स्थापना
 • फेब्रुवारी १५, इ.स. २००७
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड ही LTE (Long Term Evolution) सेवा देणारी व भारतात जिओ या व्यवसायी नावाने बिनतारी संदेशवहन करणारी कंपनी आहे. ही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय नवी मुंबई येथे आहे. या कंपनीकडे २जी/३जी प्रकारचे जाळे नसून ही कंपनी पूर्णपणे ४जी (फोर्थ जनरेशन) सेवा देते. ही कंपनी भारतातील एकूण २२ टेलिकॉम विभागांत १००% व्हॉईस ओव्हर एलटीई चालविते.[१]

रिलायन्स इंडस्ट्रीजचे जनक धीरूभाई अंबानी यांच्या ८३ व्या वाढदिवशी, म्हणजे (२७ डिसेंबर, इ.स. २०१५) या तारखेला जिओचे उद्‌घाटन झाले.[२] त्यानंतर त्यांची आम जनतेसाठीची व्यावसायिक सेवा ५ सप्टेंबर, २०१६ रोजी सुरू झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुख्य मालक मुकेश अंबानी यांचे रिलायन्स जिओ ही दूर संचार सेवा आहे. संजय मश्रूवाला हे जिओचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य ज्योतींद्र ठक्कर आहेत. मुकेश अंबानी हे मुख्य व्यूहकार आहेत.[३]

उत्पादन आणि सेवा[संपादन]

४जी ब्रॉड-बॅंड[संपादन]

Jio sim

२०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सबंध भारतात जिओची ४जी ब्रॉड बॅंड सेवा सुरू होईल.[४] ही सुरुवात २०१५ सालच्या डिसेंबरमध्ये होणार होती, पण कंपनी अजूनही सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहे.

जिओचा मुखडा दि.१२ जून २०१५ रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चौथे अपत्य या (४जी) स्वरूपात उघडला. त्यात त्यांनी डाटा, ध्वनी, अगदी ताजेतवाने मेसेजेस, दूरचित्रवाणीवरील चालू घडामोडी, मागणीनुसार चित्रपट, बातम्या, आधुनिक संगीत, तसेच डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म या सुविधा देण्याचे ठरले.

या कंपनीने स्थानिक केबल ऑपरेटरांचे सहकार्य घेऊन ब्रॉड बॅंड सुविधेसाठी देशात २५०००० किलोमीटर लांबीच्या फायबर केबल मार्फत नेटवर्क पसरविले.[५] त्याच्याकडील विविध सेवा चालू करण्याची लायसेन्से वापरून जिओ दूरदर्शन चॅनल हे वितरकांच्या मागणीप्रमाणे दूरचित्रवाणी सेवाही उपलब्ध करून देणार आहे.

एलवायएफ शॉर्ट फोन[संपादन]

२०१५ सालच्या जूनमध्ये जिओने मोबाईल हॅंडसेट बनविणाऱ्या गावांगावांतल्या कंपन्यांशी ४जी हॅंडसेट त्याच्या वैशिष्ट्यांसह उपलब्ध करून देण्यासाठी करार केले. जिओचे फायर नेट वर्क उपयोगात आणून ४जीचा वेग वाढविण्याची, तसेच त्याचा प्रसार करण्याचीही कंपनीची योजना आहे. शिवाय जिओचे ४जी वायर लेस नेट वर्क आहे. जिओने २०१५ साल्या ऑक्टोबरमध्ये स्वतःचा LYF नावाचा मोबाइल हॅंडसेट विकसित करण्याची योजना तयार केली आहे.[६] दि. २५ जानेवारी २०१ रोजी एलवायएफ स्मार्ट फोन मालिका सुरू करण्याची कंपनीची योजना आहे ती रिलायन्स रिटेल बाजारात उपलब्ध होणार आहे. त्या मालिकेला वॉटर १, वॉटर २, अर्थ १ आणि फ्लेम १ ही नावे दिलेली आहेत.

जिओ नेट वाय-फाय[संपादन]

वर सांगितलेल्या ४जी डाटा आणि टेलिफोन सुविधा चालू होण्यापूर्वी जिओने भारतातील मुख्य शहरांतून मोफत हॉटस्पॉट वायफाय (वायरलेस फायडॅलिटी) सेवा चालू केलेली आहे. तीत खालील शहरांचा समावेश आहे.

