चर्चा:हिंदू देवांचे प्रकार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:हिंदू देवांमधल्या प्रमुख जाती या पानावरून पुनर्निर्देशित)

@:

१) प्रथम दर्शनी लेख शीर्षक आणि लेखातील मजकुर एकमेकांशी जुळताना दिसत नाही.

२) "या हिंदू देवांमध्ये अनेक जाती आहेत. त्यांची जातिनुसार उतरंडही आहे."

'देवांची जातिनुसार उतरंड' उल्लेखात आपण नेमके काय निर्देशीत करत आहात हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेनुसार ही उतरंड आहे असे काही आहे का?
देवांमध्ये स्थान उतरंड असणे आणि जाती असणे यात फरक नाही का ? देवांमध्ये जाति आहेत हे प्रथम दर्शनी नवीन संशोधन असावे असा कयास आहे. दुसऱ्या लेखकाचे मत असल्यास संदर्भ द्यावा आपले व्यक्तीगत मत असल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयता तपासून पहावी

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:२६, १३ सप्टेंबर २०१५ (IST)[reply]

लेखनाव आणि आशय[संपादन]

@:@अभय नातू: लेखाचे शीर्षक उचित वाटत नाही. देवतांमध्ये "जाती" असा प्रकार हिंदू धर्मशास्त्रात अस्तित्वात नाहींयाची नोंद घ्यावी. म्हणायचे असल्यास आपण देवतांचे वर्गीकरण अथवा प्रकार असे शीर्षक वापरावे. विविध जाती-जमातींचे उपास्य देव अशी माहिती परिच्छेदात येईल एखाद्या पण शीर्षक बदलावे. मी धर्मशास्त्राची अभ्यासक असल्याने चांगल्या हेतूने हे नोंदवीत आहे त्यामुळे कृपया विपर्यास करून ज यांनी विषय न वाढविता सहकार्य करावे ही विनंती! हिंदू धर्मातील देवता हा स्वतंत्र लेख मी सुधारायला घेतला आहे त्यात या विषयाचा समावेश होईलच, त्यामुळे स्वतंत्र लेख आवश्यक नाही. आणि माझा लेख मी आवर्जून साचा लावून करीत आहे कारण विषय व्याप्ती मोठी आहे, तो हळूहळू सुधारावा लागेल. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) १८:२१, १६ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

जातींऐवजी प्रकार/वर्ग हे ठीक राहील का?
अभय नातू (चर्चा) २३:१४, १६ डिसेंबर २०१८ (IST)[reply]