चर्चा:शेगांव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सातासमुद्रापार पोहोचलेली शेगावची कचोरीचा इतिहास !

  1. नक्की_वाचा

शेगावच्या रेल्वे स्टेशनवर उतरताच खमंग कचोरी खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. शेगावची ही कचोरी हळूहळू विदर्भात सर्वत्र पोहोचली. सुमारे ६० वर्षांचा प्रदीर्घ पल्ला गाठणाऱ्या या शेगाव कचोरीला २०१३ साली ISO मानांकन प्राप्त झाले आहे.

कचोरीचा इतिहास देशाच्या फाळणीनंतर तिरथराम शर्मा नामक व्यक्ती पंजाबातून शेगावांत पोहोचले. चरितार्थ चालविण्यासाठी त्यांनी शेगाव रेल्वे स्टेशनवरील एका स्टॉलवर हॉटेल सुरू केले. १९५० मध्ये आपल्या पाच मुलांच्या मदतीने त्यांनी खास पद्धतीने तयार केलेल्या कचोरीची विक्री सुरू केली. शेगावला संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला या कचोरीने भूरळ घातली. तेव्हापासून ही कचोरी शेगाव कचोरी म्हणून विदर्भात प्रसिद्ध झाली

न्यायाधीशांमुळे मानांकन शेगाव येथे मुंबई येथील एक न्यायाधीश कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी गगन शर्मा यांच्या स्टॉलवरील कचोरीचा स्वाद अनुभवला. त्यांनीच शर्मा यांना मानांकनाबाबत सांगितले. शर्मा यांनी या न्यायाधीशांनाच याबाबत मदतीचे आवाहन केले. त्यानंतर या न्यायाधीशांनी मानांकन देणाऱ्या संस्थेला कचोरीबाबत कळविले. मार्च २०१३ मध्ये शेगाव कचोरीचे ऑडिट करण्यासाठी खास चमू शेगावात येऊन गेली. गुणवत्ता, सेवा, स्वच्छता आदी निकष तपासल्यानंतर या संस्थेने शेगाव कचोरीला आयएसओ मानांकन दिले आहे.

वेध विदेशाचे… पुणे येथील उद्योजक अविनाश देव यांच्या मदतीने न्यूयॉर्क (अमेरिका) येथे शेगाव कचोरी पोहोचली आहे. सुमारे ३०० ठिकाणी ही कचोरी अमेरिकेत पोहोचणार आहे. विदेशात पाठविली जाणारी कचोरी आठवडाभर खराब होणार नाही अशा पद्धतीने तयार होणार आहे. दुबईतील एका हॉटेल समूहानेही शेगाव कचोरीसाठी शर्मा यांच्याशी करार केला आहे.

  1. vidarbhDish #foodofvidarbha #vidarbh