जहाँआरा बेगम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१६३५मध्ये काढलेले जहॉंआरा बेगमचे चित्र
१६३५मध्ये काढलेले जहॉंआरा बेगमचे चित्र

जहॉंआरा बेगम (२३ मार्च, १६१४ - १६ सप्टेंबर, १६८१) ही मुघल सम्राट शाह जहान आणि मुमताज महल यांची कन्या होती. ही औरंगजेबाची थोरली बहीण होती. दिसायला अतिशय सुंदर असलेल्या जहानआराला अरबी व फारसी भाषा येत होत्या. वडिलांची ती अतिशय लाडकी होती. ती वडिलांची देखभाल करीत असे, राज्याविषयी सल्लेही देत असे.शाह जहानला ती विशेष प्रिय असल्याचे सांगितले जाते.

सम्राट अकबराने राजकन्यांविषयी केलेल्या नियमांनुसार तिचे लग्न झालेले नव्हते.

औरंगजेब व तिचे संबंध कधीच सौहार्दाचे नव्हते. तिचा जीव दाराशुकोहवर जास्त होता. शाहाजहाननंतर तो मोगल साम्राज्याचा वारस बनावा, यासाठी तिचा प्रयत्‍न होता; पण औरंगजेबाने दाराशुकोहचा काटा काढला आणि मोगल बादशहा बनण्याचा मार्ग मोकळा केला.

जहानआराने आयुष्यात अनेक दुःखे भोगली. जवळच्या माणसांचे मृत्यू पाहिले; पण मोगल साम्राज्यासाठी ती कायम कणखर राहिली. प्रियकराविषयी तिच्या मनातील भावना तिने कधीच व्यक्त केल्या नाहीत.

मोगल राजघराण्यातील स्त्रियांप्रमाणेच ती अविवाहित राहिली.

जहान‍आरा बेगमविषयी पुस्तके आणि दृश्यमाध्यमे[संपादन]

  • जहानआराची कहाणी आन्द्रिया वुतेनशोएन या पाश्चात्य लेखिकेने कादंबरीरूपात लिहिली आहे. तिचे ’जहानआरा बेगम - कहाणी मुघल शाहजादीची’ या नावाचे मराठी रूपांतर सुहासिनी देशपांडे यांनी केले आहे. शाहजादी जहानआराची घुसमट, तडफड, वेदना असहाय्यता व उत्कट प्रेमभावना या कादंबरीतून व्यक्त होते.
  • पाकिस्तानी दूरचित्रवाणीवर ’हम सितारे’ या कार्यक्रमात जहान-आरा-बेगम ही दैनंदिन मालिका येत असे. हिचे १००हून अधिक एपिसोड झाले होते.
  • जहान आरा (हिंदी चित्रपट, १९६४, नायिका माला सिन्हा)
  • ताजमहाल : ॲन इटर्नल लव्ह स्टोरी (हिंदी चित्रपट, २००५, नायिका मनीषा कोईराला)
  • An Omen for a Princess (इंग्रजी कादंबरी, लेखिका - जीन बॉथवेल)
  • Beneath a Marble Sky, (इंग्रजी कादंबरी, लेखक - जॉन शॉर्स)
  • Jahanara: Princess of Princesses, India - 1627 : The Royal Diaries या ग्रंथ मालिकेतले एक इंग्रजी पुस्तक, लेखिका - कॅथरीन लास्की.
  • Shadow Princess (इंदू सुंदरेशन यांची इंग्रजी कादंबरी - २०१०)