 • महाराष्ट्र - इस्लामपुर , सांगली. आंध्र प्रदेश – विशाखापट्टण, विजयवाडामधील महात्मा गांधी रोड..
 • उत्तर प्रदेश – लखनौ, मिरतमधील कलेक्टर कचेरी.
 • उत्तराखंड – मसुरी.
 • ओरिसा – भुवनेश्वर
 • गुजरात – सुरत, अहमदाबाद.
 • पश्चिम बंगाल – कलकत्ता
 • मध्य प्रदेश – इंदूर, जबलपूर, देवास, उज्जैन
 • महाराष्ट्र – मुंबई [७]

२०१६ सालच्या मार्चमध्ये जिओने भारतातील खाली दिलेल्या सहा क्रिकेट स्टेडियमांमध्ये "सन २०१६ च्या आयसीसी वर्ल्ड कप टी-२०" साठी मोफत वायफाय सुविधा चालू केली होती.ही स्टेडियम्स् खालील प्रमाणे-

 • वानखेडे स्टेडियम -मुंबई,
 • बिंदरा स्टेडियम- मोहाली,
 • धरमशाळा स्टेडियम,
 • चिन्नास्वामी स्टेडियम – बेंगलोर,
 • फिरोजशहा कोटला स्टेडियम - दिल्ली
 • ईडन गार्डन - कोलकता

जिओ ॲप्स[संपादन]

मे २०१६ मध्ये जिओने ४जी सुविधा देण्याच्या दृष्टीने गूगल प्ले वर बरेच विविध प्रकारचे ॲप्स चालू केले आहेत.[८] जर मोबाईलवर ॲप असेल आणि ते ज्याला डाऊनलोड करावयाचा असेल त्याच्याकडे जिओ सिम कार्ड असणे आवश्यक आहे. बहुतेक ॲप्स बीटा फेसवर आहेत. त्यांतील काही ॲप्स असे :

 • माय जिओ,
 • जिओ टीव्ही,
 • जिओ सिनेमा,
 • जिओ चॅट मेसेंजर,
 • जिओ म्युझिक,
 • जिओ ४जी व्हॉईस,
 • जिओ माग्स (?),
 • जिओ एक्सप्रेस न्यूझ,
 • जिओ सिक्युरिटी,
 • जिओ ड्राइव्ह,
 • जिओ मनी वॉलेट,
 • जिओ स्विच,
 • जिओ फी.

ब्रॅंडिंग ॲन्ड मार्केटिंग[संपादन]

बॉलीवुड ॲक्टर शाहरुख खान दि.२४ डिसेंबर २०१५ रोजी जिओचा ब्रॅंड अम्बॅसडर झाला आहे.

संदर्भ[संपादन]

 1. ^ "रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड". Archived from the original on 2019-08-24. २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
 2. ^ "रिलायन्स जिओ इन्फोकॉम लॉंचेस 4जी सर्विसेस फॉर एम्प्लॉयीज". २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
 3. ^ "मुकेश अंबानी'स सन आकाश जॉइन्स रिलायन्स इंडस्ट्रीज; बिगिन्स ॲट टेलिकॉम आर्म रिलायन्स जिओइंडस्ट्रीज". २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
 4. ^ "रिलायन्स जिओ लाइकली टू डीले इट्स डिसेंबर पॅन-इंडिया लॉंच". २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
 5. ^ "रिलायन्स जिओ लुकिंग टू पार्टनर लोकल केबल फार्म्स इन ब्रॉडबॅंड पुश". २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
 6. ^ "रिलायन्स रिटेल टू सेल ४जी स्मार्टफोन्स अंडर 'LYF (लीफ) ' ब्रॅंड". २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
 7. ^ "रिलायन्स जिओ लॉंचेस अनलिमिटेड फ्री वायफाय इन मुंबई फॉर गणेश उत्सव". २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
 8. ^ "८ रिलायन्स जिओ स्पेसिफिक ॲंप्स गो लिव्ह ऑन गूगल प्ले स्टोर, आयओएस कमिंग सून". Archived from the original on 2016-05-10. २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.