चर्चा:विक्रमगड तालुका

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मटा बातमीवरून एका अनामिक सदस्याने मुख्य पानावर कॉपीपेस्ट मारलेला मजकूर येथे हलवत आहे[संपादन]


या लेख http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive/msid-239094,prtpage-1.cms येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.(जून २०१२)



ठाणे जिल्ह्यातील पूर्वी जव्हार तालुक्याचा भाग असणारा, ' विक्रमगड ' हा आता नवा तालुका झाला आहे. जव्हार हे संस्थान होते. या संस्थानाचा संस्थापक महादेव कोळी या आदिवासी समाजाचा, होता. संस्थानच्या राजघराण्याचा मूळपुरुष देवराम मुकणे. हेच ' जायबा ' नावाने प्रसिद्ध पावले अन् त्यांनी स्वत:च्या पराक्रमाने इ.स.१३०६मध्ये जव्हार किल्ला जिंकून , स्वत:चे राज्य स्थापन केले. ब्रिटिश काळात त्यास संस्थानाचा ' दर्जा ' मिळाला.

जायबाला दोन मुले झाली. धुलबाराव (नेमशहा) व होळकरराव. जायबानंतर नेमशहा राजा झाला. दिल्लीच्या बादशहास डोंगराळ प्रदेशातील मुलूख जिंकता आला नाही. नेमशहाने तो जिंकला. म्हणून बादशहाने ' शहा ' किताब देऊन ६ जून १३४२ साली २२ किल्ले व नऊ लाख उत्पन्नाचा मुलूख तोडून दिला. जव्हारला राजा मिळाला. त्या दिवसापासून नेमशहाचा स्वतंत्र शक सुरू झाला. मात्र अठराव्या शतकात पेशव्यांनी जव्हारच्या राजाला अंकित केले व खंडणी वसूल करण्यास सुरुवात केली. पेशव्यांकडून या भागाची सत्ता मिळवणाऱ्या इंग्रजानी १८२३मध्ये ईस्ट इंडिया कंपनीशी तह केला. १८२६मध्ये कोकणचा कलेक्टर व मॅजिस्ट्रेट आर. एच. सॅव्हिल यांनी रिपोर्ट पाठवून दिल्यावर जव्हार संस्थान बनले.

मात्र ब्रिटिशांनी हस्तक्षेप करण्याआधीच कौटुंबिक कलहामुळे जव्हारच्या राज्याला क्षति पोहोचली. १७९ मध्ये पंतगशहा महादेव राजे निधन पावले. त्यानंतर प्रतापराव विक्रमशहा व यशवंतराव यांच्यातील संघर्ष शिगेला पोचला होता. १८२२च्या शेवटी सॅव्हिल यांच्या मदतीने राजे पंतगशहाचा नातू प्रतापराव यांना जव्हारच्या गादीवर बसवून , शांतता प्रस्तापित करण्यात आली. राज्य कारभार उत्तम चालत असताना जव्हार संस्थान १० जून १९४८ रोजी भारतीय संघराज्यात विलीन झाले.

अशा या जव्हार संस्थानात फार वर्षापूर्वी ' कुडाण ' नावाचे गाव होते. जव्हारच्या झाडीझुडीत घाटमाथ्याच्या खाली टुमदार बसलेले जुन्या बांधणीचे हे गाव. लोकसंख्या हजाराच्या आत होती. राजे विक्रमशहाच्या नावाने ' विक्रम ' असे नामकरण त्यांच्याच हस्ते झाले. या नावाच्या पुढे ' गड ' असे जोडले गेले. गड याचा अर्थ ' मुलूख ' असा अभिप्रेत आहे. तेव्हापासून विक्रमगड हे नाव सरकारी दरबारी प्रचारात आले.

संस्थानच्या काळातच विक्रमगडला पोलिस आऊटपोस्ट होते. आरोग्य सुविधा होत्या. ग्रामपंचायत १९३६ पासूनच अस्तित्वात आहे. पाहिले सरपंच डॉ. कविटकरापासून आजपर्यंत अनेक सरपंच या ग्रामपंचायतीने पाहिले आहेत ; पण लक्षात राहील , अशी कारकीर्द विष्णू परशुराम रोडगे , गोविंदशेठ भानुशाली , डॉ. सुधाकर पाटील यांची झाली.

काळ बदलत गेला , नवीन स्थित्यंतरे होत गेली. आज जशी बाजारपेठ आहे , तशीच बाजारपेठ पूवीर्ही गावात होती. आज वैश्यवाणी , भानुशाली , गुजराथी समाजाचा माकेर्टवर अकुंश आहे. दोन्हीकडे बाजार , मध्ये चौक असा सुंदर परिसर विक्रमगडच्या वैभवात भर घालीत आहे.

