चैनसुख मदनलाल संचेती
Appearance
| चैनसुख मदनलाल संचेती | |
| मतदारसंघ | मलकापूर |
|---|---|
| जन्म | १६ डिसेंबर, १९५३ |
| राजकीय पक्ष | भाजप |
| आई | मदनबाई संचेती |
| वडील | मदनलाल संचेी |
| पत्नी | उज्ज्वला संचेती |
| नाते | किसनलाल संचेती (काका) |
| अपत्ये | रक्षा संचेती आणि इतर ३ |
| शिक्षण | बीएससी, एमएससी (रसायशास्त्र) |
चैनसुख मदनलाल संचेती (१६ डिसेंबर, १९५३) हे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे एक राजकारणी आहेत. १९९५ पासून मलकापूर विधानसभा मतदारसंघातून ते महाराष्ट्राच्या १०व्या, ११व्या, १२व्या, १४व्या आणि १५व्या विधानसभांवर निवडून गेले. ते विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष होते. [१]
संचेती यांचा जन्म मदनलाल आणि मदनबाई संचेती यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील आणि काका जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते आणि भारतीय जनता पक्षाचे संस्थापक सदस्य होते. त्यांचे काका किसनलाल संचेती हे देखील मलकापूरचे आमदार होते.