चांदणी चौक (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एन.डी.ए. चौक (जुने/अगोदरचे नाव: चांदणी चौक) हे पुणे शहरातील कोथरुड परिसरातील ठिकाण आहे. याला चौक असे म्हणत असले तरी प्रत्यक्षात येथे ४ पेक्षा अधिक रस्ते एकत्र येतात. येथील रस्त्यांची रचना अत्यंत गुंतागुंतीची असल्याने याला चांदणी चौक असे नाव दिले असावे. परंतु १२ ऑगस्ट २०२३ रोजी चांदणी चौकातील कामाचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमही झाला. यापुढे या चौकाला एन.डी.ए. चौक म्हणून संबोधले जाईल असे याबद्दलचे एक ट्वीट सरंक्षण विभागाने केले आहे. त्यामध्ये म्हंटलं आहे की, १२ ऑगस्ट २०२३ रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी NDA चौक राष्ट्राला समर्पित केला आहे. NDA चौकात भारतीय लष्कराचा टँक T - 55, भारतीय वायुसेनेची MIG - 27 विमाने आणि विमानवाहू वाहकांचे स्केल केलेले मॉडेल आहेत.

येथे खालील रस्ते आहेत:

  • कात्रज - देहूरोड बाह्यवळण महामार्ग
  • पौड रस्ता
  • एन.डी.ए. कडून पाषाण कडे जाणारा रस्ता

या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा बस थांबा असुन तेथे मुंबई/ठाणे/बोरिवली कडे जाणा-या बस थांबतात.

या ठिकाणी असलेले पुणे महानगर परिवहन महामंडळाचे बस थांबे:

१. बाह्यवळण महामार्गावर कात्रजकडे जाण्यासाठीचा बस थांबा

२. बाह्यवळण महामार्गावर हिंजवडी/निगडीकडे जाण्यासाठीचा बस थांबा

३. पौड रस्त्यावर पिरंगुट/पौडकडे जाण्यासाठीचा बस थांबा

४. पौड रस्त्यावर कोथरुड डेपोकडे जाण्यासाठीचा बस थांबा

४. पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाषाण/विद्यापीठ/हिंजवडीकडे जाण्यासाठीचा बस थांबा

५. पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोथरुड डेपोकडे जाण्यासाठीचा बस थांबा