चार तपस्या
चार तपस्या - पूर्णयोगामध्ये चार प्रकारच्या तपस्या आवश्यक आहेत असे श्रीमाताजींनी सांगितले आहे. या तपस्या अतिमानसिक सत्याचे आविष्करण करण्यास व्यक्तीस पात्र बनवितात. [१] या चार तपस्या पुढीलप्रमाणे -
चार तपस्या
[संपादन]०१) प्रेमविषयक तपस्या
[संपादन]भावभावना किंवा प्रेमविषयक तपस्या ही सर्व तपस्यांमध्ये सर्वात कठीण तपस्या आहे. ईश्वरविषयक प्रेम हे खरे प्रेम आहे, हे ध्यानात ठेवून इतरांशी वागताना प्रेमाची जागा संपूर्ण, अविचल, निरंतर दयाळूपणा आणि सदिच्छा या गोष्टींनी घेतली जाणे अपेक्षित आहे. त्यामध्ये कोणतीही अपेक्षा नसेल. येथे केवळ एका ईश्वरावर सर्व भाव केंद्रित करणे अपेक्षित असते.
०२) ज्ञानविषयक तपस्या
[संपादन]ही मानसिक तपस्या असते. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो.
- ध्यानाभ्यास
- वाक-संयम
०३) शक्तीविषयक तपस्या
[संपादन]प्राणाधिष्ठित संवेदनांची तपस्या म्हणजे शक्तीविषयक तपस्या. प्राणशक्तीला, इंद्रियसंवेदनांना वळण लावले तर ती सुसंस्कृत, धैर्यशील आणि निःस्वार्थी होऊ शकते. परिणामतः कालांतराने दिव्य आनंदाच्या प्राप्तीसाठी इंद्रियांच्या क्षुद्र व भ्रामक सुखांचा ती सहजच त्याग करते. हा सर्व विचार या तपस्येमध्ये केला जातो.
०४) सौदर्यविषयक तपस्या
[संपादन]ही तपस्या प्रामुख्याने शरीरविषयक तपस्या असते. सुंदर बांधा, सुसंवादी ठेवण, चपळ व लवचीक हालचाली, कार्य करण्यासाठी सामर्थ्यसंपन्न व प्रतिकारशक्तिपूर्ण प्रकृती असे शरीर असणे आवश्यक असते. त्यासाठी ही सौदर्यविषयक तपस्या करणे अभिप्रेत असते. चांगल्या सवयी लावणे पण सवयींचे गुलाम न होणे, आवश्यक तेवढे श्रम करायचे, शरीराचा ज्यामुळे ह्रास होईल अशा गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवायचे यांचा समावेश या तपस्येमध्ये होतो. व्यसने असता कामा नयेत. या तप्स्येमध्ये पुढील तपास्यांचा समावेश होतो.
- आहारविषय तपस्या
- निद्राविषयक तपस्या
- दैनंदिन कार्यविषयक तपस्या - यामध्ये व्यायाम व कर्मविषयक तपस्येचा समावेश होतो.
- कामवासनाविषयक तपस्या
चार प्रकारच्या मुक्ती
[संपादन]चार तपस्या केल्या असता साधकास चार प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतात असे श्रीमाताजी सांगतात.
क्र. | तपस्या | कोणत्या अंगांशी संबंधित | मुक्तीचा प्रकार |
---|---|---|---|
१ | प्रेमविषयक तपस्या | अंतरात्म्याशी संबंधित | दुःखापासून मुक्ती |
२ | ज्ञानविषयक तपस्या | मनाशी संबंधित | अज्ञानापासून मुक्ती, ज्योतिर्मय मनाची प्रस्थापना |
३ | शक्तीविषयक तपस्या | प्राणाशी संबंधित | वासनामुक्ती, सतत प्रसन्नता, शांती यांची प्राप्ती |
४ | सौदर्यविषयक तपस्या | शरीराशी संबंधित | भौतिक जगातील कार्यकारणाच्या नियमापासून मुक्ती |
पूरक वाचन
[संपादन]चार तपस्या व चार मुक्ती, मूळ लेखक - श्रीमाताजी, अनुवाद - विमल भिडे, संजीवन कार्यालय, पुडुचेरी
संदर्भ
[संपादन]- ^ The Mother (१९८३). The Four Austerities and the Four Liberations [चार तपस्या व चार मुक्ती]. विमल भिडे द्वारे भाषांतरित. पुडुचेरी: संजीवन कार्यालय.