Jump to content

जानकी वसंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Janki Vasant (es); Janki Vasant (pt-br); Janki Vasant (de); Janki Vasant (fr); जानकी वसंत (mr); ᱡᱟᱱᱠᱤ ᱵᱟᱥᱟᱱᱛ (sat); Janki Vasant (pt); Janki Vasant (en); జాంకీ వసంత్ (te); ਜਾਨਕੀ ਵਸੰਤ (pa); ஜானகி வசந்த் (ta) Indian activist (en); ناشطة هندية (ar); Indian activist (en)
जानकी वसंत 
Indian activist
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९६५
नागरिकत्व
व्यवसाय
  • कार्यकर्ता
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

जानकी व्यास वसंत (जन्म: १९६५) ह्या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांना २०१६ सालचा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कारकिर्द

[संपादन]

जानकी वसंत यांचा जन्म १९६५ साली झाला. १९८६ मध्ये पॅन अ‍ॅम फ्लाइट ७३ चे अपहरण झाले तेव्हा जानकी त्यात प्रवास करत होत्या. तो अनुभव सांगताना जानकी म्हणतात,"वयाच्या २० व्या वर्षी मी मृत्यूला खूप जवळून पाहिले, माझे दोन जवळचे मित्र आणि एक शिक्षक गमावले. त्या घटनेने माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. मी एका व्यावसायिक कुटुंबातून होते, दुसऱ्या व्यावसायिक कुटुंबात लग्न झाले पण या दुर्घटनेतून गेल्यानंतर मी एक स्वयंसेवी संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये वंचितांना शिक्षण दिले जात होते. जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला."[]

सामाजिक कार्य आणि पुरस्कार

[संपादन]

जानकी यांनी २००३ मध्ये संवेदना ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. या संस्थेचा हेतू झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण आणि आरोग्य सेवा देणे असा होता.[] जानकी यांनी अहमदाबादमधील झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांसोबत काम करण्यास सुरुवात केली. लवकरच २५० मुलांसाठी एक शाळा सुरू केल्यागेली. इथे शिक्षणासोबतच लसीकरण, अन्न आणि कार्यशाळा अशा विविध सेवा देण्यात आल्या.[]

त्यांच्या या संस्थेद्वारे गुजरात मधील झोपडपट्टीतील गरीब महिला आणि मुलांना फायदा झाला. 'अक्षरा', 'सत्त्व', 'एकलव्य', 'वसंत पाठशाळा' आणि 'उद्ग्रीव'; हे संवेदनाचे पाच वेगवेगळे उपक्रम आहेत आणि स्थापनेपासून ते ३,००,००० हून अधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले आहेत.[] जानकी यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते २०१६ चा नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Deshmukh, Ashwini (24 February 2016). "Exclusive! Pan Am 73 survivors talk about Neerja Bhanot's brave act". Filmfare (इंग्रजी भाषेत). 20 June 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 May 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Sky is the limit for these slum kids: Samvedana is an NGO established 11 years back to uplift deprived children and educating them through non-formal education". DNA Sunday (इंग्रजी भाषेत). 1 June 2014. 1530758031. 2 May 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 May 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "The playway privilege". The New Indian Express (इंग्रजी भाषेत). 4 September 2011. 887271224. 2 May 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 May 2022 रोजी पाहिले.
  4. ^ "Janki Vasant, Founder, Samvedna". द ब्रँड कॉल्ड यू (इंग्लिश भाषेत). १३ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "Social worker Janki Vasant conferred Nari Shakti Puraskar by President". India CSR Network. 11 March 2017. 13 March 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 May 2022 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]