चारठाणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?चारठाणा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर जिंतूर
जिल्हा परभणी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

चारठाणा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.

पार्श्वभूमी[संपादन]

चारठाणा किंवा चारठाणे हे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील गाव आहे. येथे प्राचीन मंदिरे आहेत. इसवी सनाच्या ११ व्या ते १२ व्या शतकात म्हणजेच देवगिरीच्या यादव राजांच्या काळापासून या गावाचा इतिहास आहे. या काळात येथे हेमाडपंती पद्धतीची मंदिरे बांधली गेली. येथे हैद्राबाद मुक्ती संग्रामातील काही घटना घडल्या होत्या.

येथील अनेक मंदिरांपैकी काही मंदिरे अद्याप शिल्लक आहेत.

१) गोकुळेश्वर महादेव मंदिर
२) जोड महादेव मंदिर
३) खुराची देवी मंदिर
४) उकंडेश्वर महादेव मंदिर
५) दीपमाळ / मानसस्तंभ
६) गणपती मंदिर
७) गोद्रीतील महादेव मंदिर
८) ऋतुविहार (पांढरीतील मंदिर ) ( सध्या अवशेष शिल्लक )
९) नरसिंह तीर्थ मंदिर

ही मंदिरे दगडी बांधकामाची आहेत. गावात गोकुळेश्वर मंदिराजवळ पुष्करणी तीर्थ बारव असून आज देखील तिला पाणी उपलब्ध आहे. या मंदिराच्या दक्षिणेस एक विश्रामधाम असून याच्या भिंतीत भुयारी मार्ग आहे.

चारठाणा हे जवळपास १० हजार लोकसंख्येचे गाव असून औरंगाबाद-नांदेड या मार्गावर मंठा ते जिंतूर या दरम्यान आहे. जिंतूर ते चारठाणा हे अंतर १८ किमी आहे.

चारठाणा येथे साधारण १८ व्या शतकात आणि १९ व्या शतकात खालील संत होऊन गेले.

१)श्री. नीलकंठ स्वामी
२) श्री.पाटील बाबा
३) श्री. अप्पास्वामी (लखमा स्वामी)
४) श्री. जनार्दन महाराज
५) श्री. हुकूमचंद महाराज

यांपैकी नीलकंठ स्वामी यांचा मठ गावातील पेठ भागात असून तिथे त्यांच्या समाधीव्यतिरिक्त आणखी ५ समाध्या आहेत. नीलकंठ स्वामीं विषयी माहिती उपलब्ध नाही, परंतु या मठाचा आणि साखरखेर्डा मठाचा संबंध पाहता तिथे काही माहिती असू शकेल. श्री पाटील बाबा आणि जालन्याचे आनंद स्वामी यांचा संबंध असून या विषयी आनंद स्वामी विषयींच्या पोथीत ही माहिती उपलब्ध आहे. अप्पास्वामी उर्फ लखमा स्वामी हे चारठाणा येथे जन्मले आणि सेनगाव, रिसोडसह अनेक गावात त्यांनी आपला शिष्यसंप्रदाय वाढविला. नागेश संप्रदाय आणि अप्पास्वामी यांचा संबंध दिसून येतो. जनार्दन महाराज मध्य प्रदेशातून चारठाणा इथे आल्याचे सांगण्यात येते. त्यांचे शिष्य हुकूमचंद महाराज हे संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक होते असे मानले जाते. या सर्व संतांची मंदिरे आणि मठ चारठाणा गावातील पेठ विभागात आहेत . या पैकी संत जनार्दन महाराज यांचे नावे गावात यात्रा भरविली जाते.

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

नागरी सुविधा[संपादन]

जवळपासची गावे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate