चार्ल्स पहिला, इंग्लंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
चार्ल्स पहिला, इंग्लंड
चार्ल्स पहिला, इंग्लंड

पहिला चार्ल्स (नोव्हेंबर १९, इ.स. १६००:डन्फरलिन - जानेवारी ३०, इ.स. १६४९:लंडन) हा मार्च २७, इ.स. १६२५ पासून त्याच्या मृत्यूपर्यंत इंग्लंडचा राजा होता. चार्ल्स जेम्स पहिलाडेन्मार्कची ऍन यांचा मुलगा. त्याची शारिरीक वाढ नीट न झाल्याने लिखित इतिहासातील अगदी बुटक्या राजांमध्ये चार्ल्सची गणना होते. चार्ल्सने इंग्लंडमधल्या ख्रिश्चन धर्माच्या पालनात ढवळाढवळ करून ख्रिश्चन धर्मगुरूंना नाराज केले होते. आपण सुरू केलेल्या युद्धांचा खर्च भागवण्याकरता त्याने संसदेच्या मान्यतेशिवाय प्रजेवर कर आकारायलाही सुरवात केली होती. इंग्लंडचे राज्य देवाने आपल्याला दिलेले आहे आणि आपली सत्ता अमर्याद आहे अशी चार्ल्सची दैवी राज्यकर्तृत्त्वाची कल्पना होती. पण धर्मातली ढवळाढवळ आणि कर आकारणी ह्या वर म्हटलेल्या त्याच्या मुख्यतः दोन कृत्यांवरून तो अनिर्बंध सत्ता बळकावू पहात आहे असा इंग्लंडच्या संसदेचा ग्रह झाला आणि तिने त्याच्या त्या कल्पनेला आक्षेप घेतला.

चार्ल्स आणि संसद ह्या दोन्ही बाजूंनी युद्धाची तयारी सुरू केली. ऑगस्ट इ.स. १६४२मध्ये चार्ल्स उत्तरेत ऑक्सफर्डला गेला व तिथे त्याने आपला दरबार भरवला. संसद लंडनमध्ये होती व तिने तिथे स्वतंत्र सैन्य उभारायला सुरूवात केली. ऑक्टोबर २५ला युद्धाला तोंड फुटले, पण एजहिलच्या लढाईत कोणाचीच हार-जीत झाली नाही. इ.स. १६४४ पर्यंत तुरळक लढाया होत राहिल्या. शेवटी नेसेबीच्या लढाईत संसदेच्या सैन्याने चार्ल्सच्या सैन्याला हरवले आणि चार्ल्स ऑक्सफर्डला पळून गेला. नंतर एप्रिल इ.स. १६४६मध्ये वेढा फोडून तो स्कॉटलंडला पळाला व तिथे प्रेझ्बिटीरिअन पंथाच्या सैन्याला शरण गेला. परंतु त्यां सैन्याने चार्ल्सला स्कॉटलंड व इंग्लंडमधल्या युद्धातला मोहरा बनवले आणि युद्ध थांबवण्याच्या बदल्यात त्याला इंग्लिश संसदेकडे सोपवले.

पुन्हा एकदा पळून चार्ल्स आईल ऑफ राईटच्या संसदीय अधिकाऱ्याला शरण गेला. पण त्या अधिकार्याला चार्ल्सबद्दल सहानुभुति नव्हती. पर्यायी चार्ल्स पुन्हा तुरुंगात पडला. इ.स. १६४८मध्ये संसदेने खास कायदा मंजूर करून चार्ल्सवर खटला केला. 'देवाने आपल्याला राजेपद दिलेले असल्यामुळे कोणतेही न्यायालय आपल्यावर खटलाच करु शकत नाही' असा युक्तिवाद त्यावेळी चार्ल्सने केला. 'न्यायालयासमोर सगळी माणसे सारखीच आहेत' असा संसदेने प्रतिवाद केला. खटल्याचा निकाल चार्ल्सच्या विरुद्ध लागला व त्याला मृत्युदंडाची शिक्षा झाली. चार्ल्सने माफी मागितल्यास त्याला ती देण्याची तयारी न्यायालयाने दाखवली, पण त्याने मरण पसंत केले. जानेवारी ३०, इ.स. १६४९ ला चार्ल्सला शिरच्छेदाने मृत्युदंड देण्यात आला.