चर्चा:शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • संस्थांच्या नावांचे आणि अभ्यासक्रम-परीक्षांचे कागदोपत्री आणि बोलताना होणारे उल्लेख बहुधा त्यांच्या आद्याक्षरांनी(संक्षिप्त नावाने-इनिशिअॅलिझमने) होतात.

लेखातील सध्याच्या उपरोक्त वाक्यातील कागदोपत्री या शब्दाच्या उपयोगाच्या वस्तुनिष्ठते बाबत साशंकता वाटते. कोणत्याही संस्थेचे अथवा परीक्षेचे सहसा कागदोपत्री असणेच अभिप्रेत असते. एखाद्या संस्थेचे कागदोपत्री नाव अद्याक्षरीत असून लाँगफॉर्म वेगळे काही असते असे अपवादात्मक स्थितीत होते असे अपवाद कुठे असतील तर संदर्भ हवेत. आपण अपवादावरून नियम सिद्ध करतो आहोत असे तर नाही ना हे एकदा तपासून पाहिले जावयास हवे असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:५३, १८ सप्टेंबर २०१४ (IST)[reply]

कागदोपत्री संक्षिप्त नाव[संपादन]

अशी अनेक उदाहरणे देता येतील. मुंबईतील आर.एम. भट शाळा. या शाळेतून शिकून बाहेर पडलेल्या अनेक (बहुधा तमाम) विद्यार्थ्यांना आणि त्या शाळेच्या शिक्षकांनाही शाळेचे पूर्ण नाव सांगता आले नाही. कुणी शोधू शकत असेल, तर ते नाव या यादीत घालता येईल.

डी.वाय.पाटील नावाच्या शिक्षणसंस्थांतील बहुसंख्य (कदाचित कोणत्याही) विद्यार्थ्याला आपल्या संस्थेचे पूर्ण नाव सांगता येण्याची शक्यता कमीच आहे.

पुण्यातील एस.पी. कॉलेजला सर परशुरामभाऊ कॉलेज म्हणाणारे बावळट समजले जातात.

एम.जी. रोड म्हणजे लोक हमखास महात्मा गांधी रोड समजतात. दिल्लीतही एक एम.जी.रोड आहे, त्याचे पूर्ण नाव मेहरोली-गुरगांव रोड असे आहे.

महाराष्ट्रात नाशिकमधील आणि दक्षिणी भारतातील अनेक शहरांमधल्या संस्थांच्या नावांचे पूर्ण रूप कागदोपत्रीही बघायला मिळत नाही.

महाराष्ट्रात जेव्हा १०वी निकाल जाहीर होतो, तेव्हा शाळांची नावे वाचावीत, ती सर्व नावे संक्षिप्त रूपातच असतात.

नाट्यस्पर्धेत भाग घेणार्‍या शाळा-कॉलेजांची खरी नावे अभावानेच वाचायला मिळतात. ..... (चर्चा) २२:४०, १६ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]

बहुसंख्य लोक एखादी गोष्ट अमूक पद्धतीने करतात एवढ्या एकाच आधारावर अमूकच बरोबर हे गृहीत धरणे तार्कीक दृष्ट्या उणीवेचे वाटते; बहुसंख्य लोक एखादी गोष्ट अमूक पद्धतीने करतात म्हणजे तमूकचे अस्तीत्व नाहीच असे सिद्धही होत नाही आणि तमूक चुकीचे आहे हेही सिद्ध होत नाही .
बहुसंख्यलोक हमखास एम.जी. रोड म्हणजे महात्मा गांधी रोड समजतात पण तसे गृहीत धरणे चुकीचे असू शकते नाही का ? संदर्भ "एम.जी. रोड म्हणजे लोक हमखास महात्मा गांधी रोड समजतात. दिल्लीतही एक एम.जी.रोड आहे, त्याचे पूर्ण नाव मेहरोली-गुरगांव रोड असे आहे." म्हणूनच ज्ञानकोशात पूर्ण नावांचा प्रयोग आणि अमूक हे अमूकच आहे हे सिद्ध करण्यासाठी संदर्भ असणे श्रेयस्कर असावे.
"महाराष्ट्रात नाशिकमधील आणि दक्षिणी भारतातील अनेक शहरांमधल्या संस्थांच्या नावांचे पूर्ण रूप कागदोपत्रीही बघायला मिळत नाही." हे कोणत्याही आधाराशिवाय (perception driven) एखाद्या गोष्टीस परस्पर गृहीत धरणारे म्हणून विधान तर्कसुसंगत वाटत नाही.
आर.एम. भट शाळेच्या नावाचे लेखन आर.एम. भट्ट असे आहे का ? अद्यापतरी विशीष्ट माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. आर.एम. भट्ट नावाचा मार्ग/पथ/रस्ता मुंबईत असावा असे दिसते आहे
१९२० च्या आसपासच्या काळात रामचंद्र माधवराम भट्ट नावाची व्यक्ती होऊन गेली असावी कदाचित तत्कालीन स्वदेशी चळवळीशी निगडीत राहिली असण्याची शक्यता वाटते. पण रामचंद्र माधवराम भट्ट नावाचा आर.एम. भट्ट शाळेशी संबंध असल्याची आंतरजालावर पुरेशी माहिती तुर्तास उपलब्ध दिसत नाही हे खरे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:२७, १७ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]