जयंतीलाल पारेख
जयंतीलाल पारेख - (जन्म - २१ जून १९१३, मृत्यू - २६ जानेवारी १९९९) हे एक चित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. ते श्रीअरबिंदो आश्रमाच्या अभिलेखागार आणि संशोधन विभागाचे (Ashram Archives and Research Library) संस्थापक होते.[१] ते श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे अनुयायी होते.[२]
जीवन व कार्य
[संपादन]१९३० ते १९४० या कालावधीतील श्री अरविंद आश्रमाशी संबंधित महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या स्थळांची पेंटिग्जस पारेख यांनी काढलेली आहेत. २८ डिसेंबर १९३८ रोजी म्हणजे पंचविसाव्या वर्षी ते आश्रमाशी संबंधित झाले. सुमारे पन्नास वर्षे ते आश्रमाच्या छापखान्यात कार्यरत होते. १९७० साली श्री ऑरोबिंदो बर्थ सेन्टेनरी लायब्ररी हे खंड प्रकाशित करण्यात पारेख यांचा मोठा सहभाग होता.
१९७३ साली त्यांनी श्रीअरबिंदो आश्रमाच्या अभिलेखागार आणि संशोधन विभागाची स्थापना केली. [३]
श्रीअरविंद यांच्या जन्म शताब्दी निमित्त भारताच्या पोस्ट व टपाल खात्यातर्फे श्रीअरविंद यांचे तिकीट प्रकाशित करण्यात आले होते. त्याचे रेखाटन श्री. पारेख यांनी केले होते .[४]
प्रकाशित पुस्तक
[संपादन]जयंतीलाल्ज् करसपाँडन्स विथ द मदर - (१९३६ ते १९७० या कालावधीत पारेख यांचा श्री माताजींबरोबर जो पत्र व्यवहार झाला तो या पुस्तकात संकलित करण्यात आला आहे. )
ऑनलाइन उपलब्ध
[संपादन]पूरक वाचन
[संपादन]जयंतीलाल यांची प्रकाशित झालेली मुलाखत
संदर्भ
[संपादन]- ^ "Nirata: The Embodiment of 'Sincere Devotion' by Anurag Banerjee – Overman Foundation" (इंग्रजी भाषेत). 2025-03-16. 2025-04-12 रोजी पाहिले.
- ^ "Disciples of Sri Aurobindo and the Mother". intyoga.online.fr. 2025-04-13 रोजी पाहिले.
- ^ "Jayantilal Parekh - painter, founded Ashram Archives". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-04-13 रोजी पाहिले.
- ^ "SYMBOL OF SRI AUROBINDO". indianpost.com. 2025-04-13 रोजी पाहिले.[permanent dead link]