pandemia (es); pandymijŏ (szl); pandemic (ak); heimsfaraldur (is); pandemik (ms); пандеми (os); pandemic (en-gb); وبا یا ټولنیونه (ps); pandemi (tr); عالمگیر وبا (ur); pandémia (sk); пандемія (uk); 瘟疫 (zh-cn); pandèmia (sc); pandemiya (uz); বৈশ্বিক মহামাৰী (as); пандемија (mk); pandemija (bs); महामारी (bho); pandémie (fr); pandemija (hr); जागतिक साथ (mr); pandemėjė (sgs); пандемија (sr); Ubhubhane (zu); Pandemie (lb); pandemi (nb); pandemiya (az); pandemiya (crh); pandemia (smn); جائحة (ar); ကမ္ဘာကပ်ရောဂါ (my); 瘟疫 (yue); пандемия (ky); pandemya (krj); vûn-yi̍t (hak); pandemia (ast); pandèmia (ca); пандемия (ba); pandemig (cy); pandemia (lmo); pandemia (sq); համավարակ (hy); 瘟疫 (zh); pandemi (da); პანდემია (ka); パンデミック (ja); pandemia (ia); وباء عالمى (arz); මහා වසංගත (si); libung (szy); विश्वमारी (hi); 瘟疫 (wuu); pandemia (fi); minêye daegnrece (wa); pandemie (li); pandemia (sms); உலகம்பரவுநோய் (ta); пандэмія (be-tarask); pandemii (vep); โรคระบาดทั่ว (th); pandemija (sh); пандемія (rue); pandemia (vec); ཡོངས་ཁྱབ་རིམས་ནད། (bo); cocoliztli īpan mochīuh nepapan āltepētl (nah); pandemya (bcl); ᬕᬾᬭᬶᬂᬅᬕᬸᬂ (ban-bali); пандемия (bg); pandemie (ro); 瘟疫 (zh-hk); pandemi (sv); 瘟疫 (zh-hant); pandemio (io); 범유행 (ko); pandemio (eo); pandemia (pap); pandemia (an); বৈশ্বিক মহামারী (bn); pandhémi (jv); пандеми (cv); פאנדעמיע (yi); pandemija (hsb); Đại dịch (vi); პანდემია (xmf); pandemia (ilo); pandemia (pt-br); un-e̍k (nan); pandemi (min); gagung (ban); pandemia (ln); pandemic (en); ကပ် (mnw); pandémia (hu); મહામારી (gu); pandemy (fy); pandemia (eu); پەندەمىيە (ug); همهگیری جهانی (fa); پاندمی (azb); alɔbo (dag); Pandemie (de); пандеми (ce); пандэмія (be); pandemia (sw); inqaku lesiseko eliphambili lephandemikhi (xh); pandemî (ku); विश्वव्यापी महामारी (ne); mate urutā (mi); pandemi (nn); pandemie (nl); pandemiija (se); pandemie (ie); sewa se seholo (st); пандемия (tt); tshiwo tsha lushaka (ve); paindéim (ga); విశ్వమారి (te); pandemie (mwl); Pandemii (frr); pandemi (id); Pandemie (de-ch); ਮਹਾਂਮਾਰੀ (pa); pandemia (it); አለም-አቀፍ ወረርሽኝ (am); وبا (pnb); arwas (kab); pandeemia (et); pandemie (af); pandēmija (lv); pandemic (en-ca); pandemie (cs); Àjàkáyé-àrùn (yo); binghraq (za); pandemia (pt); індет (kk); Pandemii (gsw); pandèmia (oc); pandemija (lt); pandemija (sl); pandemya (tl); pidimìa (scn); ئاھۆی گشتی (ckb); pandemic (tw); pandemia (pl); പാൻഡെമിക് (ml); 瘟疫 (zh-tw); פנדמיה (he); пандемия (sah); عالمگير وبا (sd); pandemya (war); pandemia (gl); Pandemia (la); πανδημία (el); пандемия (ru) epidemia mundial de enfermedades infecciosas (es); በአለም አቀፍ የጤና ችግር የሆነ ተላላፊ ወረርሽኝ (am); epidèmia d'una malaltia infecciosa que s'ha expandit per tota la Terra o per una àmplia regió de la Terra (ca); länder- und kontinentübergreifende Ausbreitung einer Krankheit (de); 大規模傳染病爆發 (zh); bulaşıcı bir hastalığın küresel çapta yayılmasıdır (tr); 感染症・伝染病の世界的な流行 (ja); epidemi som får spridning över stora delar av världen (sv); התפשטות מהירה של מחלה בקרב אוכלוסייה (he); विश्व के बहुत विस्तृत क्षेत्र में फैली महामारी (hi); e Chranket, wo sich uf grosse Däil vo dr Wält usbräitet (gsw); laajalle levinnyt tartuntatautiepidemia, jolla on maailmanlaajuinen terveysvaikutus (fi); বিশ্বব্যাপি হোৱা সংক্ৰামক ৰোগৰ মহামাৰী (as); tutmonda epidemio (eo); epidemie velkého rozsahu (cs); širenje infekcijske bolesti u širokim geografskim regijama, kontinentalnih ili globalnih razmjera (bs); epidemia la cui diffusione interessa più aree geografiche del mondo (it); বৈশ্বিক স্বাস্থ্যের প্রভাব নিয়ে একটি বড় অঞ্চলে ছড়িয়ে পড়েছে এমন সংক্রামক রোগের মহামারী (bn); épidémie présente sur une large zone géographique (fr); шырока распаўсюджаная эпідэмія (be-tarask); rozsiahla epidémia, ktorá sa rozširuje na geograficky rozsiahlom území (sk); wabak penyakit berjangkit yang tersebar ke tahap antarabangsa (ms); עפידעמיע פון אינפעקטיווער קרא קייט פארשפרייט איבער דער גאר ער וועלט (yi); epidemic of infectious disease that has spread across a large region with global health impact (en); rozšěrjenje wěsteje chorosće přez kraje a kontinenty (hsb); epidemia global de doença infecciosa (pt); malautía infecciosa de presonas u animals en un aria cheograficament ampla (an); globāla epidēmija (lv); epidemia iti makaalis a sakit (ilo); epidemic of infectious disease that has spread across a large region with global health impact (en); ubhadane lomhlaba lwesifo esithathelanayo (zu); epidemie op 'n wêreldwye skaal (af); epidemia de doença infecciosa que atinge uma larga região causando um impacto na saúde global (pt-br); 전세계적으로 확산된 감염병의 대유행 (ko); epidemi penyakit yang menyebar di wilayah yang luas (id); epidemia o zasięgu globalnym (pl); പകർച്ചവ്യാധികൾ (ml); bir yoluxucu xəstəliyin qlobal yayılması (az); epidemie de boli infecțioase care s-a răspândit într-o regiune mare cu impact global asupra sănătății (ro); panyungkanan sané ngelahlahin akéh jatma ring gumine (ban); epidemie op wereldwijde schaal (nl); một phân loại dịch bệnh lây lan trên toàn cầu (vi); epidemia que afecta a toda a Terra ou a unha ampla rexión desta (gl); وباءٌ ينتشر بين البشر في مساحة كبيرة مثل قارة مثلا أو قد تتسع لتضم كافة أرجاء العالم (ar); глобальная эпидемия (ru); поширення захворювання у світовому масштабі (uk) বিশ্বমারী, বৈশ্বিকমারী (bn); 感染爆発, 爆発感染, 世界的流行, 汎用性流行, パンデミー (ja); מגפה רבתי, מגפה כוללת, מגפה כלל עולמית, מגפה עולמית (he); 大流行 (zh-tw); wabak besar (ms); ᬕᬾᬭᬶᬂᬅᬕᬸᬂ, grubug agung (ban); Grippeepidemie, Panzootie, Grippepandemie, Weltkrankheit, Pandemisch, Influenzapandemie (de); 판데믹, 팬데믹, 세계적 대유행 (ko); অতিমাৰী, বিশ্বমাৰী, গোলকীয় মহামাৰী (as); جائحه (ar); 大流行 (zh-hant); pandemics (en)
जागतिक साथ
epidemic of infectious disease that has spread across a large region with global health impact
जागतिक साथ ही विस्तृत भूभागावर (उदाहरणार्थ अनेक खंडांवर) पसरून मोठ्या संख्येने लोकांना होणाऱ्या रोगाची होय. विस्तृत भूभागावर पसरलेल्या मात्र बाधित लोकांची संख्या स्थिर असणाऱ्या प्रदेशनिष्ठ संसर्गजन्यरोगास जागतिक साथ म्हणत नाहीत. हंगामी इंन्फ्ल्युएंझासारखे रोग जगाच्या अनेक प्रदेशांमध्ये साधारण एकाच वेळी उद्भवतात, त्यांचा इकडून तिकडे असा प्रसार होत नाही.
देवी व क्षयरोग अशा रोगांच्या अनेक जागतिक साथी इतिहासात आढळून येतात. चौदाव्या शतकात काळा मृत्यू (वा प्लेग) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागतिक साथीने अंदाजे ७५-२०० दशलक्ष लोकांचा मृत्यू झालेला होता. अन्य मोठ्या जागतिक साथींमध्ये १९१८ मधील इंन्फ्ल्युएंझा (स्पॅनिश फ्ल्यू) आणि २००९ मधील इंन्फ्ल्युएंझा जागतिक साथ (एच१एन१) यांचा समावेश होतो. सद्यकालीन जागतिक साथरोगांमध्ये एचआयव्ही / एड्स आणि कोव्हिड-१९ यांचा समावेश आहे.
