चर्चा:वासुदेव वामन बापट गुरुजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्रोत शोधा: "वासुदेव वामन बापट गुरुजी" – बातमी, वृत्तपत्रे, पुस्तके, गुगल स्कॉलर, हायबीम, जेस्टोर संशोधन लेखांचा संग्रह, मुक्तस्त्रोत चित्रे, मुक्तस्त्रोत बातम्या, विकिपीडीया ग्रंथालय, न्यु योर्क टाईम्स, विकिपीडिया संदर्भ शोध वरील दुव्यांचा वापर करुन आपण सदर लेखाला आवश्यक संदर्भ शोधू शकाल, आणि ते जोडता येतीलच. धन्यवाद सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०४:११, ६ सप्टेंबर २०१८ (IST) वासुदेव वामन बापट गुरुजी ह्या पृष्ठावर

जाहिरातबाजी, वैध संदर्भांचा अभाव, नि:पक्षपाती दृष्टिकोनाचा अभाव, व्यक्तिची विश्वकोशीय उल्लेखनियता प्रश्नांकित असा tag लावण्यात आला आहे, त्या मागचे स्पष्टीकरण मिळेल काय ?

नक्की कुठला बदल केल्यास माहिती स्वीकारार्ह होईल ?

मी विकिपीडिया वरती नवीन असल्याने कृपया मार्गदर्शन करावे.


जाहिरातबाजी - हा हेतू अजिबात नाही. केवळ सद्भावनेने लिहिले आहे. आपण मार्गदर्शन केल्यास आवश्यक तो बदल केला जाईल.

विकिपीडिया वरती उपलब्ध असलेल्या इतर अनेक लेखांचा संदर्भ पाहून अभ्यास करूनच ही पोस्ट टाकण्याची हिम्मत केली होती.

वैध संदर्भांचा अभाव- म्हणजे नक्की काय ?

पुस्तकांचा संदर्भ - पुस्तके प्रकाशित असून पुराव्यानिशी उपलब्ध आहेत. वेबसाईट काही काळ बंद असल्याने ते संदर्भ बदलले असतील, तरी वेळ मिळताच त्यांच्यात सुधारणा करण्यात येईल.

नि:पक्षपाती दृष्टिकोनाचा अभाव - कृपया सोदाहरण स्पष्टीकरण द्याल अशी अपेक्षा, म्हणजे योग्य बदल करता येईल.

व्यक्तिची विश्वकोशीय उल्लेखनियता प्रश्नांकित - ह्याचा अर्थ कळला नाही. समजावून सांगाल का?

ह्या गोष्टींची माहितीच नसल्याने चूका घडू शकतात, तेव्हा आपण मार्गदर्शन केल्यावर चूका टाळून लिखाण करता येईल. तरी राग न मानता मदत करावी, अशी विनंती आहे.

ह्या लेखात सुधारणांबाबत[संपादन]

Gnome-edit-redo.svgमाधवी वाघ:

 • आपण जोडलेले सर्व संदर्भ http://www.yadnya.in/home.php या एकाच संकेत स्थळावरील आहेत, ज्याचा अर्थ जाहिरातबाजी असा लावला जातो त्यामुळे मी हे सर्व दुवे जे ह्या संकेतस्थळावरील चित्रांचे आहेत ते काढत आहे. आपण त्यांना मानाकिंत वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांचे संदर्भ द्यावेत ही विनंती.
 • शिवाय आपण ह्या लेखात अनेक ठिकाणी मजकूराला अनावश्यक जाड केले आहे, तेही काढून टाकत आहे. शिवाय लेखामध्ये अनेक काव्ये, पदे, मंत्र आहेत ते ही काढले जातील. धन्यवाद. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०३:०३, ५ सप्टेंबर २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgसुरेश खोले:

ठीक आहे. काही हरकत नाही. घालताना साशंक होते, पण म्हटलं चुकलं तर तुम्ही सांगालच..!

पण तुम्ही संदर्भांच्या सोबतीने काही माहितीही काढून टाकली आहे, जसे सामाजिक उपक्रम - गणेश घाट स्वच्छता, ज्यांचा संदर्भ लोकसत्ताच्या बातमीचा होता. तुम्ही तपासला सुद्धा होता, मग तो का गाळला ? ती माहिती चुकून वगळली गेली की, तुम्ही काही कारणाने काढून टाकलीत ? एकाच वेबसाईटवरचे असल्याने फोटोंचा संदर्भ काढला ते कारण मान्य, पण माहिती काढण्याचं कारण कळलं नाही, जरा समजवाल का?

संदर्भहीन असे बरेच साहित्य विकिपीडियावर आहे. कारण प्रत्येक वाक्याचा संदर्भ देता येत नाही. ज्यांचा देता येतो, ते देण्याचा प्रयत्न केला जात आहे,. तुम्ही केलेले बदल स्तुत्य आहेत, पण काही बाबतीत कारणाशिवाय माहिती वगळली गेल्याने मला अमान्य वाटत आहेत. तेव्हा कृपया आपण थोडे स्पष्टीकरण द्याल तर बरे होईल. धन्यवाद. तोवर मी ती माहिती पुन्हा घालू शकते का ?

अजून एक शंका -- 'शिवाय आपण ह्या लेखात अनेक ठिकाणी मजकूराला अनावश्यक जाड केले आहे, तेही काढून टाकत आहे. '- मान्य. पण सगळ्याच गोष्टी अनावश्यक नव्हत्या. लेख ज्यांच्या नावे आहे, ते नाव निश्चित ठळक असले पाहिजे, असे वाटते. मी काल लेखात सुधारणा करताना, तुम्ही ज्या सुधारणा केल्या होत्या, त्यावरूनच मी पुढच्या सुधारणा केल्या. तुम्ही देखील मथळे ठळक केले होते, मग आता मी सुधारणा केल्यावर अचानक असं काय झालं? मला कळलं नाही.

दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणताय - 'शिवाय लेखामध्ये अनेक काव्ये, पदे, मंत्र आहेत ते ही काढले जातील.' - आपण सूज्ञ आहात, लेखात कोणत्याही प्रकारचे काव्य, पदे आणि मंत्र ह्यांचा अंतर्भाव केला गेला नसताना आपण असे विधान करीत आहात. 'यज्ञप्रार्थना' होती, जी तुम्ही आता काढून टाकली आहे. मात्र आणखी कुठलाही मजकूर मंत्र-पद्य वगैरे विभागात मोडत नाही, नव्हता. सर्व मजकूर गद्यच आहे आणि होता, आणि तो तुम्ही 'विनाकारण' वगळला आहे, असं माझं मत झालं आहे. तरी आवश्यकता भासल्यास ते खोडून काढणं तुमच्याच हातात आहे.

आपण जाणते आहात आणि आपला अमुल्य वेळ देऊन आपण मला ह्या लेखासंदर्भात सहाय्य करीत आहात, म्हणून मला आपला आदर आहे,

पण तटस्थ वृत्तीने जसे लेख लिहिणे अभिप्रेत आहे, तसेच तटस्थ वृत्तीने परीक्षणही व्हावे अशी माफक अपेक्षा आहे. कृपया राग मानू नये. पण विकिपीडिया वरती असे कित्येक लेख आहेत, ज्यांना काहीही संदर्भ नाही, काही लेखांना खरंतर काही अर्थही नाही. विकिपीडियावरती इतरही असे बरेच लेख आहेत, ज्यांची बिलकुल आवश्यकता नाही, ते सुधारण्याचा प्रयत्न चालू असेलही. पण त्याच्या तुलनेत हा लेख अगदीच कुचकामी आहे, असं आपल्याला वाटतं का ? असं असल्यास का? नियम सर्वत्र सारखा नाही का? असो, आपण ह्या लेखासंदर्भात, आपला 'स्पष्ट नकार' नोंदवत आहात असे मी समजायचे का ? आपण जर हा लेख 'वगळायचाच' असं ठरवूनच ठेवलं असेल, तर मी ह्या लेखावर अतिरिक्त मेहनत घेणं बंद करते. माझाही वेळ वाचेल. मला शिकायची आवड आहे, माझं योगदान मी विकिपीडियातील इतर ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत राहीन, मात्र ह्या लेखावर काम करणे बंद करीन. आपल्या मनात जे असेल, ते स्पष्ट सांगा, म्हणजे मी ह्या लेखावर प्रयोग करणे थांबविन.

आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. माझ्याकडून अधिक बोलले (लिहिले) गेले असल्याबद्दल क्षमस्व.

चूक-भूल द्यावी घ्यावी.

--माधवी - उत्तम ते घ्यावे.... मळमळीत अवघेचि टाकावे ....!! १२:००, ५ सप्टेंबर २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgमाधवी वाघ:

* धन्यवाद, आपण संपादनांकडे गांभिर्याने पाहून, इतर लेखही सुधारत आहात, तपासत आहात हे वाचून आनंद झाला, आपण हे असेच चालू ठेवाल ही आशा.
 • आता मुद्दा विकिवर अनेक असे संदर्भहीन लेख असतीलही, पण आपणाला हेही लक्षात आले असेल की, मी आणि अनेक इतर सदस्य खासकरून प्रचालक मंडळी या लेखांना सतत सुधारणेसाठी कार्यरत असतात. त्यामुळे शक्य तेवढे लिखाण सुधारले जाईल ही आशा, इतके दिवस/वर्षे अनेक कारणांनी विकिवर येणारे लिखाण निट तपासले जात नव्हते किंवा अनेकदा नजरचुकीने राहुनही गेले आहे, येथे काम करणाऱ्या मनुष्यबळाची कमतरता आणि शक्यतो सदस्यांना लिहिते करण्याकडे सर्वांचा कल असल्याने लिखाणावर कडक कारवाई झालेली दिसत नाही.
 • गेल्या काही महिन्यांपासून अशी कारवाई होताना आपल्याल दिसेलच. त्यातही दुसऱ्या ठिकाणाहून मजकूर सरळ उचलून इथे आणणे, वैयक्तिक मते मांडणे प्रकर्षाने वगळले जात आहे.
 • शिवाय आपल्याला जर टिकणारे लिखाण करायचे असेल तर, आपल्याला मानांक पाळणे जाणे महत्वाचे असे मी आधीच सुचवले आहे. म्हणूनच दुसऱ्या लेखांकडे अंगुलीनिर्देश करण्यापेक्षा आपण सदर लेख कसा उल्लेखनीय बनवता येईल हे पाहूयात.
 • आपण इतर लेख पहावेत, ज्यांमध्ये कुठे अक्षरे मोठी आहेत आणि कुठे नाहित हे तपासता येईल.
 • प्रत्येक वाक्याला नव्हे तर विधानाला संदर्भ हवे आहेत असे मी आधिच सुचवले आहे.
 • आपल्या म्हणण्यानूसार मी मंत्र काढले आहेत, हो मंत्र लेखाचा भाग होत नाहीत, घटनांची चित्रे मजकूराला पाठींबा देतात पण संदर्भ होत नाहीत. त्यामुळे ते काढले आहे.
 • गौरवीकरण करणारा, कौतुके करणारा मजकूर सरळ सरळ वगळला जावा असा संकेत आहे, तो वगळला आहे.
 • सदर लेख टिकविण्याचा माझाही प्रयत्न आहे, नाहीतर सरळ-सरळ जाहिरातबाजी आणि पान काढा असा साचा लावून मी मोकळा झालो असतो आणि प्रचालकांना ते पटल्यास त्यांनी हे पान कधीच काढून टाकले असते.
 • शिवाय आधिच सांगितल्या प्रमाणे मी तुम्हांला हे ही सांगितले होते की, आपला मजकूर वगळला जाण्याची शक्यता असतेच तेव्हा सबुरीने घ्या आणि परत लिहा. संदर्भ द्या.
 • माझ्या मनात जे आहे ते विकिच्या नियमांमधूनच येते, मी आपल्याला सांगत आहे की, वेगवेगळ्या ठिकाणचे वैध बातम्यांचे संदर्भ देऊयात आणि हा लेख टिकवूयात. पण सध्याची ह्या लेखाची स्थिती वाईट आहे.
 • लोकसत्ताच्या ज्या संदर्भाविषयी‌ आपण बोलत आहात तो नजरचुकीने काढला गेला आहे तो मी परत जोडतो, परंतू गुरुजींनी केलेल्या सामाजिक कार्याचे रितसर पुरावे द्यावेच लागतील त्याची पुस्तकात किंवा बातम्यांत आलेले संदर्भ इथे देता येतील.
 • आपण मी काय म्हणत आहे हे समजुन घेण्यासाठी परिचय, पाच आधारस्तंभ आणि काय नव्हे हे अभ्यासावे ही मी विनंती करित आहे, हे वाचा समजून घ्या, शंका आल्यास विचारा, प्रश्न विचारल्यावर मला राग येत नाही, आपण हा लेख टिकवूयात त्याबद्दल दुमत नाही पण नियमात राहुनच टिकवूयात जेणेकरुन आपल्याला शिकायला मिळेल. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०३:५७, ६ सप्टेंबर २०१८ (IST)


संदर्भ आवश्यकच ........[संपादन]

नमस्कार, आपण विकिपिडीया वरचे सन्माननीय सदस्य आहात. ज्या ज्या मराठी व्यक्तींनी जे कोणते उल्लेखनीय कार्य केले असेल ते लोकांपर्यंत, नव्हे सर्व विश्वात पोहोचावे हा विकिपिडीयाचा उद्देश आहे. तेव्हा विषयाच्या वा विषयांकित सन्माननीय व्यक्तीच्या विकिपिडीयावरील पानाच्या उपयुक्तते विषयी चर्चा न करता आपण नवीन लेखकांना मार्गदर्शन देऊन लेख नियमानुसार लिहून घेतलात तर आम्ही सर्वच आपले आभारी राहू. विषयांकित सन्मानीय व्यक्तीने स्वतः विषयी कोणतीही प्रसिद्धी कधीही केली नाही व सदर व्यक्ती आज इहलोकात नाही. तेव्हा नेटवर व इतरत्रही त्रोटक संदर्भ आहेत. मात्र प्रसिद्ध ग्रंथ, लेख, वृत्तपत्रीय लिखाण, पुस्तक परीक्षणे अशा संदर्भाची ( जे नेटवर असतीलच असे नाही) माहिती इथे नक्कीच देता येईल. विचार प्रसारित होण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, ते विचार प्रत्येकाला पटावेत असा आग्रह निश्चित नाही. विषयांकित सन्माननीय व्यक्तीचा सुद्धा तो आग्रह कधीच नव्हता. लेख लिहिणाऱ्या व्यक्तीने काही आक्षेपार्ह अथवा चुकीचे लिहिले असेल, अथवा त्यास योग्य संदर्भ दिला नसेल तर आपण तो नक्कीच सुधारा आपले आक्षेप नोंदवा, मात्र पान काढून टाकू नका ही नम्र विनंती.


अतिरंजित माहितीचेही काही ठोस निकष नसावेत -- उदाहरणार्थ ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली ही माहिती एखाद्याला अतिरंजित वाटेल, तर अनेक श्रद्धावान साधकांना ती अगदी अचूक वाटेल. शिवाय ह्या गोष्टीचे पुरावे उपलब्ध नाहीत. आंतरजालात तर नाहीच. तरीही आपल्याला जो मजकूर अतिरंजित किंवा जाहिरात करण्याचा वाटत असेल तो जरूर वगळू. इथे विचारांची जाहिरात आहे , परंतु भक्तसंख्या वाढवणे किंवा लोकं गोळा करणे हा अजिबात हेतू नाही हे नम्रतेने नमूद करू इच्छिते.

