Jump to content

महाराष्ट्र गीत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जय जय महाराष्ट्र माझा या पानावरून पुनर्निर्देशित)
महाराष्ट्र सरकारचे बोधचिन्ह

जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत आहे. [१] महाराष्ट्र राज्याचे गुणगान करणारे हे देशभक्तीपर गीत आहे. गाण्याचे मूळ बोल राजा बढे यांनी लिहिले असून संगीत श्रीनिवास खळे यांनी दिले होते. हे गीत लोकगायक कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी गायले होते. [२]हे गाणे महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणावर वापरले आणि वाजवले जाते. [२] मूळ गीत तीन कडव्यांचे आहे. तर राज्यगीत दोन कडव्यांचे आहे.

राज्यगीत[संपादन]

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गजर्तो शिव शंभू राजा

दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी

दारीद्र्यांच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

गीत : राजा बढे
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : शाहीर साबळे
Shahir_Sable
शाहीर साबळे

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Iconic 'Jai Jai Maharashtra Maza' proclaimed new State Song". 31 January 2023.
  2. ^ a b Jerry Pinto, Naresh Fernandes (2003). Bombay, Meri Jaan: Writings on Mumbai. Penguin Books. p. 237. ISBN 9780143029663.