Jump to content

जहांदर शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

 

जहांदर शाह
جهاندار شاه
बादशाह
जहांदर शाहांचे चित्र, c. १७१२, आज लंडन, इंग्लंडच्या विक्टोरिया आणि ॲल्बर्ट संग्रहालयातमध्ये
मुघल बादशाह
राज्य कारकीर्द २९ मार्च १७१२ – ११ फेब्रुवरी १७१३[१]
राज्याभिषेक २९ मार्च १७१२
Predecessor पहिले शाह आलम
उत्तराधिकारी फर्रुख सियर
जन्म मिर्जा मुइज्जुद्दीन बेग मुहम्मद खान
[[ ]], १६६१ (१६६१-०५-१०)[२]
दख्खन, मुघल साम्राज्य
मृत्यु ११ फेब्रुवारी, १७१३ (वय ५१)
दिल्ली, मुघल साम्राज्य
दफन हुमायूनची कबर, दिल्ली, भारत
जोडीदार
Issue
Full name
मीर्जा मुइज्जुद्दिन मुहम्मद जहांदर शाह बहादूर
Posthumous name
खुल्द आरामगा (अर्थ: स्वर्गात शांत)[३]
House मुघल राजघाराणा
राजवंश तैमुरी वंश
वडील पहिले शाह आलम
आई निझामबाई
धर्म सुन्नी इस्लाम (हनफी)

जहांदर शाह [a] (मिजा मुइज्जुद्दिन बेग मुहम्मद खान; १० मे १६६१ – ११ फेब्रुवारी १७१३) हे १७१२ ते १७१३ या काळात थोड्या काळासाठी नववे मुघल बादशाह होते. ते बादशाह पहिले बहादूर शाह यांचे मुलगा होते आणि बादशाह औरंगजेब यांचे नातू होते.

जहांदर शाह हा मुघल राजवंशाचा पहिला नावापुरते शासक होते, ज्यांना शक्तिशाली सरदार जुल्फिकार खानने सिंहासनावर बसवले होते. त्यांचा राज एका वर्षाइतका टिकला आणि तो राज कमी वेळ टिकला व अशांत होता. सय्यद बंधूंनी त्यांना पदच्युत केले आणि त्यांचे पुतण्या फर्रुख सियर त्यांचे उत्तराधिकारी झाले.

बालपण

[संपादन]

राजकुमार मुइज्जुद्दिन यांचा जन्म १० मे १६६१ रोजी दख्खन सुबहात झाला. त्यांची आई निझामबाई, फतेह्यावर जंग यांची मुलगी, हैदराबादची एक कुलीन होती. [४] ते मुअज्जम यांचे थोरले पुत्र होते, [५] आणि तत्कालीन बादशाह औरंगजेब यांचे सर्वात थोरले नातू होते. मुघल परंपरेनुसार, मुघल दरबारात त्यांच्या जन्माचा मोठ्या थाटामाटाने उत्सव साजरा केले. [६]

औरंगजेबांच्या राजकाळात, मुइज्जुद्दिन यांनी तीन वर्षे दख्खनामधील लष्करी मोहिमेत भाग घेतले, ज्याच्यानंतर त्यांची कायमस्वरूपी उत्तर भारतात बदली करण्यात आली. १७०६ मध्ये, त्यांनी डेरा गाजी खानच्या बंडखोर मिरानी सरदारांना हरवले. [७] [८]

औरंगजेबांच्या मृत्यूनंतर, राजकुमार मुअज्जमने गादीचा संघर्ष जिंकला आणि जून १७०७ मध्ये बहादूर शाह सिंहासनावर बसले. [९] वडिलांच्या राज्यारोहणानंतर, मुइज्जुद्दिनला जहांदर शाह ही पदवी दिली आणि त्यांना ठट्टा व मुलतानचा राज्यपाल बनवले. [१०] बहादूर शाहांच्या कारकिर्दीत, जहांदर शाह, बहादूर शाहांच्या इतर मुलांप्रमाणे शाही दरबारातच राहत होते, कारण बादशाह म्हातारपणी सिंहासनावर बसले होते आणि त्यांच्या निधनाच्या वेळी सिंहासनाच्या जवळ राहावे अशी राजकुमारांची इच्छा होती. [११]

वारसा हक्काचे युद्ध

[संपादन]

१७१२ मध्ये बहादूर शाह मृत्यूशय्येवर असताना सिंहासनासाठी युद्ध सुरू झाले. त्यांच्या मृत्यूच्या वेळी सर्वात शक्तिशाली राजकुमार त्यांचे दुसरे पुत्र अजीमुश्शान होते, ज्यांनी बंगालचा <i id="mwXQ">सुभेदार</i> असून लक्षणीय संसाधने जमा केली होती. जहांदर शाह सर्वात कमजोर होते, त्यांच्याकडे लष्करी शक्ती ना निधी कोणतेही नव्हते. [१२] [१३]

मागील मुघल वारसा युद्धांप्रमाणे नसून, या युद्धाचा निकाल एका सरदार, जुल्फिकार खान, जे मीर बख्शी होते आणि मुघल साम्राज्यातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक होते, यांनी ठरवले. त्यांनी जहांदर शाह आणि त्यांचे धाकटे भाऊ रफी-उश-शान आणि जहान शाह यांच्यात युती घडवून आणली, व त्यांना असा प्रस्ताव दिला की विजयानंतर ते साम्राज्य स्वतःत वाटून घेऊ शकतील (ज्यात जुल्फिकार खान त्यांचा सामायिक मीर बख्शी म्हणून काम करेल). अजीमुश्शानचा पराभव झाला आणि त्यांना मारले, आणि त्यानंतर जहांदर शाहांनी युती तोडली आणि आपल्या भावांवर उलटले, जुल्फिकार खानच्या मदतीने जिंकले आणि भावांना ठार मारले, वारसा हक्काच्या संघर्षात विजेता म्हणून उदयास येत. [१२] [१३]

राज्य

[संपादन]
लाल कुंवर
मुघल सेनापती अब्दुस समद खान बहादूरचे स्वागत करित जहांदर शाह.

जहांदर शाहांचा राज्याभिषेक २९ मार्च, १७१२ रोजी झाला. [१४] त्यांच्या राज्यारोहणाला साम्राज्यात चांगला पाठिंबा नव्हता आणि त्यांना एक अवैध शासक म्हणून पाहिले जात होते. यामुळे, राज्याभिषेकानंतर, जहांदर शाहांनी आपल्या समर्थकांना बक्षिसे देऊन आणि बढती देऊन आपली सत्ता मजबूत करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या भावांना उत्तराधिकारात पाठिंबा देणाऱ्या सरदारांना कठोर शिक्षा देऊन पूर्वीच्या मुघल उत्तराधिकार पद्धतींपासून फारकत घेतली, त्यांपैकी अनेकांना मृत्युदंडसुद्धा दिले. तसेच, योग्य दफनविधीचा आग्रह धरणाऱ्या पूर्वीच्या बादशाहांच्या विपरीत, त्यांनी पराभूत राजपुत्रांचे देह दफन करायच्या आधी अनेक दिवस खुल्या हवेत सडू दिले. [१५]

जहांदर शाहांच्या राज्यारोहणानंतर, जुल्फिकार खानने वजीर पद स्वीकारले. जहांदर शाहांचे त्यांच्यावरील संपूर्ण अवलंबित्व आणि त्यांच्या गादीवर येण्याच्या परिस्थितीमुळे, प्रभावी सत्ता बादशाहाकडे नसून स्वतः जुल्फिकार खानांच्याच हातात होती. मुघल इतिहासात ही पहिलीच घटना होती की साम्राज्यावरील संपूर्ण सत्ता राजघराण्याबाहेरील व्यक्तींच्या हातात होती. जहांदर शाहांच्या कारकिर्दीत प्रभावी शासक असून, जुल्फिकार खानने राजपूत, शीख आणि मराठे यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचे आणि साम्राज्यात शांतता परत आणण्याचे प्रयत्न केले. परंतु, साम्राज्याची आर्थिक स्थिती खालावत होती, जहांदर शाहांच्या पूर्वजांपासून सुरू झालेला कल पुढेही कायम राहिला, ज्याच्यामुळे साम्राज्याची लष्करी परिणामकारकता कमी झाली. जुल्फिकार खानला मिळालेल्या अत्याधिक सत्तेमुळे जहांदर शाहांनी त्याच्याविरुद्ध कट रचला, ज्याच्यामुळे राजकीय अराजकता निर्माण झाली. [१६]

