Jump to content

छोटी फटाकडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चिमण फटाकडी
Porzana parva

छोटी फटाकडी किंवा चिमण फटाकडी (इंग्लिश:little crake) हा लावा या पक्ष्यासारखा दिसणारा पक्षी आहे.

ओळखण[संपादन]

हा पक्षी दलदलीत सापडतो. डोकेडोळे यातील मधला भाग, डोक्याची बाजू आणि मानेवरील रंग गर्द राखी-करडा असतो. डोळे आणि मानेचा मध्यभाग तांबूस झाक असलेला गर्द तपकिरी व इतर भाग तपकिरी असतो. त्यावर अस्पष्ट अशा अरुंद पांढऱ्या रेषा असतात. पाठीवरच्या भागावर काळ्या रेषा, हनुवटीचा खालील भाग, गळा आणि इतर भाग गर्द राखी करडा असतो. पोटाखाली पांढऱ्या पट्ट्या असतात. मादीचे डोके आणि डोळा यांतील मधला भाग आणि तोंड फिकट उदी असते. एवढा अपवाद सोडला तर नर आणि मादी सारखेच असतात.

निवासस्थाने[संपादन]

बोरुची बेटे असणाऱ्या ठिकाणी निवास करतात.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली