जागतिक लोकसंख्या दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जगभरात दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केले जाते. ११ जुलै १९८७ रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले. यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जनमानसात जागृती निर्माण झाली. अखेर युनोने पण याची दखल घेवून १९८९ सालापासून हा दिवस जागतिक दिन म्हणून घोषित केला.[१]

हे ही पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "लोकसंख्यावाढीचे आव्हान कुणापुढे?". लोकसत्ता. १० जुलै २०१९. १० जुलै २०१९ रोजी पाहिले.