Jump to content

जागतिक महिला दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
८ मार्च १९१४ चे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे जर्मन पोस्टर. या पोस्टरवर जर्मन साम्राज्यात बंदी घालण्यात आली होती.

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जाणारा एक सुट्टीचा दिवस आहे. महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो. हा दिवस लिंग समानता, पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो. [१] [२] सार्वत्रिक महिला मताधिकार चळवळीमुळे उत्तेजित असणारा हा दिवस २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळींमधून सुरू झाला. [३] [४] [५]

२८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यू यॉर्क शहरातील सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकाने आयोजित केलेला "महिला दिन" हा सर्वात पहिला दिवस होता. यामुळे १९१० च्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत जर्मन प्रतिनिधींना "एक विशेष महिला दिन" दरवर्षी आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यास प्रेरित केले, पण यावेळी कोणतीही निश्चित तारीख ठरली नाही; [६] पुढील वर्षी संपूर्ण युरोपमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे साजरा झाल. १९१७ मध्ये रशियन क्रांतीनंतर ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सुट्टी देण्यात आली; [७] त्यानंतर समाजवादी चळवळ आणि कम्युनिस्ट देशांनी त्या तारखेला तो दिवस साजरा केला. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात जागतिक स्त्रीवादी चळवळीने त्याचा स्वीकार होईपर्यंत ही सुट्टी डाव्या चळवळी आणि सरकारांशी संबंधित होती.

१९७७ मध्ये संयुक्त राष्ट्राने केलेल्या जाहिरातीनंतर जागतिक महिला दिन ही मुख्य प्रवाहातील जागतिक सुट्टी बनली. [८]

इतिहास[संपादन]

संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन त्या करीत होत्या. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य कृष्णवर्णीय लोकांनी आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.

त्यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यू यॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.[९]

भारतात[संपादन]

भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका,

कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. .[१०]

१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले.[११]

मातृदिन[संपादन]

काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात.

शुभेच्छा देण्याची पद्धती[संपादन]

इटलीमध्ये या दिवशी ; पुरुष महिलांना पिवळ्या मिमोसासची फुले भेट देऊन शुभेच्छा देतात.महिला दिन हा आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगून त्याचा गौरव करण्याचा दिवस आहे.[१२]

महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी फुलांची खरेदी

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "About International Women's Day". International Women's Day (इंग्रजी भाषेत). Archived from the original on June 3, 2016. March 8, 2021 रोजी पाहिले.
 2. ^ "International Women's Day". United Nations (इंग्रजी भाषेत). Archived from the original on March 7, 2021. March 8, 2021 रोजी पाहिले.
 3. ^ "History of International Women's Day". International Women's Day (इंग्रजी भाषेत). Archived from the original on March 7, 2021. March 8, 2021 रोजी पाहिले.
 4. ^ Nations, United. "Background | International Women's Day". United Nations (इंग्रजी भाषेत). Archived from the original on March 8, 2020. March 8, 2021 रोजी पाहिले.
 5. ^ "Stories of women's activism". nzhistory.govt.nz (इंग्रजी भाषेत). Archived from the original on February 18, 2022. February 18, 2022 रोजी पाहिले.
 6. ^ ""International Socialist Congress, 1910; Second International Conference of Socialist Women". p. 21. March 7, 2020 रोजी पाहिले.
 7. ^ Pruitt, Sarah (2023-09-13). "The Surprising History of International Women's Day". HISTORY (इंग्रजी भाषेत). 2023-11-02 रोजी पाहिले.
 8. ^ "International Women's Day, 8 March". United Nations (इंग्रजी भाषेत). Archived from the original on March 8, 2020. March 7, 2020 रोजी पाहिले.
 9. ^ ^ a b c "UN WomenWatch: International Women's Day –". UN.org. Retrieved February 21, 2013.
 10. ^ Google's cache of . डॉ. गीताली विनायक मंदाकिनी Archived 2011-08-12 at the Wayback Machine. It is a snapshot of the page as it appeared on 25 Jan 2010 11:36:47 GMT
 11. ^ "International Women's Day". United Nations.
 12. ^ "la Repubblica/societa: 8 marzo, niente manifestazione tante feste diverse per le donne". Repubblica.it. Retrieved March 8, 2012. "politica " Festa della donna, parla Ciampi "La parità è ancora lontana"". Repubblica.it. March 8, 2006. Retrieved March 8, 2012. Pirro, Dierdre (March 25, 2013). "Teresa Mattei, Flower power". The Florentine.

बाह्य दुवे[संपादन]