त्यांच्या कारकिर्दीत, जहांदर शाहांनी त्यांची प्रिय लाल कुंवर यांच्याशी लग्न केले, ती त्यांची आवडती बायको झाली आणि त्यानंतर तिच्या कुटुंबाला अभूतपूर्व शक्ती आणि प्रतिष्ठा मिळाली. जहांदर शाह मेजवान्या आणि मनोरंजनांमध्येही रमून जात होते. समकालीन इतिहासकारांनी आणि नंतरच्या इतिहासकारांनी बादशाहांच्या वैयक्तिक जीवनातील अशा बाबी आणि त्यांच्या विरोधकांना दिलेली क्रूरता, ही त्यांच्या कारकिर्दीतील अशांततेमागील कारणे म्हणून निदर्शनास आणली आहेत. तथापि, अलीकडील विद्वान इतर घटकांनाही जवाबदारी ठेवतात; मुनिस फारुकी यांनी राजकुमार म्हणून त्यांची राजकीय कमजोरी अधोरेखित केली आहे, ज्याच्यामुळे ते एक शासक म्हणून अयशस्वी ठरले. अभिषेक कैकर नोंद करतात की जहांदर शाहांच्या राज्यारोहणाच्या सुमारास सरदार स्वतःच अधिक स्वार्थी झाले होते आणि त्यांच्या कारकिर्दीतील "क्रूरता" हे जहांदर शाहांना पदच्युत करणाऱ्या फर्रुख सियरची बाजू घेण्याचे त्यांचे समर्थन होते. [१६] [१७] [१८]

पदच्युत

[संपादन]

जहांदर शाहांच्या राज्यारोहणामुळे त्यांचा पुतण्या फर्रुख सियर, जे बंगालमध्ये वास्तव्यास असलेल्या अजीमुश्शानचे पुत्र होते, त्यांच्याकडून आव्हान मिळाले. स्वतःची फारशी संसाधने नसल्यामुळे, त्यांनी आपल्या राज्यारोहणाच्या प्रयत्नांसाठी पाठिंबा मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शेवटी त्यांना सय्यद बंधू, हुसैन अली खान आणि अब्दुल्ला खान, जे अजीमुश्शानचे प्रशासक होते आणि ज्यांना जहांदर शाहांनी त्यांच्या पदावरून हटवले होते, यांचा मोठा पाठिंबा मिळाला. [१९] [१३] आपल्या संसाधनांचा आणि राजकीय संबंधांचा प्रयोग करून, फर्रुख सियरने एक बंडखोर सैन्य जमवले आणि सिंहासनाकडे कूच केली. कमी पगारावर असलेल्या शाही सैन्याचा १७१३ च्या सुरुवातीला आग्राजवळच्या लढाईत पराभव झाला. [२०]

मृत्यू

[संपादन]

पराभवानंतर, जहांदर शाह दिल्लीला पळून गेले आणि जुल्फिकार खान व त्यांचे वडील असद खान यांच्या घरी आश्रय घेतला. तथापि, त्या दोघांनीच त्यांना तुरुंगात टाकले आणि फर्रुख सियरची मर्जी मिळवण्याच्या आशेने त्याच्या हवाली केले. फर्रुख सियरने जहांदर शाह आणि जुल्फिकार खान या दोघांनाही फाशी दिली, ज्यात जहांदर शाहांना मारहाण करून ठार मारले आणि नंतर ११ फेब्रुवारी, १७१३ रोजी त्यांचा शिरच्छेद केला.[२१] [२२] [२३] जहांदर शाहांच्या मृताचे तुकडे करून, दोन हत्तींवर उलटे लटकवून दिल्लीभर मिरवणूक काढली. [२४] त्यांना हुमायूनच्या कबरीत दफन केले. [२१]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

