चर्चा:संगणक विज्ञान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

I know this shhould be in marathi but, I cannot resist it. Can we find marathi words for many computer terms? at least in marathi articles we should use all marathi words.

Aniruddha.Raste

ईंग्लिश प्रतिशब्द[संपादन]

There's a separate effort going on by a group of marathi individuals just for this. They are trying to 'skin' linux into a marathi version. Since their work is in the public domain as well, I'm sure they will not mind sharing their list of words with us (wikipedians.)

Their mailing list is MarathiOpenSource@yahoogroups.com

Who wants to be the point-man/woman for co-ordinating between the two efforts?

Regards,

Abhay

co-ordination between marathiopensource and wikipedians[संपादन]

I am a member of both the groups and I have appealed marathiopensource for help.

Will post progress on that front here.

Regards,

Abhay Natu (अभय नातू)

Any progress?[संपादन]

Hello,

was there any progress about finding marathi eqivalent words for english computer words? I was just curious.

Aniruddha.Raste

progress[संपादन]

Unforntunately, I did not hear anything concrete from the open source group. One or two persons did offer something, but it was help in the form of a utilit to look up words from what was already defined. As it turns out, there were no words in that compilation :(

At this time, I would not rely on opensource, rather start with what we have and add to it.

Regards,

अभय नातू 21:23, 3 जानेवारी 2006 (UTC)

Thanks for update[संपादन]

Hello,

thanks for update. I think it should be fine for us to work it out our own way.. I plan to smake some additions on english-marathi equivalent words

Aniruddha.Raste

या माहितीत बदल करुन विश्वकोशीय स्वरुपात लेखा लिहिली जावी[संपादन]

पहा: संगणक अभियांत्रिकी आपल्या संगणकाची सुरक्षितता भाग १ प्रेषक अमित चितळे (शनि., २६/०२/२००५ - ०२:००) • अनुभव • माहिती • मदत • तंत्र • शिक्षण आजकाल घरोघरी संगणक येऊ लागले आहेत. त्याचा (योग्य?) वापरही वाढला आहे. परंतु त्याच्या सुरक्षिततेविषयी कोणाला फारशी माहिती नसते. "हो... एक कुठलासा Antivirus आहे, पण तो कसा वापरायचा ते माहित नाही" अश्या स्वरुपाची उत्तरे मिळतात. व्हायरस म्हणजे काय, काय म्हणजे व्हायरस नाही, तो कसा येऊ शकतो, कसा येऊ शकत नाही वगैरे गोष्टी सर्वसामान्यपणे माहित नसतात. गेली ६-७ वर्षे संगणक अभियंता म्हणून काम केल्यावर यातील बर्‍याच गोष्टींचे ज्ञान मला मिळाले आहे. आपला संगणक सुरक्षित कसा ठेवता येईल याबाबत ४ गोष्टी लोकांना सांगाव्यात, आपले अनुभव लोकांच्या उपयोगी पडावे म्हणून हा लेख प्रपंच... सर्वप्रथम व्हायरस हा कसा येऊ शकतो ते पाहू. आपण काहीच नं करता जसे आपल्या शरिरात जंतू शिरु शकतात, तसे संगणकाच्या बाबतीत होऊ शकत नाही. आपल्या संगणकावर व्हायरस शिरला तर त्याला पुर्णपणे आपणच जबाबदार असतो. आपल्या कोठल्याना कोठल्या कृतीच्या वेळीच हा प्रकार आपल्या संगणकावर येतो. आता या कुठल्या कृती? 1. फ्लॉपी डिस्क/फ्लॅश मेमरी संगणकात घालून अथवा दुसर्‍या संगणकास आपला संगणक जोडून काही व्हायरस असलेल्या फाईल्स कॉपी करणे. 2. एखादी अशी सीडी संगणकाच्या ड्राईव्ह मध्ये घालणे की ज्यामध्ये व्हायरस असलेल्या फाइल्स आहेत. 3. इंटरनेट ला आपला संगणक जोडणे. 4. संगणकावरील एखादा व्हायरस असलेला प्रोग्राम चालू करणे. 5. इमेल मधुन आलेल्या व्हायरस असलेल्या फाईल्स आपल्या संगणकावर उतरवून घेणे. 6. आऊटलूक वगैरे प्रकारच्या इमेल सॉफ्टवेअर मधुन एखादी व्हायरस असलेली मेल बघणे. 7. एखाद्या ब्राऊजर मध्ये एखादी साईट बघत असताना अचानक उपटलेल्या विंडो मध्ये हो(Yes) असे क्लिक करणे. आता आपण म्हणाल की या प्रत्येक गोष्टी करताना मला कसे कळणार की त्यात व्हायरस आहे अथवा नाही. तर आपले म्हणणे रास्त आहे. कोणालच ते माहीत नसते. म्हणून आपण काळजी घ्यायची. यापैकी प्रत्येक गोष्टीविषयी अधिक माहिती तर आपण पाहूच, पण सध्या त्वरित काय उपाय करता येतील ते पाहू. वरीलपैकी पहिल्या ५ गोष्टींसाठी आपल्या संगणकावर एखादे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर चालू स्थितीत असणे आवश्यक आहे. सहाव्या गोष्टीस उपाय नाही. आणि सातव्या गोष्टीस उपाय म्हणजे थोडी सजगता आणि ३ सॉफ्टवेअर्स. थोडक्यात आपल्या संगणकावर एकूण ४ सॉफ्टवेअर्स असणे, आणि १ सॉफ्टवेअर नसणे अत्यावश्यक आहे. • नसणे गरजेचे असलेले सॉफ्टवेअर: आऊटलूक एक्सप्रेस • अत्यावश्यक असलेली सॉफ्टवेअर्स: अँटीव्हायरस, पॉपप-ब्लॉकर, स्पायवेअर आणि फायरवॉल. आपल्याकडे इंटरनेट सुविधा नसल्यास पॉपप-ब्लॉकर तसेच फायरवॉल ची गरज नाही. या पाच सॉफ्टवेअर्स बद्दल:

१. आऊटलूक एक्सप्रेस: हे शक्यतो वापरु नये. वापरणे अपरिहार्य असल्यास आपल्याला व्हायरसविषयी अधिक खोलवर ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि यामुळे आपल्या संगणकावर व्हायरस येऊ शकतो, तसेच आपल्या संगणकाची वाट लावून पुढे आपल्या मित्रांकडे, नातेवाईकांकडे जाऊही शकतो हे ध्यानात ठेवावे. याच्या ऐवजी आपण युडोरा, पेगासस मेल इत्यादी मुक्त प्रणाली वापरू शकता. २. अँटीव्हायरस: हे आपल्या संगणकावर असणे अत्यावश्यक आहे. नुसते असुन फायदा नाही तर ते चालू स्थितीत असणे तसेच त्याची दरवेळी निघत असलेली सुधारीत आवृत्ती आपल्याकडे असणे आवश्यक आहे. आपल्या संगणकावर व्हायरस आल्याचे तत्काळ ओळखणे, तो काढून टाकणे अशी कामे हे सॉफ्टवेअर करते. ए.व्ही.जी नामक एक मुक्त प्रणाली यासाठी आपण वापरु शकता. ३. पॉपप-ब्लॉकर: ब्राऊजरवर एखादे संकेतस्थळ पहात असताना, अचानक एखादी विंडो उघडली जाते, आणि यामध्ये अतिशय त्रासदायक जाहिराती दाखवल्या जातात. बर्‍याचदा यातून लोकांना अनावश्यक, किंवा धोकादायक अशी सॉफ्टवेअर्स उतरवुन घेण्यास प्रवृत्त केले जाते. "क्लिक करा आणि हजार डॉलर मिळवा" किंवा "फुकट कॅमेरा घ्या" अश्या आशयाच्या या जाहिराती असतात. जगात कोणही फुकट काही द्यायला बसलेले नसते, त्यामुळे अश्या जाहिराती निव्वळ खोट्या असतात. यांना पायबंद घालण्यासाठी आपण पॉपप-ब्लॉकर वापरणे आवश्यक आहे. मला माहित असणारा अतिशय चांगला तसेच उपयुक्त पॉपप-ब्लॉकर म्हणजे गुगल टूलबार. ४. स्पायवेअर: बर्‍याचदा आपल्या संगणकावर काही असे प्रोग्राम्स येतात की जे दृष्य स्वरुपात हानीकारक दिसत नसले तरीही, तुमच्या नकळत तुमची माहीती बाहेर पाठवतात. जसे की तुमचे परवलीचे शब्द. ऍडवेअर हे मला माहीत असलेले आणि या अश्या प्रकारच्या फाईल्स तुमच्या संगणकावरुन शोधून काढणारे सॉफ्टवेअर आहे. ५. फायरवॉल: सर्वात परिणामकारक, परंतु वापरावयास जरा अधिक तांत्रिक माहिती आवश्यक असलेले असे हे सॉफ्टवेअर आहे. याला तुमच्या संगणक आणि इंटरनेट यामधील "लक्ष्मणरेषा" असेही म्हणता येईल. एकदा हे तुमच्या संगणकावर चालू केले म्हणजे तुमच्या संगणकावरील कुठलाही प्रोग्राम इंटरनेटवर तुमच्या परवानगीशिवाय माहितीची देवाणघेवाण करु शकत नाही. तसेच बाहेरील (इंटरनेटवरिल) कुठलाही प्रोग्राम तुमच्या संगणकापर्यंत पोहोचू शकत नाही. मी स्वतः वापरत असलेले सीगेट फायरवॉल हे एक याच प्रकारातील सॉफ्टवेअर आहे. अधिक माहिती आता आपण पाहू भाग २ मध्ये. (सुरक्षित) अमित चितळे आपल्या संगणकाची सुरक्षितता भाग २ प्रेषक अमित चितळे (गुरु., १०/०३/२००५ - ०१:००) • अनुभव • माहिती • मदत • तंत्र • शिक्षण

