Jump to content

चार्ली कॉफमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Charlie Kaufman (es); 查理卡夫曼 (yue); Charlie Kaufman (hu); Charlie Kaufman (eu); Charlie Kaufman (ast); Чарли Кауфман (ru); Charlie Kaufman (cy); Charlie Kaufman (ga); چارلی کافمن (fa); 查理·卡夫曼 (zh); Charlie Kaufman (da); Charlie Kaufman (tr); 查理·卡夫曼 (zh-hk); Charlie Kaufman (nl); Charlie Kaufman (mg); Charlie Kaufman (sv); 查理·考夫曼 (zh-hans); צ'ארלי קאופמן (he); Charlie Kaufman (de); 查理·考夫曼 (zh-hant); Charlie Kaufman (mul); 查理·考夫曼 (zh-cn); 찰리 코프먼 (ko); Чарли Кауфман (kk); Charlie Kaufman (en-ca); Charlie Kaufman (cs); Charlie Kaufman (pap); Charlie Kaufman (it); チャーリー・カウフマン (ja); Charlie Kaufman (fr); Charlie Kaufman (sk); Charlie Kaufman (hr); Çarli Kaufman (az); Charlie Kaufman (ca); تشارلى كوفمان (arz); Չառլի Քաուֆման (hy); चार्ली कॉफमन (mr); Charlie Kaufman (pl); Charlie Kaufman (pt); ჩარლი კაუფმანი (ka); Čārlijs Kaufmans (lv); Charlie Kaufman (vi); Чарли Кауфман (sr); Charlie Kaufman (sl); Чарли Кауфман (bg); Charlie Kaufman (pt-br); 查理·考夫曼 (zh-sg); Charlie Kaufman (id); Charlie Kaufman (nn); Charlie Kaufman (nb); 查理·考夫曼 (zh-tw); Charlie Kaufman (sq); Чарли Кауфман (cv); Чарлі Кауфман (uk); Charlie Kaufman (en-gb); Charlie Kaufman (en); تشارلي كوفمان (ar); Τσάρλι Κάουφμαν (el); Charlie Kaufman (fi) guionista estadounidense (es); মার্কিন চিত্রনাট্যকার (bn); réalisateur et scénariste américain (fr); guionista estadounidense (gl); Ameerika Ühendriikide stsenarist (et); ލިޔުންތެރިއެއް (dv); cyfarwyddwr ffilm, cynhyrchydd a sgriptiwr ffilm a aned yn Efrog Newydd yn 1958 (cy); guionista d'Estaos Xuníos (ast); guionista estatunidenc (ca); American filmmaker and novelist (en); US-amerikanischer Drehbuchautor (de); Nhà biên kịch người Mỹ (vi); skenarist amerikan (sq); فیلمنامه‌نویس، تهیه‌کننده، نویسنده، و کارگردان آمریکایی (fa); كاتب سيناريو أمريكي (ar); американский сценарист и режиссёр (ru); Amerikalı senarist (tr); 미국의 영화 각본가 (ko); sceneggiatore, produttore cinematografico e regista statunitense (it); usona scenaristo (eo); Penulis Naskah, Produser, Sutradara dan Penulis Novel asal Amerika (id); scenarzysta amerykański (pl); американський сценарист та режисер (uk); Amerikaans filmregisseur (nl); scenarist american (ro); תסריטאי אמריקאי (he); scríbhneoir scannán Meiriceánach (ga); yhdysvaltalainen elokuvakäsikirjoittaja ja -ohjaaja (fi); American filmmaker and novelist (en); senariste american (lfn); americký scenárista (cs); amerikāņu scenārists, producents, režisors un rakstnieks (lv) Charles Kaufman, Charles Stuart Kaufman (es); Charles Stuart Kaufman (fr); Charles Stuart Kaufman (ast); Кауфман, Дональд, Кауфман, Чарли (ru); Charles Stuart Kaufman (pt); 查里·考夫曼, Charlie Kaufman, 查理·考夫曼 (zh); Charles Stuart Kaufman (tr); Charles Stuart Kaufman (id); Charles Stuart Kaufman (pl); צ'רלי קאופמן (he); Charles Stuart Kaufman (mul); Donald Kaufman (fi); 찰리 카우프만, 찰리 카프만, 찰리 코프만 (ko); Charles Stuart Kaufman (en); Kaufman (sv); Charles Kaufman, Charles Stuart Kaufman, Donald Kaufman (cs); Charles Stuart Kaufman (sk)
चार्ली कॉफमन 
American filmmaker and novelist
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावCharles Stuart Kaufman
जन्म तारीखनोव्हेंबर १९, इ.स. १९५८
न्यू यॉर्क सिटी (न्यू यॉर्क)
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९८३
नागरिकत्व
निवासस्थान
  • पसादेना
शिक्षण घेतलेली संस्था
  • Boston University College of Fine Arts
  • New York University Tisch School of the Arts
  • Hall High School
व्यवसाय
सदस्यता
  • Writers Guild of America West
पुरस्कार
  • Writers Guild of America Award
  • Academy Award for Best Writing, Original Screenplay (इ.स. २००५)
  • Time Machine Award (इ.स. २००८)
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q312751
आयएसएनआय ओळखण: 0000000121460805
व्हीआयएएफ ओळखण: 103198746
जीएनडी ओळखण: 131817876
एलसीसीएन ओळखण: no2001002173
बीएनएफ ओळखण: 141100510
एसयूडीओसी ओळखण: 068861893
आय.एम.डी.बी. दुवा: nm0442109
आयसीसीयू / एसबीएन ओळखण: UBOV490184
एमबीए ओळखण: 8c23bdf4-af88-4a86-9a2f-645aeb2f2f24
Open Library ID: OL6246314A
एनकेसी ओळखण: pna2006327266
एसईएलआयबीआर: 330675
Nationale Thesaurus voor Auteursnamen ID: 306285177
NUKAT ID: n2010055668
NLP ID: a0000002663651
National Library of Korea ID: KAC201618667
Libris-URI: zw9dkqwh2pd56pw
PLWABN ID: 9810574055605606
J9U ID: 987007442594605171
कलाकार मराठी

अमेरिकन चित्रपटसृष्टीतील पटकथाकार, निर्माता, दिग्दर्शक, नाटककार व गीतकार. त्याचा जन्म न्यू यॉर्क (अमेरिका) येथे झाला. चित्रपट, दूरचित्रवाणी व नाटक या तिन्ही क्षेत्रांत कॉफमन कार्यरत आहे.

कारकिर्दीचे प्रमुख टप्पे : १९९१ ते १९९७ या दरम्यान कॉफमन दूरचित्रवाणीवर कार्यरत होता. बीइंग जॉन मॅलकोव्हिच हा त्याने पटकथालेखन केलेला पहिला चित्रपट (१९९९). हा चित्रपट ७२ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट स्वतंत्र पटकथा, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन या विभागांत नामांकित झाला. त्याची पटकथा असलेल्या ह्यूमन नेचर (२००१) या चित्रपटाबद्दल समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या. अडॅप्टेशन (२००२) आणि कन्फेशन्स ऑफ अ डेंजरस माइंड (२००२) या त्याने लिहिलेल्या चित्रपटांचे समीक्षकांनी कौतुक केले. अडॅप्टेशन आणि त्याच्या आधीचा बीइंग जॉन मॅलकोव्हिच हे दोन्ही चित्रपट स्पाईक जोंझ याने दिग्दर्शित केले होते, तर जॉर्ज क्लूनी या सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्याने कन्फेशन्स ऑफ अ डेंजरस माइंडचे दिग्दर्शन केले होते व त्यात अभिनयदेखील केला होता. केट विन्स्लेट आणि जिम कॅरी यांची मुख्य भूमिका असलेला कॉफमनचा इटर्नल सनशाइन ऑफ दि स्पॉटलेस माइंड (२००४) हा सर्वाधिक चर्चित व पुरस्कारप्राप्त चित्रपट ठरला.