आज परिवर्तनाच्या वाऱ्याने या गावाच्या पारंपरिकतेला फार मोठा छेद गेला आहे. गावात मुख्य रस्त्याचे डांबरीकरण होऊन रस्ता रुंद झालेला आहे ; परंतु अतिक्रमणाचा घोळ सुटत नाही , तोपर्यंत विक्रमगडच्या बाजारपेठेला सौंदर्य बहाल होणार नाही.

मूळ गावाच्या सरहद्दीला लागून नवीन नगरे वसत आहेत. माळावर , संत रोहिदास नगरच्या पुढे नव्या वसाहती होत आहेत. वेशीवरच्या गावदेवीच्या आशीर्वादाने पूर्वीपासून मूळ आदिवासींबरोबर वैश्यवाणी, भानुशाली, गुजराती , मांगेला, शिंपी, कुणबी, कुंभार , जैन, भैये व इतर अनेक जाती-जमाती गुण्यागोविंदाने राहात आहेत. गावात कुणावर संकट आले, तर राजकारण, पक्ष बाजूला ठेवून धावून जाण्याची मनोवृत्ती गावकऱ्यांत दिसून येते.

गावात संस्थानकाळापासून अनेक उत्सव साजरे केले जात असत. अनेक मित्रमंडळापैकी सन्मित्र मंडळ गणेशोत्सव, दहीहंडी, नवरंग मित्र मंडळांतर्फे अनेक विधायक कामाबरोबर नवरात्र उत्सवात गावगरबा साजरा होतो. सूर्यवंशी क्षत्रिय भानुशाली समाजाचा गरबा लोकप्रिय आहे.

गाव तसे अगदी सपाटीवर असून आजूबाजूला मोठे डोंगर नाहीत. जव्हार तालुक्यात सूर्या , पिंजाळ , वाघ , देहरजे , दाभोशी , पंचधारा आणि कोंटबी नदी या सात नद्या उगम पावतात. विक्रमगडच्या बाजूने देहरजे (तांबाडी) नदी वाहत येते. तिच्यावरच्या पुलाखाली दरवर्षी गौरी-गणपतींचे विसर्जन होते.

गावापासून ५ कि मी. वर पालघर, डहाणू ही शहरे व्यापारी बाजारपेठ म्हणून उपयोगी ठरतात. संतोषी मंदिर हे महालक्ष्मीचे पुरातन मंदिर चारोटी हायवेवर असून दरवर्षी जत्रा भरते. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील कोहोज किल्ला जवळच आहे. ' कावळे ' येथे संतश्रेष्ठ बाळकनाथ बाबा यांचा मठ असून व्यसनमुक्ती, आध्यात्मिक शांतीसाठी प्रसिद्ध आहे. जवळच पाच हजार वर्षापूर्वीचे पांडवकालीन श्री नागेश्वर महादेव मंदिर आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून धामणी डॅम, सूर्या प्रकल्प, कवडास बंधारा प्रेक्षणीय आहेत. पावसाळ्यात हिरव्या वसुंधरेच्या नवख्या रूपामुळे स्वर्गात असल्याचा भास होतो. निसर्गाची मनसोक्त उधळण येथे पाहायला मिळते. या सर्व डॅममध्ये पाणी भरपूर आहे ; पण इकडच्या शेतकऱ्यांना या पाण्याचा काहीही उपयोग नाही. फक्त खांड बंधाऱ्याचा पिण्याच्या पाण्यासाठी व काहीजणांना शेतीसाठी उपयोग होतो. ' पलूचा धबधबा ' हे विकास करण्याजोगे पर्यटन क्षेत्र आहे. येथेही निसर्ग मुक्तपणे विहार करीत असतो. डोळे सुखावून जातात. ' उपराळे आपटीजवळ ' भिल्याडोंगर गिर्यारोहणासाठी उत्तम ठिकाण आहे. दिवेकरांनी उभे केलेले ' दिवेकर रिझॉर्ट ' हे या भागातील प्रसिद्ध ठिकाण. त्याच्या दोन शाखा विक्रमगड व सजन या मुंबईजवळच्या पर्यटकांना राहण्याचे सोयीचे ठिकाण आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात खेड्यात राहण्याचा वेगळाच आनंद मिळतो.

संस्थानच्या काळी एकच बस असायची. त्यानंतरच सर्वच प्रवास पायी , बैलगाडीचा , स्थित्यंतरे होत राहतात. ढालेगुरुजींनी पहिली टुरिस्ट मोटार गावात आणली. आज बस, जीप गाड्यांचा सुळसुळाट आहे.