जागतिक साथीदरम्यान साथीचा रोग आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडतो आणि जगभर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर त्याचे रुग्ण आढळतात. केवळ विस्तृत विभागावर पसरला आहे किंवा त्याच्यामुळे अनेक लोक मृत्यू पावलेले आहेत म्हणून एखादा रोग जागतिक साथरोग ठरत नाही. तो संपर्कजन्यही असावा लागतो. कर्करोग अनेक मृत्यूंसाठी जबाबदार आहे, परंतु तो साथीचा रोग मानला जात नाही कारण तो संपर्कजन्य वा संसर्गजन्य नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने पूर्वी इंफ्ल्युएंझा विषाणूच्या प्रसाराच्या अभ्यास करून साथरोगाच्या सहा टप्प्यांचे वर्गीकरण दिले होते. सुरुवातीस विषाणू प्राण्यांना संसर्गित करतो; नंतर प्राण्यांमुळे काही व्यक्तींना तो रोग होतो. यानंतरच्या टप्प्यात विषाणू अशाप्रकारे पसरतो की एका व्यक्तीपासून इतर व्यक्तींमध्ये त्याचा थेट संसर्ग होतो. अखेरच्या टप्प्यात हा विषाणू संपूर्ण जगभर पसरलेला असतो. मात्र फेब्रुवारी २०२० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार “साथरोगासाठी अधिकृत असे कोणतेही वर्गीकरण नाही.”
साथरोगाच्या उद्रेकाच्या व्यवस्थापनामध्ये मुख्यतः दोन डावपेच असतात - नियंत्रण आणि सौम्यकरण. उद्रेकाच्या प्रारंभिक अवस्थांमध्ये नियंत्रणाचा विचार केला जाऊ शकतो. नियंत्रणामध्ये निरोगी व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना इतर लोकसमूहापासून अलग ठेवणे; संसर्गनियंत्रणासाठी सार्वजनिक आरोग्य उपाययोजना आणि उपलब्ध असल्यास लसीकरण यासारख्या उपचारात्मक उपायांचा समावेश होतो. नियंत्रणाच्या बाहेर गेलेल्या साथरोगासाठी सौम्यकरणाचा विचार करावा लागतो. यामध्ये रोगाच्या प्रसाराची गती कमी करण्याचा आणि त्यायोगे समाजावर आणि आरोग्य व्यवस्थेवर पडणाऱ्या दुष्प्रभावांचे नियंत्रण करण्याचा याचा प्रयत्न केला जातो. वस्तुतः नियंत्रण आणि सौम्यकरणाचे उपाय एकाच वेळी सुरू केले जाऊ शकतात.
साथीचा रोग पसरत असताना दिवसागणिक त्याच्यामुळे लागण झालेल्या व्यक्तींची संख्या वाढत जाते. एक दिवस असा येतो की लागण झालेल्या दैनिक व्यक्तींची संख्या सर्वाधिक होते आणि त्यानंतर ती कमी कमी होत जाते. दैनिक सर्वाधिक रुग्ण असण्याच्या अवस्थेला साथीचे शिखर असे म्हणतात. साथरोगाचा मुकाबला करताना हे शिखर जास्तीत जास्त चपटे करण्याचा प्रयत्न केला जातो; अर्थात लागण झालेल्या दैनिक व्यक्तींची संख्या आरोग्य व्यवस्थेला सहजपणे हाताळता येऊ शकेल एवढीच राखण्याचा प्रयत्न केला जातो. यालाच विलंबाचा डावपेच असे म्हटले जाऊ शकते. या वाढीव कालावधीमध्ये लसीकरण व अन्य उपचारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. रोगाचा मुकाबला करताना बिगर-औषधीय उपायही केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ फ्ल्यूच्या साथीमध्ये हात स्वच्छ ठेवण्यासारखे वैयक्तिक प्रतिबंधात्मक उपाय; तोंडावर मास्क बांधणे; स्वतःला इतर लोकांपासून अलग करणे; शाळा बंद ठेवणे आणि लोकांची गर्दी होईल अशा गोष्टी टाळणे; लोकजागृती करणे आणि साफसफाईसारखे उपाय.
साथरोगाचा मुकाबला करताना दमन किंवा दाबून टाकण्याचा प्रयत्न हा एक डावपेच वापरला जातो. एका रुग्णाकडून दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला संसर्ग होऊ नये असा पुरेपूर कठोर प्रयत्न यामध्ये केला जातो. हे करताना संपूर्ण लोकसंख्येमध्ये सामाजिक अंतरन; रुग्णाला स्वतःच्या घरीच विलगीकरणात ठेवणे अशा उपायांचा समावेश होतो. २०९१-२० च्या करोना विषाणूच्या जागतिक साथीमध्ये चीनने या डावपेचाचा वापर केला. यासाठी संपूर्ण शहरे टाळेबंदावस्थेत वा लॉकडाऊनमध्ये ठेवलेली होती. हा डावपेच कठोर असून त्याच्या सामाजिक आणि आर्थिक परिणामांचाही विचार करावा लागतो.