जहांदर शाहांची पहिली बायको मिर्जा मुकर्रम खान सफवी यांची मुलगी होती. लग्न १३ ऑक्टोबर १६७६ रोजी झाले होते. [२५] तिच्या मृत्यूनंतर त्यांनी तिची भाची, मिर्जा रुस्तम यांची मुलगी सय्यद-उन-निसा बेगम हिच्याशी लग्न केले. हे लग्न ३० ऑगस्ट १६८४ रोजी झाले होते. [२६] काजी अबू सईद यांनी बादशाह औरंगजेब आणि राजकुमार मुहम्मद मुअज्जम (नंतरचे पहिले बहादूर शाह) यांच्या उपस्थितीत त्यांचे लग्न लावून दिले. [२७] १८ सप्टेंबर रोजी लग्न संपन्न झाला. सय्यद-उन-निसा बेगम यांना ६७,००० रुपयांचे दागिने भेट दिले. या सोहळ्याचे पर्यवेक्षण राजकुमारी जीनत-उन-निसा बेगम यांनी केले होते. [२८]

अजून एक बायको अनुपबाई होती. तिचा १७ एप्रिल १७३५ रोजी दिल्लीत मृत्यू झाला. [२९] [२६] इतिहासकार विल्यम इर्विनच्या मते, ती १६८७-८८ मध्ये जन्मलेल्या राजकुमार मुहम्मद अजीजुद्दिन मिर्जाची आई होती, जे दुसरे आलमगीर नावात सिंहासनावर बसला. [२६] तथापि, आलमगीरच्या कारकिर्दीतील समकालीन स्रोतांनुसार, त्यांच्या आईचे नाव मुअज्जमाबादी महल होते. [३०] अजून एक बायको खसुसियात खानांची मुलगी लाल कुंवर होती. [३१] जहांदर शाहांना ती खूप आवडत असे आणि राज्यारोहणानंतर त्यांनी तिला इम्तियाज महल ही पदवी दिली. [२६]

पूर्ण शीर्षक

[संपादन]

शहंशाह-इ-गाजी अबूल फतह मुइज्जुद्दिन मुहम्मद जहांदार शाह साहिब-इ-किरान पादशाह-ए-जहां (खुल्द आरामगाह) हे त्यांचे संपूर्ण शीर्षक होते. [ <span title="This claim needs references to reliable sources. (February 2024)">संदर्भ आवश्यक</span> ]

नाणी

[संपादन]

जहांदर शाहांनी पुन्हा दोहे नाणी आणले आणि सोने, चांदी व तांबे असे नाणी जारी केली. अबू अल-फतेह आणि सहाब किरन हे दोन दोहे वापरले. तांब्याची नाणी २० ग्रॅम आणि १४ ग्रॅम या दोन्ही वजन मानकांमध्ये जारी केली. [ <span title="This claim needs references to reliable sources. (June 2017)">संदर्भ आवश्यक</span> ]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Richards 1993, पान. 261.
  2. ↑ Irvine 1922, पान. 240.
  3. ↑ Irvine 1922, पान. 241.
  4. ↑ Lal 1989, पान. 28.
  5. ↑ Faruqui 2012, पान. 287.
  6. ↑ Faruqui 2012, पान. 70.
  7. ↑ Faruqui 2012, पान. 299.
  8. ↑ Bilimoriya 1908, पान. 75.
  9. ↑ Faruqui 2012, पान. 311.
  10. ↑ Irvine 1922, पान. 36.
  11. ↑ Faruqui 2012, पान. 312.
  12. 1 2 Faruqui 2012, पान. 310 & 315-317.
  13. 1 2 3 Markovits, George & Hendry 2002.
  14. ↑ Chandra 2002, पान. 107.
  15. ↑ Faruqui 2012, पान. 318.
  16. 1 2 Markovits, George & Hendry 2002, पाने. 174–175.
  17. ↑ Faruqui 2012.
  18. ↑ Kaicker 2020, पाने. 187–189.
  19. ↑ Faruqui 2012, पान. 319.
  20. ↑ Eaton 2019.
  21. 1 2 Irvine 1922, पाने. 236–256.
  22. ↑ Nigam 1983.
  23. ↑ Montgomery-Massingberd 1977.
  24. ↑ Alam 2013.
  25. ↑ Sarkar 1947, पान. 93.
  26. 1 2 3 4 Irvine 1922, पान. 242.
  27. ↑ Sarkar 1947, पान. 151.
  28. ↑ Sarkar 1947, पान. 152.
  29. ↑ Mirza 1960, पान. 92.
  30. ↑ Kulkarni 2005, पान. 154 & 160.
  31. ↑ Irvine 1922, पान. 180.

संदर्भसूची

[संपादन]
  • Alam, Muzaffar (2013). The Crisis of Empire in Mughal North India: Awadh and Punjab, 1707-48 (Second ed.). New Delhi: Oxford University Press. ISBN 978-0-19-908238-4. OCLC 847731660.
  • Bilimoriya, Jamshedji Hormasji (1908). Ruka'at-i-Alamgiri; or, Letters of Aurungzebe, with historical and explanatory notes. London: Luzac.
  • Chandra, Satish (2002). Parties and politics at the Mughal Court, 1707-1740 (4th ed.). New Delhi: Oxford University Press. p. 107. ISBN 0-19-565444-7. OCLC 50004530.
  • Eaton, Richard Maxwell (2019). India in the Persianate Age, 1000-1765. London: Allen Lane. ISBN 978-0-7139-9582-4. OCLC 1103492435.
  • Princes of the Mughal Empire, 1504–1719
  • Irvine, William (1922). Sarkar, Jadunath (ed.). Later Mughals. 1 1707-1720. London: Luzac. OCLC 698290839.
  • Kaicker, Abhishek (2020). The king and the people : sovereignty and popular politics in Mughal Delhi. New York, NY: Oxford University Press. ISBN 978-0-19-007070-0. OCLC 1114271590.
  • Lal, Muni (1989). Mini Mughals. Delhi: Konark Publishers. OCLC 610435140.
  • Markovits, Claude; George, Nisha; Hendry, Maggy (2002). A history of modern India, 1480-1950. London: Anthem Press. OCLC 606753485.
  • Mirza, Mohammad bin Rustam (1960). Tarikh-i-Muhammadi. II. Syed Noor-ul-Hassan.
  • Montgomery-Massingberd, Hugh (1977). Burke's Royal Families of the World. II. Burke's Peerage. ISBN 978-0-85011-029-6.
  • Nigam, S. B. P. (1983). The Jahandarnamah of Nur- ud-rin. Journal of Indian History. 61. Department of Modern Indian History.
  • Richards, John F, ed. (1993). The Mughal Empire. Cambridge University Press.
  • Sarkar, Jadunath (1947). Maasir-i-Alamgiri: A History of Emperor Aurangzib-Alamgir (reign 1658–1707 AD) of Saqi Mustad Khan. Royal Asiatic Society of Bengal, Calcutta.
  • Kulkarni, G.T. (2005). "The world's first ever news selling agency". In Bagchi, Amiya Kumar; Sinha, Dipankar; Bagchi, Barnita (eds.). Webs of history: information, communication, and technology from early to post-colonial India. ISBN 978-8-173-04613-1.
जहांदर शाह
मागील
{{{before}}}
{{{title}}}
{{{years}}}
पुढील
{{{after}}}
  1. ↑ अर्थ: जगद्मालक
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.