Jump to content

चिरंजीवी (अभिनेता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चिरंजीवी
तेलुगू: చిరంజీవి
तमिळ: சிரஞ்சீவி
जन्म कोणिदेल शिवशंकर वरप्रसाद
२२ ऑगस्ट, १९५५ (1955-08-22) (वय: ६९)
भारत मोगल्तूरु, आंध्रप्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता, राजकारण
कारकीर्दीचा काळ १९७७ - आजपर्यंत
भाषा तेलुगू
प्रमुख चित्रपट प्रतिबंध (हिंदी चित्रपट)
पुरस्कार पद्मभूषण (२००६)[]
वडील कोणिदेल वेंकटरावु
आई अंजना देवी
पत्नी
सुरेखा कोणिदेल (ल. १९८०)
अपत्ये राम चरण
श्रीज
नातेवाईक अल्लू रामलिंगय्या, अल्लू अर्जुन, नागबाबू, पवन कल्याण
टिपा
दक्षिणात्य चित्रपट कलाकार

चिरंजीवी (२२ ऑगस्ट,१९५५) हा एक दक्षिणात्य चित्रपट कलाकार असून त्याने मुख्यतः तेलुगु आणि हिंदी चित्रपटात अनेक भूमिका साकारल्यात. चिरंजीवीचे जन्म नाव कोणिदेल शिवशंकर वरप्रसाद असून त्यांच्या वडिलांचे नाव कोणिदेल वेंकटरावु असे आहे.

कारकीर्द

[संपादन]

चिरंजीवी ने इ.स. १९७८ मध्ये तेलुगू चित्रपटपुनधीरल्लू मध्ये काम करत सिनेजगतात पहिले पाऊल टाकले. तर इ.स. मध्ये प्रतिबंध नामक हिंदी चित्रपटाद्वारे बॉलीवूड मध्ये प्रवेश केला.[]. दक्षिणात्य चित्रपट सृष्टीत यशस्वी कारकीर्द गाजवून इ.स. २००८ मध्ये प्रजाराज्यम राजकीय पक्षाची स्थापना केली.

प्रमुख चित्रपट

[संपादन]
  • इंद्रा - द टायगर (हिंदी भाषांतरित)
  • आदमी और अप्सरा (हिंदी भाषांतरित)
  • द जेंटलमॅन (पुनर्निर्माण)
  • प्रतिबंध (पुनर्निर्माण)
  • आज का गूंडाराज (पुनर्निर्माण)

पुरस्कार

[संपादन]

चिरंजीवी यांना विविध प्रकारचे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांना मिळालेल्या भारतातील फिल्मफेर पुरस्कारांची दक्षिणी आवृत्ती फिल्मफेअर पुरस्कार दक्षिणची यादी खालील प्रमाणे आहे. हे पुरस्कार टाइम्स वृत्तसमूहातर्फे दक्षिण भारतीय सिनेमामधील गुणवत्तापूर्ण प्रदर्शनासाठी दिले जातात.

फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण
वर्ष प्रकार चित्रपट
१९८२ सर्वोत्तम अभिनेता शुभलेखा
१९८५ सर्वोत्तम अभिनेता विजेता
१९९२ सर्वोत्तम अभिनेता आपदबंधवूडू
१९९३ सर्वोत्तम अभिनेता मुता मेस्त्री
१९९९ सर्वोत्तम अभिनेता स्नेहम कोसम
२००२ सर्वोत्तम अभिनेता इंद्रा (२००२)
२००५ सर्वोत्तम अभिनेता शंकरदादा एम बी बी एस
२००६ सन्माननीय पुरस्कार
२०१० फिल्मफेर लाईफटाईम अवॉर्ड

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Padmabhushanudiki Mega Sanmanam Part – I – Telugu Movie News" (तेलुगू भाषेत). २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Telugu Film Khaidi No.150 Has 8th Highest Opening Day in India" (इंग्रजी भाषेत). Box Office India. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.