जागृत मारूती मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

जागृत मारूती मंदिर[संपादन]

जागृत मारुती मंदिर हे सोलापूर व शेळगी या दोन्ही गावाच्या सरहद्दीवरील एक मंदिर आहे. सोलापूर शहराचा विस्तार होण्यापूर्वी सोलापूर आणि शेळगी या दोन्ही गावाचे सरहद्द म्हणजे शिव असे म्हंटले जायचे. शिवेवरती असणारे मारुती म्हणजे जागृत मारुती होय. या दोन्ही गावाच्या सरहद्दीवरील मारुती म्हणून याचे नाव जागृत मारुती मंदिर असे पडले आहे. १९९२ पर्यंत या मंदिराजवळ आणि सोलापूर शहराच्या सरहद्दीवर एक जकात नाका होते. जकात (कर) म्हणजे सोलापूर महानगरपालिकेचे उत्पन्नाचे साधन होय. १९९२ साली जेव्हा सोलापूर महानगरपालिकेचा विस्तार किवा हद्दवाढ झाले तेव्हा आजूबाजूचे लहान-सहान १२ गावे सोलापूर शहरात समाविष्ट झाले तेव्हा येथील जकात नाका काढून वाढीव सरहद्दीवर म्हणजे दहिटणे गाव येथे झाले. तेव्हापासून येथील शिव किवा सरहद्द संपुष्टात आले. शेळगी गावास शहराच्या सर्व सेवा उपलब्ध झाल्या आहेत. सध्या GST व जकात बंद या धोरणामुळे या जकात नाकाचे स्मृती फक्त भग्नावशेष म्हणून शिल्लक आहेत.

फोटो[संपादन]

१ )

जागृत मारूती मंदिर

२ )

जागृत मारूती

३ )

शेळगी नाका