चामी मुर्मू
Plants trees. Awarded the Nari Shakti Puraskar on International Women's Day in New Delhi | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | c. इ.स. १९७३ पणजी | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |
चामी मुर्मू (जन्म: सुमारे १९७३) ह्या एक भारतीय पर्यावरण कार्यकर्त्या आहेत. त्या वृक्षारोपण करण्यासाठी ओळखल्या जातात. २०१९ पर्यंत यांनी जवळपास २५,००,००० झाडे लावली होती. याच कामासाठी मुर्मू यांना २०१९ मध्ये भारत सरकार तर्फे नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चरित्र
[संपादन]मुर्मूचा जन्म १९७३ च्या सुमारास झाला,[१] त्या सरायकेला खरसावन जिल्ह्यातील राजनगर ब्लॉकमधील बागरसाई गावात राहतात.[२]
१९९६ च्या सुमारास, मुर्मूने झाडे लावण्यास सुरुवात केली. पुढील २४ वर्षांत त्या २५ लाख झाडे लावण्याच्या कार्यक्रमात सहभागी होत्या.[१] ही झाडे त्यांनी स्वतःच्या गावाभोवती लावलेली आहेत. विशेष म्हणजे जी झाडे "माफिया" द्वारे तोडली गेलीत, त्याच झाडांच्या जागी नवीन झाडे लावली गेली आहेत. नक्षलवाद्यांचा धोका असूनही त्या आपल्या सहकाऱ्यांसोबत काम करत आहेत. २०२० मध्ये त्या सहयोगी महिला बागराईसाई या संस्थेच्या सचिव पदी होत्या. या संस्थेत ३,००० सदस्य असून ते देखील सदरील कामात सहभागी आहेत.[२]

मार्च २०२० मध्ये , आंतरराष्ट्रीय महिला दिनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बारा नारी शक्ती पुरस्कार प्रदान केले आणि त्यापैकी मुर्मू एक होत.[३] त्याच महिन्याच्या शेवटी मुर्मूने घोषणा केली की त्या आणि जमुना टुडू झारखंडच्या जंगलांचे रक्षण एकत्रितपणे करणार आहेत. त्यांचा उल्लेख "लेडी टार्झन" असा केला जातो. जमुना तुडा यांच्या संस्थेत ३०० सदस्य आहेत आणि त्यांना एकत्रितपणे काम करण्याची आशा आहे.[२]

पुरस्कार
[संपादन]- इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार, १९९६
- नारी शक्ती पुरस्कार, २०१९
- खेलरत्न पुरस्कार, २०२४
- पद्मश्री पुरस्कार, २०२४
संदर्भ
[संपादन]- ^ a b Engl, India New; News (2020-03-09). "Chami Murmu: Jharkhand's green warrior among Nari Shakti awardees". INDIA New England News (इंग्रजी भाषेत). 2021-11-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-04-10 रोजी पाहिले.
- ^ a b c "Green warriors to join forces". www.telegraphindia.com (इंग्रजी भाषेत). 2020-04-10 रोजी पाहिले.
- ^ "President Kovind presents the Nari Shakti Puraskar on International Women's Day in New Delhi". YouTube. 8 March 2020. 2020-03-25 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 April 2020 रोजी पाहिले.