२००८ साली कॉफमन दिग्दर्शक झाला. त्याचा सिनेक्डॉकी न्यू यॉर्क हा चित्रपट प्रदर्शित झाला. अगोदर या चित्रपटाचे दिग्दर्शन स्पाईक जोंझ करणार, असे ठरले होते; तथापि काही कारणास्तव तो या चित्रपटापासून वेगळा झाला आणि कॉफमनवर दिग्दर्शन करण्याची जबाबदारी आली. तत्पूर्वी २००५ साली कॉफमनने आकाशवाणीसाठी दोन नाटके लिहिली होती. त्यांपैकी अनॉमलीसा हे नाटक स्टॉप मोशन ॲनिमेशन या चित्रपटाच्या रूपात प्रदर्शित झाले (२०१५). त्याने दिग्दर्शन केलेला त्याचा हा दुसरा चित्रपट. ड्यूक जॉन्सन हा या चित्रपटाचा सह-दिग्दर्शक होता. हा चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटासाठी कॉफमनला फार परिश्रम घ्यावे लागले. या चित्रपटाची निर्मिती ‘किकस्टार्टर’ या संकेतस्थळामार्फत जमलेल्या निधीतून (crowd funding) झाली.

शैलीचे वैशिष्ट्य : प्रसिद्ध समीक्षक रॉजर इबर्ट म्हणतो, “कॉफमनच्या चित्रपटांमध्ये मुख्य एकच विषय असतो; तो म्हणजे माणसाचे अंतर्मन आणि या अंतर्मनाच्या वस्तुस्थिती, भ्रम, इच्छा-आकांक्षा व स्वप्नांशी होणाऱ्या वाटाघाटी.” यासोबतच कॉफमनच्या चित्रपटांमध्ये उपरोधिक विनोदी शैलीदेखील दिसून येते. इबर्टच्या मते, कॉफमनने लिहिलेला व दिग्दर्शित केलेला सिनेक्डॉकी न्यू यॉर्क हा २०००–२०१० या दशकातला सर्वोत्तम चित्रपट आहे.

महत्त्वाचे चित्रपट : बीइंग जॉन मॅलकोव्हिच या वास्तववादी तरीही चमत्कृतिपूर्ण अशा वेगळ्याच चित्रपटामुळे कॉफमन हा समीक्षकांचा व काही निवडक प्रेक्षकांचा विशेष लाडका लेखक झाला. या चित्रपटातली पात्रे एका प्रसिद्ध नटाच्या मेंदूत प्रवेश करतात आणि घडणारे प्रसंग स्वप्नात घडल्याप्रमाणे समोर आणत राहतात. कॉफमन त्याच्या पात्रांच्या शब्दशः ‘डोक्यातʼ जाऊन चित्रपट घडवत होता. त्याच्या नंतरच्या चित्रपटांमध्येही हे तंत्र कायम राहिले.

अडॅप्टेशनची पटकथा कॉफमनच्या लिखाणाच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित होती. दि ऑर्किड थीफ नावाच्या कादंबरीचे पटकथेत रूपांतर करण्याचे काम त्याच्याकडेच आले होते. या कादंबरीची कथा फार किचकट आणि ऑर्किड फुलांच्या तांत्रिक संदर्भात गुंफलेली होती. या कादंबरीचे पटकथेत रूपांतर करणे त्याला काही जमले नाही. याउलट, त्याने रूपांतर करण्याच्या प्रक्रियेवर अथवा प्रयत्नावर आधारित अडॅप्टेशनची पटकथा लिहिली. या चित्रपटाचे मुख्य पात्र चार्ली कॉफमन हाच होता. त्यासोबत कॉफमनच्या काल्पनिक जुळ्या भावाची, म्हणजे डॉनल्ड कॉफमनची व्यक्तिरेखाही या चित्रपटात होती. अडॅप्टेशन या चित्रपटाच्या नामावलीत पटकथाकार म्हणून कॉफमनसोबत डॉनल्ड कॉफमन हे नावदेखील आहे.

इटर्नल सनशाइन ऑफ दि स्पॉटलेस माइंड या चित्रपटात प्रेमकथा आणि विज्ञानकथा (science fiction) या दोन वेगळ्या जातकुळींना कॉफमनने एकत्रित आणले. एक जोडपे एकमेकांच्या आठवणी विसरण्यासाठी ‘लकुनाʼ नामक संस्थेची मदत घेते. बराचसा चित्रपट त्या आठवणी त्यांच्या डोक्यातून काढल्या जात असताना घडतो.

सिनेक्डॉकी न्यू यॉर्क हा चित्रपट माणसांच्या आंतरिक भीतीवर बोट ठेवणारा होता. कॉफमनने भयपट लिहावा अशी इच्छा एका निर्मात्याने व्यक्त केली होती. सामान्य भयपट न लिहिता हा असा चित्रपट लिहावा, असे त्याला तेव्हाच सुचले.