या आधी लिहिलेल्या भाग १ नंतर बर्‍याच दिवसांनी हा भाग २ लिहीत आहे. त्याबद्दल क्षमस्व. पहिल्या भागात आपण आपल्या हातून घडणार्‍या काही अश्या कृतींची यादी बघितली होती की ज्यामुळे आपल्या संगणकावर संगणक-विषाणू येऊ शकतो. आता या भागात याबाबत थोडे विस्ताराने पाहू... 1. फ्लॉपी डिस्क/फ्लॅश मेमरी संगणकात घालून अथवा दुसर्‍या संगणकास आपला संगणक जोडून काही संगणक-विषाणू असलेल्या फाईल्स कॉपी करणे. सर्वसाधारणपणे या कृतीने आपण फक्त विषाणूग्रस्त फाईल आपल्या संगणकावर आणतो. यापुढे यातील एखादी फाईल आपण उघडली अथवा चालू केली तरच विषाणू आपले काम चालू करतो. तुलना: ही गोष्ट गॅस चालू ठेवण्यासारखी आहे, भडका उडण्यासाठी फक्त एका ठिणगीची गरज असते. उपाय: प्रत्येक वेळी दुसरीकडून फाईल आणायच्या आधी एकदा विषाणू प्रतिबंधक प्रणालीं (अँटीव्हायरस सॉफ्टवेअर) वापरुन त्यात संगणक-विषाणू नसल्याची खात्री करणे. 2. एखादी अशी सीडी संगणकाच्या ड्राईव्ह मध्ये घालणे की ज्यामध्ये संगणक-विषाणू असलेल्या फाइल्स आहेत. ज्या वेळी आपण एखादी सीडी संगणकाच्या ड्राईव्ह मध्ये घालतो, त्यावेळी आपला संगणक आपोआप त्यातील एक विशिष्ट फाईल (असल्यास) चालू करतो. (याचमुळे एखाद्या चित्रपटाची सीडी घातल्यावर आपोआप चित्रपट चालू होतो) जर या सीडीवर संगणक-विषाणू असेल तर अर्थातच सीडी घातल्या घातल्या तो आपले काम चालू करतो. तुलना: गॅस चालू ठेवणे आणि कडेला समई तेवत असणे. उपाय: शक्यतो अधिकृत ठिकाणाहून आणलेल्या सीडी वापरणे, तशी माहिती नसल्यास आपोआप सीडीवरील फाईल चालू करण्याची सोय बंद करणे. हे कसे करावे ते इथे बघा. 3. इंटरनेट ला आपला संगणक जोडणे. आपल्या संगणकावर अश्या अनेक फाईल्स असतात की ज्या अधुन मधुन इंटरनेटद्वारा एखाद्या संकेतस्थळास माहिती पाठवावयाचा, घ्यावयाचा प्रयत्न करत असतात. ज्यावेळी आपण आपला संगणक इंटरनेटला जोडतो, त्यावेळी त्यांना खरोखरच तसे करता येते. तसेच बाहेर इंटरनेटवर असे अनेक प्रोग्राम्स असतात की जे इंटरनेटला जोडलेल्या संगणकावर घुसण्याचा प्रयत्न करत असतात. आपला संगणक सुरक्षित नसेल तर असे प्रोग्राम्स आपल्या संगणकावर येण्याची शक्यता वाढते. तुलना: घराची दारे खिडक्या उघडी टाकून आपण आतल्या एखाद्या खोलीत काम बसून राहणे. उपाय: आपल्या संगणकावर फायरवॉल-प्रणाली बसवून घेणे. 