चर्चा:शोध यंत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

India rocks

'शोध यंत्र' की 'शोधयंत्र'?[संपादन]

या लेखाचे शीर्षक 'शोध यंत्र' अशा पद्धतीने लिहिणे चुकीचे वाटते. '(इंटरनेटवर) शब्द शोधणारे यंत्र' अशा अर्थाने हा शब्द तयार करायचा असल्यास व्याकरणदृष्ट्या तो शब्द सामासिक (समास प्रकारातील) ठरतो. त्यामुळे त्यातील 'शोध' व 'यंत्र' हे दोन्ही अर्थबोध सांगणारे भाग सलग लिहायला हवेत; म्हणजेच हा शब्द 'शोधयंत्र' असा लिहिला पाहिजे.

Search engine या इंग्लिश शब्दाचे शब्दशः भाषांतर केले असताना ही लेखनातील चूक झाली असण्याची शक्यता आहे. पण हे शीर्षक आता सुधारायला हवे असे वाटते.

--संकल्प द्रविड 06:01, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)

सहमत[संपादन]

मलाही काल redirect करताना याची जाणीव झाली खरी.पण redirect चा मोह टळला नाही.क्षमस्व. Mahitgar 06:37, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)

शोध[संपादन]

शोधयंत्र मधला "शोध" मला search पेक्षा "invent" ला जास्त जवळ वाटला. शोध घेणारे यंत्र आणि अर्थ शोध लावणारे यंत्र असा गोंधळ होण्याची थोडी शक्यता वाटते. सध्या तरी आणखी पर्यायी प्रतिशब्द सुचत नसल्याने "जैसे थे"च ठेवणे श्रेयस्कर :-) Ajitoke 07:41, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)