जर्मनीचा भूगोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युरोपियन संघामधील जर्मनीचे स्थान

जर्मनी हा पश्चिम-मध्य युरोपामधील एक देश आहे. जर्मनीच्या दक्षिणेस आल्प्स पर्वत तर उत्तरेस उत्तर समुद्रबाल्टिक समुद्र आहेत. जर्मनीचे एकूण क्षेत्रफळ ३,५७,०२१ चौ. किमी (१,३७,८४७ चौ. मैल) इतके असून त्यापैकी ३,४९,२२३ चौ. किमी (१,३४,८३६ चौ. मैल) इतकी जमीन तर ७,७९८ चौ. किमी (३,०११ चौ. मैल) इतके पाणी आहे. झुगपिट्स हे आल्प्समधील २,९६२ मी (९,७१८ फूट) उंचीचे शिखर जर्मनीमधील सर्वात उंच स्थान आहे. डॅन्युब, ऱ्हाईनएल्ब ह्या जर्मनीमधील प्रमुख नद्या आहेत.

जर्मनीच्या उत्तरेला डेन्मार्क, पूर्वेला पोलंडचेक प्रजासत्ताक, दक्षिणेला ऑस्ट्रियास्वित्झर्लंड, नैऋत्येला फ्रान्स तर पश्चिमेला बेल्जियम, लक्झेंबर्गनेदरलँड्स हे देश आहेत.


गुणक: 51°00′N 10°00′E / 51.00°N 10.00°E / 51.00; 10.00