चौसष्ट प्राचीन भारतीय लिपि

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इतिहास[संपादन]

वर्ण किंवा ध्वनी यांचे लेखन करण्यासाठी जी चिह्ने वापरतात त्या चिह्न समूहाला 'लिपी'असे म्हटले जाते.एका चिह्नापासून जेन्हां एकाच ध्वनीचा बोध होतो तेंव्हा ध्वनीचा बोध सफल होतो. प्रारंभी माणूस आपले विचार साध्या रेषा आखून व्यक्त करात असे. नंतर त्यातून चित्रे आकार घेवू लागली. त्यातून तो आपला आशय व्यक्त करू लागला.चित्रलिपी हा लिपीच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा मानला जातो.[१] वैदिक लोकांनी गणन व लेखन या बाबत प्रगती केलेली होती. पाणीनीच्या अष्टाध्यायी ग्रंथात लिपी,लिबी,ग्रंथ या शब्दांचा वापर केलेला दिसतो.यवनानी असा शब्द यवन लोकांच्या लिपीसाठी वापरलेला दिसतो. ब्राह्मी,राठोडी,देवनागरी या लिपी डावीकडून उजवीकडे लिहितात तर उर्दू,फारसी या लिपी उजवीकडून डावीकडे लिहितात.[२]

चौसष्ट प्राचीन भारतीय लिपी-[संपादन]

१ ब्राह्मी लिपि, २ खरोष्टी, ३ पुष्करसारी, ४ अंग, ५ वंग, ६ मगध, ७ मांगल्य, ८ मनुष्य, ९ अंगुलीय, १० शकरी, ११ ब्रह्मवल्ली, १२ द्राविड, १३ कनारि, १४ दक्षिण, १५ उग्र, १६ संख्या, १७ अनुकोम, १८ ऊर्ध्वधनु, १९ दरद, २० स्वास्य, २१ चीन, २२ हूण, २३ मध्याक्षरविस्तर, २४ पुष्प, २५ देव, २६ नाग २७ यक्ष, २८ गंधर्व, २९ किन्नर, ३० महोरग, ३१ असुर, ३२ गरुड, ३३ मृगचक्र, ३४ चक्र, ३५ वायुमरु, ३६ मौमदेव, ३७ अंतरिक्षदेव, ३८ उत्तरकुरूद्वीप, ३९ अपगौडादि, ४० पूर्वविदेह, ४१ उत्क्षेप, ४२ निक्षेप, ४४ प्रक्षेप ४५ सागर, ४६ बज्र, ४७ लेखप्रतिलेख, ४८ अनुद्रुत, ४९ शास्त्रवर्त, ५० गणावर्त, ५१ उत्क्षेपावर्त, ५२ विक्षेपावर्त, ५३ पादलिखित, ५४ द्विरुत्तरपद संधिलिखित, ५५ दशोत्तरपदलिखित, ५६ अध्याहरिणी, ५७ सर्वरुत्संग्रहणी, ५८ विद्यानुलोम, ५९ विमिश्रित, ६० ऋषितपस्तप्त, ६१ धरिणीप्रेक्षणा, ६२ सर्वोषधनिष्यन्द, ६३ सर्वसारसंग्रहणी आणि ६४

सर्वभूतऋदग्रहणी (ललितविस्तर अ. १०) या सर्व लिपी मूळ ब्राह्मी लिपीपासूनच निघाल्या आहेत असें म्हणतात. यांतील बरीचशीं नांवें कल्पित आहेत असें पंडित गौरीशंकर ओझा हे आपल्या " भारतीय प्राचीन लिपिमाला " ह्या ग्रंथांत म्हणतात.

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड आठवा
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड आठवा