जगातील सात आश्चर्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जगातील सात आश्चर्य या पानावरून पुनर्निर्देशित)

जगातील सात आश्चर्ये ही पृथ्वीवरील अद्भुत (व काही अंशी काल्पनिक) अशा नैसर्गिक किंवा बांधल्या गेलेल्या ठिकाणे/वास्तू ह्यांची यादी आहे. संपूर्ण इतिहासात, अशा विविध आश्चर्यांची यादी तयार केली गेली आहे आणि लोकांनी ती स्वीकारली आहे. खाली अशा विविध याद्यांचा सारांश आहे.

प्राचीन जगतातील सात आश्चर्ये[संपादन]

पुरातन काळातील सात आश्चर्ये.

पुरातन काळातील सात आश्चर्ये मध्ये खालील आश्चर्यांचा समावेश होतो. ही यादी ग्रीक इतिहासकार हिरोडोटस आणि विद्वान कॅलिमाचस यांनी बनवली होती.[१]

याशिवाय, संपूर्ण मध्य युगात, इतर विविध ठिकाणे देखील जगातील आश्चर्य मानली जात होती.[२][३][४]

आधुनिक जगातील सात आश्चर्ये[संपादन]

मानवनिर्मित बांधकामे[संपादन]

अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनिअर्सने १९९४ मध्ये मानवनिर्मित बांधकामांचे सात आश्चर्ये जाहिर केले.[५][६]

आश्चर्य बांधकाम सुरुवात उद्घाटन ठिकाण चित्र
चॅनल टनेल १ डिसेंबर १९८७ ६ मे १९९४ डोव्हरची सामुद्रधुनी
सी.एन. टॉवर ६ फेब्रुवारी १९७३ २६ जून १९७६ टोरॉंटो, कॅनडा
एम्पायर स्टेट बिल्डिंग २२ जानेवारी १९३० मे १९३१ न्यू यॉर्क शहर, अमेरिका
गोल्डन गेट ब्रिज ५ जानेवारी १९३३ २७ मे १९३७ सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका
इटाइपू धरण जानेवारी १९७० ५ मे १९८४ पाराना नदी, ब्राझिलपेराग्वे दरम्यान
डेल्टा कार्य आणि झॉयडरझी कार्या १९२० १० मे १९९७ नेदरलँड्स
पनामा कालवा १ जानेवारी १८८० ७ जानेवारी १९१४ पनामा

यूएसए टुडे नवीन सात आश्चर्ये[संपादन]

नोव्हेंबर २००६ मध्ये, अमेरिकन वृत्तपत्र "यूएसए टुडे" ने नवीन सात आश्चर्ये प्रकाशित केली. यात नैसर्गिक आश्चर्ये आणि मानवनिर्मित आश्चर्ये दोन्ही समाविष्ट होते. लोकांच्या आग्रहास्तव ह्या यादीत ग्रँड कॅनियनचा समावेश करण्यात आला.[७][८]

आश्चर्य ठिकाण चित्र
पोताला महाल तिबेट
जेरुसलेमचे जुने शहर इस्रायल ध्वज इस्रायल
ध्रुवीय बर्फ पृथ्वीचे ध्रुवीय प्रदेश (आर्क्टिक आणि अंटार्क्टिक)
पापहानौमोकुआकेआ सागरी राष्ट्रीय स्मारक Flag of the United States अमेरिका
महाजाल जगभर
माया संस्कृतीचे अवशेष मेक्सिको ध्वज मेक्सिको
सेरेनगेटी आणि मासाई मारा येथील महान स्थलांतर टांझानिया टांझानिया आणि केन्या केन्या
ग्रँड कॅनियन Flag of the United States अमेरिका

जगातील सात नैसर्गिक आश्चर्ये[संपादन]

१९९७ मध्ये सीएनएनने जगातील सात नैसर्गिक आश्चर्यांची यादी संकलित केली.[९]

आश्चर्य ठिकाण चित्र
ध्रुवीय प्रकाश पृथ्वीचे ध्रुवीय प्रदेश (आर्क्टिक आणि अंटार्क्टिक)
ग्रँड कॅनियन Flag of the United States अमेरिका
ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
गुआनाबारा खाडी ब्राझील ध्वज ब्राझिल
एव्हरेस्ट नेपाळ नेपाळचीन चीन
पारिकुटीन ज्वालामुखी मेक्सिको ध्वज मेक्सिको
व्हिक्टोरिया धबधबा झांबिया झांबियाझिम्बाब्वे झिम्बाब्वे

न्यू७ वंडर्स याद्या[संपादन]

२००१ मध्ये, स्विस कॉर्पोरेशन न्यू७ वंडर्स फाऊंडेशनने ऑनलाइन मतांद्वारे २०० विद्यमान स्मारकांमधून जगातील नवीन सात आश्चर्ये निवडण्यासाठी एक उपक्रम सुरू केला. त्यानंतर त्यांनी अनेक असे "नवीन सात निसर्गाचे आश्चर्य" (२००७-११) आणि "नवीन सात आश्चर्य शहरे" (२०११-१४) चे देखील आयोजन केले.

जगातील सात नवी आश्चर्ये[संपादन]

२००७ साली जगभर झालेल्या मतदानातून खालील सात आधुनिक आश्चर्यांची निवड करण्यात आली.[१०][११][१२]

आश्चर्य ठिकाण चित्र
चिचेन इट्झा मेक्सिको युकाटन, मेक्सिको एल कॅस्टिलो
ख्रिस्ट द रिडीमर ब्राझील रियो दि जानेरो, ब्राझिल
ख्रिस्ट द रिडीमर पुतळा
ख्रिस्ट द रिडीमर पुतळा
कलोसियम इटली रोम, इटली कलोसियम
चीनची भिंत चीन चीन चीनची भिंत
माचु पिच्चु पेरू कुझको, पेरू
माचु पिच्चु
माचु पिच्चु
पेट्रा जॉर्डन जॉर्डन
पेट्रा येथील कोषागार
पेट्रा येथील कोषागार
ताज महाल भारत आग्रा, भारत ताज महाल
गिझाचा भव्य पिरॅमिड † - मानाचे स्थान इजिप्त कैरो, इजिप्त खुफूचा पिरॅमिड

नवीन सात निसर्गाचे आश्चर्य[संपादन]

आश्चर्य ठिकाण चित्र
इग्वाझू धबधबा आर्जेन्टिना आर्जेन्टिना आणि ब्राझील ब्राझिलच्या सीमेवर
हा लाँग बे व्हियेतनाम ध्वज व्हिएतनाम
जेजू बेट दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
प्वेर्तो प्रिन्सेसा भूमिगत नदी Flag of the Philippines फिलिपिन्स
टेबल माउंटन दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
कोमोडो बेट इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
ॲमेझॉन वर्षावन दक्षिण अमेरिका

नवीन सात आश्चर्य शहरे[संपादन]

आश्चर्य ठिकाण चित्र
डर्बन दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
विगन Flag of the Philippines फिलिपिन्स
हवाना क्युबा ध्वज क्युबा
क्वालालंपुर मलेशिया ध्वज मलेशिया
बैरूत लेबेनॉन ध्वज लेबेनॉन
दोहा कतार ध्वज कतार
ला पाझ बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया

पाण्याखालील जगाची सात आश्चर्ये[संपादन]

समुद्र संरक्षण आणि संशोधनासाठी समर्पित असलेल्या डायव्हर्ससाठी अमेरिकन-आधारित गट, CEDAMने "पाण्याखालील जगाची सात आश्चर्यांची" यादी तयार केली आहे. १९८९ मध्ये, CEDAM ने युजेनी क्लार्कसह सागरी शास्त्रज्ञांचे एक पॅनल एकत्र आणले व संरक्षणासाठी योग्य वाटतील अशी पाण्याखालील क्षेत्रे निवडली.[१३]

आश्चर्य ठिकाण चित्र
पलाउ पलाउ ध्वज पलाउ
बेलीझ बॅरियर रीफ बेलीझ ध्वज बेलीझ
ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
उष्णजलीय छिद्र जगभर
बैकाल सरोवर रशिया ध्वज रशिया
गॅलापागोस बेटे इक्वेडोर ध्वज इक्वेडोर
लाल समुद्र इजिप्त इजिप्त, सौदी अरेबिया सौदी अरेबिया,
यमनचे प्रजासत्ताक येमेन, इरिट्रिया इरिट्रिया,
सुदान सुदान, जिबूती जिबूती

औद्योगिक जगतातील सात आश्चर्ये[संपादन]

ब्रिटिश लेखिका डेबोरा कॅडबरी यांनी औद्योगिक जगाचे सात आश्चर्य लिहिले, हे पुस्तक १९ व्या आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या अभियांत्रिकीच्या सात महान पराक्रमांच्या कथा सांगणारे पुस्तक आहे. २००३ मध्ये, बीबीसीने सात भागांचा माहितीपट प्रसारित ज्याच्या निर्माता कॅडबरी होत्या.[१४][१५]

आश्चर्य ठिकाण चित्र
एस.एस. ग्रेट ईस्टर्न इंग्लंड ध्वज इंग्लंड
बेल रॉक दीपगृह स्कॉटलंड ध्वज स्कॉटलंड
ब्रुकलिन ब्रिज Flag of the United States अमेरिका
लंडनची सांडपाणी व्यवस्था इंग्लंड ध्वज इंग्लंड
पहिला ट्रान्सकॉन्टिनेंटल रेल्वेमार्ग Flag of the United States अमेरिका
पनामा कालवा पनामा ध्वज पनामा
हूवर धरण Flag of the United States अमेरिका

सूर्यमालेचे सात आश्चर्य[संपादन]

१९९९ च्या एका लेखात, खगोलशास्त्र या अमेरिकन मासिकाने "सूर्यमालेचे सात आश्चर्य" सूचीबद्ध केले.[१६]

आश्चर्य ठिकाण चित्र
एन्सेलाडस शनी ग्रहाचा उपग्रह
ग्रेट लाल ठिपके गुरू ग्रह
लघुग्रह पट्टा मंगळ आणि गुरू ग्रहाच्या दरम्यान
फोटोस्फीअर सूर्याचा पृष्ठभाग
पृथ्वीवरील महासागर पृथ्वी
शनीच्या कड्या शनी ग्रह
ऑलिंपस मॉन्स मंगळ ग्रह

हे देखील पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Clayton, Peter; Martin J. Price (1990). The Seven Wonders of the Ancient World. Routledge. p. 4. ISBN 978-0-415-05036-4.
  2. ^ Evans, I H (reviser (1975). Brewer's Dictionary of Phrase and Fable (Centenary edition Fourth impression (corrected) ed.). London: Cassell. p. 1163.
  3. ^ Latham, Edward (1904). A Dictionary of Names, Nicknames and Surnames, of Persons, Places and Things. p. 280. OCLC 01038938.[permanent dead link]
  4. ^ Miller, Francis Trevelyan (1915). America, the Land We Love. p. 201. OCLC 00334597. Archived from the original on December 1, 2020. October 16, 2020 रोजी पाहिले. Excerpts from speeches by Woodrow Wilson, William H. Taft, and Theodore Roosevelt.
  5. ^ "American Society of Civil Engineers Seven Wonders". ASCE.org. July 19, 2010. Archived from the original on August 2, 2010. August 30, 2010 रोजी पाहिले.
  6. ^ American Society of Civil Engineers. "Seven Wonders of the Modern World". ASCE.org. Archived from the original on 2010-04-02.
  7. ^ "New Seven Wonders panel". USA Today. October 27, 2006. July 31, 2010 रोजी पाहिले.
  8. ^ Clark, Jayne (December 22, 2006). "The world's 8th wonder: Readers pick the Grand Canyon". USA Today. Archived from the original on June 19, 2012. May 3, 2013 रोजी पाहिले.
  9. ^ "Natural Wonders". CNN. November 11, 1997. Archived from the original on July 21, 2006. July 31, 2010 रोजी पाहिले.
  10. ^ "The multimedia campaign to choose the New 7 Wonders of the World is in its final stage". New7Wonders. Archived from the original on January 3, 2007. 10 June 2015 रोजी पाहिले.
  11. ^ "Egypt's pyramids out of seven wonders contest". Daily News Egypt. April 20, 2007. Archived from the original on June 25, 2018. 25 June 2018 रोजी पाहिले.
  12. ^ "Reuters via ABC News Australia "Opera House snubbed as new Wonders unveiled" 7 July 2007". Australia: ABC. July 8, 2007. Archived from the original on June 29, 2011. July 31, 2010 रोजी पाहिले.
  13. ^ "Underwater Wonders of the World". Wonderclub. Archived from the original on जून 13, 2017. ऑगस्ट 31, 2010 रोजी पाहिले.
  14. ^ Cadbury, Deborah (17 February 2011). "British History in Depth: Seven Wonders of the Industrial World". Archived from the original on December 27, 2019. 2015-03-25 रोजी पाहिले.
  15. ^ Kumar, Manjit (7 November 2003). "Review: Seven Wonders of the Industrial World by Deborah Cadbury". The Guardian. Archived from the original on September 21, 2016. December 13, 2016 रोजी पाहिले.
  16. ^ "Seven Wonders of the Solar System Video". Aaa.org. 1999. Archived from the original on April 1, 2014. 2014-02-22 रोजी पाहिले.