Jump to content

चर्चा:वामन लक्ष्‍मण कुलकर्णी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:वा.ल. कुलकर्णी या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रा. वा. ल. कुलकर्णी

[संपादन]

बालपण व जडणघडण

[संपादन]

वा. ल. अर्थात वामन लक्ष्म्ण कुलकर्णी यांचा जन्म पूर्वीच्या खानदेश जिल्ह्यातील चोपडे या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण नाशिक हायस्कूल नाशिक येथे तर पदवी व पदव्युखत्तर शिक्षण हं. प्रा. ठाकरसी कॉलेज, नाशिक व विल्सन कॉलेज, मुंबई येथे झाले. बी.ए. (इंग्रजी) व एम.ए. (मराठी) शिक्षणानंतर ते मुंबई येथे छबिलदास हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत झाले. (१९३५-३६). पुढे १९४४ पर्यंत विल्संन हायस्कूल, मुंबई येथे शिक्षकी पेशा केल्यानंतर विल्सन महाविद्यालयात प्राध्यापक म्‍हणून अध्यापनाचे कार्य. नंतर १९५९ पासून औरंगाबाद येथील तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्यां मराठी भाषा व वाङ्मय विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत झाले. येथे त्यांनी १९७३ पर्यंत कार्य केल्यानंतर १९७४ ते १९७६ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्‍हणून रूजू झाले. येथून ते १९७६ मध्ये निवृत्त झाले.https://mr.wikipedia.org/s/szv

ग्रंथसंपदा

[संपादन]

ग्रंथ

  • वामन मल्हार : वाङ्मयदर्शन (१९४४)
  • वाङ्मयातील वादस्थळे (१९४६)
  • वाङ्मयीन मते आणि मतभेद (१९४९)
  • वाङ्मयीन टीपा आणि टिप्पणी (१९५३)
  • वाङ्मयीन दृष्टी आणि दृष्टिकोन (१९५९)
  • श्रीपाद कृष्ण : वाङ्मयदर्शन (१९५९)
  • साहित्य आणि समीक्षा (१९६३)
  • मराठी ज्ञानप्रसारक : इतिहास आणि वाङ्मयविचार (१९६५)
  • साहित्य : शोध आणि बोध’ (१९६७),
  • न. चिं. केळकर : वाङ्मयदर्शन (१९७३)
  • हरिभाऊंची सामाजिक कादंबरी (१९७३)
  • साहित्य : स्वरूप आणि समीक्षा (१९७५)
  • विविधज्ञानविस्तार : इतिहास आणि वाङ्मयविचार (१९७६)
  • मराठी कविता : जुनी आणि नवी (१९८०)



संपादने

  • मराठी कविता (१९२०-१९५०) (१९५०)
  • हरिभाऊंच्या कादंबरीतील व्यक्ती (१९६२)
  • मराठी नाटक आणि रंगभूमी (१९६३)
  • काव्यानतील दुर्बोधता (१९६६)
  • मराठी समीक्षा (१९७२)
  • एका पिढीचे आत्मकथन (१९७५)


वामन लक्ष्मण कुलकर्णी असे दोन लेख झाले आहेत ते एकत्र करावे लागतील.WikiSuresh (चर्चा) १२:१०, २ मार्च २०१८ (IST)[reply]