चालबाझ
| प्रकाशन तारीख | 1989 |
|---|---|
| मूळ देश | भारत |
| मूळ भाषा | हिंदी |
| दिग्दर्शक | Pankaj Parashar |
| चित्रीकरण दिग्दर्शक | Manmohan Singh |
| संगीतकार | लक्ष्मीकांत-प्यारेलाल |
चालबाझ हा १९८९ मध्ये पंकज पराशर दिग्दर्शित आणि राजेश मजुमदार आणि कमलेश पांडे यांनी लिहिलेला हिंदी चित्रपट आहे. यात श्रीदेवी, सनी देओल आणि रजनीकांत यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट अंजू आणि मंजू या जुळ्या बहिणींचा आहे, ज्या जन्मताच वेगळ्या होता. अंजू तिच्या दुष्ट काकासोबत राहते जो तिची मालमत्ता बळकावण्याची योजना आखतो आणि तिला मारहाण करून त्रास देतो. दुसरीकडे, मंजू झोपडपट्टीच्या वातावरणात वाढते आणि ती एक टॉमबॉय होते.[१]
हा चित्रपट सीता और गीता (१९७२) या चित्रपटाचे रूपांतर आहे.[२][३] लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीने आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या गीतांसह संगीत तयार केला होता. मनमोहन सिंग यांनी छायांकन केले होते तर अफाक हुसेन यांनी संपादक म्हणून काम पाहिले होते.
३५ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, चित्रपटाला तीन नामांकने मिळाली आणि दोन पुरस्कार मिळाले: सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (श्रीदेवी) आणि सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक (सरोज खान).[४] कन्नडमध्ये राणी महाराणी (१९९०) आणि ना राणी नी महाराणी (२०१०) या नावाने त्याची पुनर्निर्मिती दोनदा करण्यात आली.
संदर्भ
[संपादन]- ↑ "'Chaalbaaz' revisited: 'Would I have made the movie without Sridevi? No'". March 2018.
- ↑ Majumdar, Anushree (2018-02-28). "From Chaalbaaz to Lamhe: Sridevi's electric double roles". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-02-25 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-03-17 रोजी पाहिले.
- ↑ "Bollywood actresses who have played double roles in their career". The Times of India. Entertainment Times. The Times Group. 2020-06-18 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-03-17 रोजी पाहिले.
- ↑ Times of India. "Bollywood's high on recreating retros". द टाइम्स ऑफ इंडिया. 2013-04-11 रोजी मूळ पानापासून संग्रहित.