चांग्डे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चांग्डे (चिनी: 常德) हे चीनच्या हुनान प्रांतातील शहर आहे. २०१०च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १२,३२,१८२ होती तर महानगराची लोकसंख्या ५७,१७,२१८ होती.

या प्रदेशात युआन नदीकाठी सुमारे ८,००० वर्षांपूर्वीपासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. बाराव्या शतकात येथील वस्ती चांग्डे नावाने ओळखली जाऊ लागली.

दुसऱ्या चीन-जपान युद्धादरम्यान चांग्डेची लढाई येथून जवळ झाली होती.