4. संगणकावरील एखादा व्हायरस असलेला प्रोग्राम चालू करणे. आता याबद्दल काही अधिक सांगणे गरजेचे आहे असे मला वाटत नाही. तुलना: स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणे. उपाय: आपल्या संगणकावर एखादी चांगली विषाणू प्रतिबंधक प्रणालीं चालू स्थितीत ठेवणे. अशी प्रणाली त्वरीत संगणक-विषाणू ओळखून हा प्रोग्राम चालू होऊ देत नाही तसेच हे आपल्या निदर्शनास आणते. 5. इमेल मधुन आलेल्या विषाणू असलेल्या फाईल्स आपल्या संगणकावर उतरवून घेणे: हा प्रकार क्र.१ सारखाच आहे. 6. आऊटलूक वगैरे प्रकारच्या इमेल-प्रणाली मधुन एखादी व्हायरस असलेली मेल बघणे: आऊटलूक एक्सप्रेस मधून मेल बघत असताना, त्यातील फाईल्स ह्या चालू होऊ शकतात. याचाच अर्थ त्यातील विषाणूबाधीत फाईल केवळ ती मेल बघण्यामुळे आपले काम चालू करु शकते. यामुळे केवळ आपल्याच संगणकाला धोका उत्पन्न होत नसुन, हाच विषाणू पुढे आपल्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना पाठवला जाऊ शकतो. तुलना: अविश्वासू व्यक्तीकरवी आपली पत्रे पाठवण्याचे, आणण्याचे काम करुन घेणे. उपाय: आऊटलूक एक्सप्रेस नं वापरणे. याऐवजी भाग १ मध्ये नमुद केलेल्या प्रणाली वापरणे. अथवा आऊटलूक मध्ये कार्यान्वित होणार्‍या विषाणूंसंबंधी पुर्ण माहिती करुन घेणे. आणि योग्य ती काळजी घेणे. 7. एखाद्या ब्राऊजर मध्ये एखादी साईट बघत असताना अचानक उपटलेल्या विंडो मध्ये हो(Yes) असे क्लिक करणे: बर्‍याचदा आपण एखादे संकेतस्थळ बघत असताना अचानक एक खिडकी (विंडो) उघडली जाते. ही बहुतेक करुन त्या पानावरील जाहिरातीने उघडलेली असते. आणि त्यात विषाणू असलेल्या फाईल्स असू शकतात. ही अचानक उघडलेली खिडकी अश्या विषाणूग्रस्त फाईलला चालू करु लागते. परंतु आपला ब्राऊजर त्यास तसे करुन देत नाही, आणि तो आपल्यास परवानगी मागतो. आपण जर नं विचार करता परवानगी दिली तर हा विषाणू आपले काम चालू करतो. तुलना: कुठल्याही अनोळखी माणसास घरात घेणे. उपाय: अशा प्रकारे आलेल्या खिडक्यांमध्ये "हो" वर टिचकी नं मारणे. या प्रकारच्या खिडक्यांना प्रतिबंध करणारी प्रणाली आपल्या संगणकावर कार्‍यान्वित ठेवणे. (पहा: भाग १) थोडक्यात काय, तर संगणक वापरताना आपण थोडी सजगता ठेवली पाहिजे. अन्यथा घरात संगणक असण्याचा फायदा होण्याऐवजी त्रासच व्हायचा. थोडीशी माहिती ठेवणे, दडपून काहीही नं करणे, या गोष्टी केल्यास आपण आपल्या संगणकाचा योग्य तो उपयोग करुन घेऊ शकू. या भागातून आपल्याला आपल्याच कृतींमुळे विषाणू आपल्या संगणकावर कसा शिरू शकतो ते कळले असेल. आता अचानक उघडणार्‍या खिडक्यांना प्रतिबंध करणारी प्रणाली, फायरवॉल-प्रणाली तसेच विषाणू प्रतिबंधक प्रणालींसंबंधी अधिक माहीती आपण

अभय नातू १६:३८, २६ फेब्रुवारी २०११ (UTC)