Jump to content

जलद बस परिवहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जकार्ता, इंडोनेशिया मधील ट्रान्सजाकार्ता, जगातील सर्वात लांब BRT प्रणाली (264.6) किमी) []
ग्वाटेमाला सिटी, ग्वाटेमाला येथे ३०० प्रवाशांसाठी ३० मीटर लांबीची ट्रान्समेट्रो []

जलद बस परिवहन, ज्याला बसवे असेही म्हणतात, ही एक ट्रॉलीबस, इलेक्ट्रिक बस आणि सार्वजनिक वाहतूक बस सेवा प्रणाली आहे जी पारंपारिक बस प्रणालीपेक्षा जास्त क्षमता, विश्वासार्हता आणि इतर दर्जेदार वैशिष्ट्ये देण्यासाठी संकल्पलेली केलेली आहे. [] सामान्यतः, या प्रणालीमध्ये बससाठी समर्पित रस्ते समाविष्ट असतात आणि अशा चौकांवर बसेसना प्राधान्य दिले जाते जिथे बसेस इतर वाहतुकीशी संवाद साधू शकतात; तसेच प्रवाशांना बसमध्ये चढणे किंवा सोडणे किंवा भाडे भरणे यामुळे होणारा विलंब कमी करण्यासाठी संकल्पनेत वैशिष्ट्ये देखील समाविष्ट आहेत. जलद बस परिवहनाचे उद्देश लघुभार रेल्वे परिवहन किंवा प्रपुंज जाला परिवहन सिस्टीमची क्षमता आणि वेग बसची सुनम्यता, कमी किंमत आणि साधेपणासह एकत्रित करणे आहे.

वापरीची कारणे

[संपादन]

लघुभार रेल्वे सारख्या इतर सामान्य परिवहन पद्धतींच्या तुलनेत, जलद बस परिवहन सेवा अधिकाऱ्यांसाठी आकर्षक आहे कारण या प्रणालीची स्थापना करण्यासाठी आणि याला चालवण्यासाठी जास्त खर्च येत नाही. याकरिता कोणतेही रुळ टाकण्याची आवश्यकता नाही, बस चालकांना सामान्यतः रेल्वे चालकांपेक्षा कमी प्रशिक्षण आणि कमी पगारा असतात आणि बस देखभाल रेल्वे देखभालीपेक्षा कमी जटिल असते. [ <span title="This claim needs references to reliable sources. (December 2021)">संदर्भ आवश्यक</span> ]

शिवाय, कमी संसाधनांच्या गुंतवणूकीसह बदलत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी किंवा प्रतिकूल रस्त्यांच्या परिस्थितीशी झुंजण्यासाठी बस मार्ग तात्पुरता किंवा कायमचा बदलता येण्यामुळे रेल्वे वाहनांपेक्षा बस अधिक सुनम्य असतात. []

मुख्य वैशिष्ट्ये

[संपादन]

समर्पित मार्ग आणि संरेखन

[संपादन]
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ट्रान्सजाकार्ता बस वेगळ्या लेनचा वापर करतात.
च्यामेनमध्ये उन्नत जलद बस परिवहन प्रणाली

रस्त्यांवर फक्त बससाठी असलेल्या वीथीमार्गामुळे प्रवास जलद होतो आणि मिश्र वाहतूक कोंडीमुळे बसेसना उशीर होणार नाही याची खात्री होते. च्यामेन सारखा पूर्णपणे उंचावलेला वेगळा मार्गाधिकार वापरला जाऊ शकतो.

वाहनाबाहेरील भाडे संकलन

[संपादन]

बसमध्ये बसण्याऐवजी स्थानकावर भाडे भरणा केल्याने प्रवाशांनी बसमध्ये पैसे भरतांना होणारा विलंब दूर होतो. स्थानकांवरील भाडेपट्टा मशीनींमुळे प्रवास्यांना मल्टी-राईड भाडे बहराचे अनेक मार्ग उपलब्ध होतात. यामुळे स्थानकांवर थांबा कमी वेळ घेता येतो[].

फलाट-पातळीवर बोर्डिंग

[संपादन]
ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील सांस्कृतिक केंद्र बसवे स्थानक

जलद बस परिवहनप्रणालीसाठी स्थानिकांचे फलाट बसच्या तळाशी समतल असतात जेणेकरून बसमध्ये जलद आणि सहज चढता येते, ज्यामुळे व्हीलचेअर, अपंग प्रवासी आणि बाबागाड्यांना कमीत कमी विलंबासह पूर्णपणे प्रवेशयोग्यता मिळेल.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Koridor". Transjakarta.
  2. ^ "Volvo launches the world's largest bus". 25 November 2016.
  3. ^ "What is BRT?". Institute for Transportation and Development Policy. 24 July 2014.
  4. ^ Fjellstrom, Karl. "Mass Transit Options, 4.4:Flexibility". www.gtz.de. Deutsche Gesellschaft für Technische Zusammenarbeit. 24 February 2023 रोजी पाहिले.
  5. ^ Pryne, Eric (August 3, 2003). "When is a bus more like a train?". The Seattle Times. p. A1. December 7, 2003 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 15, 2025 रोजी पाहिले.