जागतिक मूत्रपिंड दिवस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जागतिक मूत्रपिंड दिवस हा जगभर मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो.

मूत्रपिंडे (किडनी) ही शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत. यांची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे. समाजात याविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यासाठी हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो.

महत्त्व[संपादन]

मूत्रपिंडे शरीरातील पाण्याचा व क्षारांचा समतोल राखण्याचे काम करतात. तसेच शरीरातील हजारो विषारी घटक शरीराबाहेर काढण्यासह रक्तदाब नियंत्रण, व्हिटॅमिन डीची निर्मिती, लाल रक्तपेशी वाढवण्याचे कामही करत असतात. व्हिटॅमिन डीमुळे हाडांना मजबुती मिळते. मूत्रपिंडे निकामी होण्यास मधुमेह व उच्च रक्तदाब ही प्रमुख कारणे आहेत. सत्तर टक्के किडनीचे विकार हे मधुमेह व उच्च रक्तदाबामुळे होतात. त्याशिवाय संसर्ग, काही अनुवंशिक आजार व सातत्याने वेदनाशामक गोळ्यांचे सेवन यामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. पर्यायी औषधे म्हणून अनेक जण भस्म वगैरेचे सेवन करतात. मात्र त्यातून पारा वगैरे विषारी धातू शरीरात शिरतात.

खबरदारीचे उपाय[संपादन]

  1. मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेची नियमित तपासणी करावी. सिरम क्रिएटीनीन तपासणीमुळे किडनीची कार्यक्षमता तपासता येते.
  2. योग्य दिनचर्या, व्यायाम व आहार यामुळे सर्वच विकारांना प्रतिबंध घालता येतो.
  3. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नये.
  4. वेदनाशामक गोळ्या तीन- चार दिवसांपेक्षा अधिक काळ घेवू नयेत.
  5. प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन योग्य तितकेच करावे.
  6. साखर, मीठमैदा आहारात कमीतकमी ठेवा.

हे सुद्धा पहा[संपादन]

  • गोखरू - मुत्रपिंडावरील आयुर्वेदिक उपचारासाठी.