विक्रमगड हे विकसनशील शहर असले , तरी मुंबईच्या जवळ असूनही तितकासा विकास झालेला नाही. बाहेरील उद्योगधंदे नाहीत , तरुण बेकार आहेत. मुख्य व्यवसाय शेती. पूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून. खांडबंधाऱ्याच्या पाण्यावर जवळचे शेतकरी जिराइती , बागायती लागवड करतात. काहीजण भाजीपाला करतात ; पण त्याची कमाई विक्रमगडच्या लहान मार्केटवर अवलंबून. उत्पन्न थोडेच असल्याने मुंबईला वाहतूक खर्च परवडत नाही. खाण्यापुरते तांदुळ , गवत विकूनच वर्षभराची गुजराण होते. स्वत:मध्ये कष्ट करण्याची धमक असताना आपली शेती ओसाड टाकून मजुरीसाठी इकडचा आदिवासी स्थलांतर करतो. शेतकरी संघटित नाही. नियोजनबद्ध शेती , तसेच साधनसामुग्रीचा योग्य उपयोग आणि योग्य मार्गदर्शन ही काळाची गरज आहे. त्यासाठी राजा जाधवसारखे नेतृत्व शेतकऱ्यांना संघटित करून शेतीधंद्याच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव योजना राबवीत आहे. योग्य सहकार्य मिळाले तर इकडचा शेतकरी सुखी होऊ शकेल , असा त्यांचा विश्वास आहे.

चौथीपर्यंत शाळा असताना सुधारणा होत , वर्ग वाढत गेले , शाळा , हायस्कूलची प्रगती होत गेली. अनेक दानशूर व्यक्तींनी , गावांतील व्यक्तींनी मदत करून वर्ग बांधले गेले. विक्रमगड हायस्कूल मोठे झाले. टोपलेसर , टिळकसर इ. अनेक आजी-माजी शिक्षकवृंद हायस्कूलच्या प्रगतीसाठी बरीच झीज घेत आहेत. मुलांच्या कलेने त्यांच्या गतीने सवडीने शिक्षण देणाऱ्या ' किलबिल बालवाडी ' चे कौतुक उभ्या महाराष्ट्रात होत आहे. झडपोली (ओंदे) येथे संजीवन ग्रामीण , वैद्यकीय , सामाजिक , साह्यता प्रतिष्ठान संचालित कला , वाणिज्य , विज्ञान कॉलेज गेल्या वषीर्पासून सुरू आहे.

डॉ. परेश अरुण मनोरे हे ' न्यूरोथेरपी ' मध्ये उभ्या महाराष्ट्रात भारतात ही सर्वप्रथम येऊन सध्या बंगलोर येथे अनेक असाध्य रोगांवर संशोधन करीत आहेत. शहरातील आदिवासी , वैश्यवाणी , भानुशाली , कुणबी , आदिवासींतील कोणी डॉक्टर , इंजिनीअर , अन्य उच्च विद्या विभूषित , व्यावसायिक , राजकारणी , समाजकारणी झालेले आहेत. शहर जेथे नतमस्तक होते , अशा स्वातंत्र्यसैनिकांचे हे गाव आहे. त्यातील श्री. प्रभुदास सीताराम भानुशाली यांनी 1920 मध्ये हमरापूर येथे मिठाचा सत्याग्रहात भाग घेतला. ते वसई-ठाणे जेलमध्ये सहा महिने होते. दुसरे श्री. मुकुंद जीवन संख्ये ' भारत छोडो ' आंदोलनात सहभागी होते. ते 1946 मध्ये काँग्रेसतफेर् आमदार म्हणून निवडून आले.

तालुक्यात 80 टक्के आदिवासी. आदीवासी वारली समाजात ' लोककलेला ' फार महत्त्व आहे. आश्विनाच्या प्रारंभापासून पौणिर्मेपर्यंत प्रत्येक गावात-पाड्यापाड्यावर ' तारपा नृत्य ' चालते. तसेच ' धुमसेनाच ', ' कामडीनाचा ' चे ेप्रकार असतात. पारंपरिक ' बोहाडा ' रंगपंचमीच्या दिवशी साजरा करतात. गणपतीस नमन करून सुरवात करतात. शेवटी ग्रामदैवतेचे मुखवटे घेऊन त्यांना नाचवून भक्तिभावाने घरोघर फिरवले जातात. सध्या या भागात बोहाड्याचे प्रमाण कमी होत चालले आहे.

विक्रमगड तालुक्याच्या निमिर्तीस चौथे वषेर् लागले आहे. आदिवासी विकास मंत्री असताना विष्णू सावरा यांनी विक्रमगडला तालुक्याचा दर्जा दिला. जेणेकरून तालुक्याचा विकास व्हावा

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १६:३३, २८ जून २०१२ (IST)[reply]

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले