चर्चा:शब्दकोश (निःसंदिग्धीकरण)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुगळी मासा[संपादन]

गुगळी हा मासा दुसर्‍या माशांवर उपजीविका करतो, त्यामुळे बाकी कुळाचे मासे याला घाबरून असतात. तामिळनाडूमध्ये या माशाचे बीज उत्पादन करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. या माशातील नर आणि मादी प्रयोगशाळेमध्ये काही दिवस ठेवून तिथे नैसर्गिक अधिवासासारखी निर्मिती केली. या कृत्रिम अधिवासामध्ये काही दिवस सोडल्यानंतर 'ओहाप्रीन' नावाचे इंजेक्शन नर आणि मादी यांना देऊन प्रजननासाठी त्यांना उद्दीपित केले. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. मादीने ३८00 ते ४000 पर्यंत अंडी दिली. नर माशाने शुक्राणू सोडून ती अंडी फलित होऊन यशस्वीरीत्या त्यातून पिले बाहेर पडली. काही दिवसांनी ही पिले नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर त्यांची अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढ होत असल्याचे सिद्ध झाले आहे. पावसाळ्यामध्ये जेव्हा पूर येत असतो, तेव्हा हा मासा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वरपर्यंत जात असतो. याच कालावधीमध्ये त्याचे पुनरुत्पादन होत असते. पूर्ण वाढ झालेला हा मासा ४५ सें.मी.पर्यंत लांब असतो. वजनाला २५0 ते ३00 ग्रॅमपर्यंत भरतो. नर आणि मादीमध्ये फरक जाणवतो तो प्रामुख्याने त्याच्या खांद्याकडील परामध्ये. नर माशाच्या खांद्यावर पराच्या आतील बाजूस छोट्या दातर्‍यांची ओळ असते. शरीर लांब, चपटे, तोंड मोठे आणि तिरकस, वरच्या बाजूला उघडणारे असते. तोंडामध्ये टोकदार दातांची ओळ असते, मिशा तिरकस लांब असतात. पाठीवरील एक पर छोटा असतो. शेपटीचा पर विभागलेला असतो. शरीराच्या खालील पर अत्यंत मोठा असून पोटाच्या परापासून चालू होऊन शेपटीपर्यंत जातो. या माशाचा रंग वरच्या बाजूने चंदेरी, जांभळा तर हिरवट सोनेरी छटा खालील बाजूने असते. शेपटीच्या तळाशी एक काळा टिक्का असतो. या माशाची पिल्ले काचेसारखी पारदर्शक असतात.