Gnome-edit-redo.svgमेघना केळकर:

 • सर्वप्रथम विकिपिडीयाचा उद्देश मराठीमध्ये विश्वकोश म्हणून प्रस्थापित होणे आहे, एखाद्या व्यक्तिचा त्यात उल्लेख व्हावा असे आपल्याला वाटून भागत नाही, त्यासाठी ती उल्लेखनीयता कोणत्याही विश्वकोशात जशी सिद्ध करावी लागते तशीच संदर्भ देऊन सिद्ध करावी लागते.
 • त्यामुळे आपण संदर्भ देऊयात आणि लेख टिकवूयात, बातम्यांमध्ये आणि इतर पुस्तकांमध्ये नक्कीच उल्लेख आलेले असतील ते घेऊयात, ती पुस्तके आपण नेटवर नसली तरी त्यांचे संदर्भ देऊ शकतो तो प्रश्न नाही.
 • ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली असा उल्लेख चुकीचाच आहे तो काढून टाकणे मला आवश्यक ह्यासाठी वाटते कारण, माऊलींच्या ज्ञानप्रसाराच्या कार्याचे संदर्भासहित लिखाण मला जास्त आवश्यक वाटते, ब्राह्मणांच्या कारस्थानात संस्कृतातात अडकलेले त्यांनी प्राकृतात आणले हे जास्त महत्त्वाचे आहे, आपण त्याविषयी जरुर लिहावे आणि त्याला संदर्भ देता येतीलच. पण भिंत चालवली हे सांगुन कोणाचे भले होणार आहे बरे? मला अशी आशा आहे आपल्याला माझा मुद्दा लक्षात आला असेल, आपणही माधवी वाघ यांना सुचवलेली पाने अभ्यासल्यास आपल्याला मी काय म्हणतो याची स्पष्टता येईलच. बाकी शंका असल्यास साद द्या मी आपल्याला नक्कीच उत्तर देईन. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०४:०९, ६ सप्टेंबर २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसुरेश खोले, माधवी वाघ: मी पुन्हा एकदा www.yadnya.in ह्या संकेत स्थळाचा संदर्भ दिला आहे, माझ्या मते एकदाच हा संदर्भ दिल्याने जाहिरात बाजी होत नाही, शिवाय निधन वार्ता संदर्भ पहिला कशाला?? त्यापेक्षा अधिकृत संकेत स्थळ उत्तम, इतर संदर्भ शोधले आहेत, ते एक एक करून टाकूया, गुरुजींनी अनेक ग्रंथ लिहिले, दीडशे हून अधिक लेख लिहिले आणि अविरत समाज कार्य आणि आध्यात्मिक कार्य केलं, एक दोन नव्हे, सतत पंचवीस वर्ष! कुठेही असमता येऊ दिली नाही, सर्व जाती-धर्म-पंथातल्या स्त्री-पुरुषांना एकत्र केलं, त्यात अमुक जात म्हणून नको, विधवा म्हणून नको, असे भेद केले नाहीत, सर्वांना मंत्र दीक्षा आणि सर्व सत्कर्माचे अधिकार दिले, प्रत्येक गोष्टीकडे विचक्षक दृष्टीने बघायला शिकवले, पिढ्यानपिढ्या केलं म्हणून आजही तसंच करतो ही अंधानुकरणीय मानसिकता बदलली. न्यूटन, आईनस्टाईन आणि श्रोडिंगर सारख्या पदार्थ विज्ञानातल्या महापुरुषांना आध्यात्मिक क्षेत्रातल्या महापुरुषांशी वैचारिक दृष्ट्या जोडायचा प्रयत्न केला. दुर्दैवाने (??) हे करताना कुठेही मुलाखती दिल्या नाहीत, स्वतः विषयी काही छापून आणलं नाही, कोणत्या पुरस्कारासाठी अर्ज केला नाही. पण त्यामुळे त्यांची उल्लेखनीयाता कमी होते असं वाटत नाही. अतिरेकी भक्त मानसिकता टाळून पण तरीही त्यांच्या उत्तम आणि एकनिष्ठेने केलेया कार्यातून जशी अनेकांना प्रेरणा मिळाली, तशीच ती पुढेही अनेकांना मिळावी ह्या हेतूने हे पान पुनश्च लिहूया. त्यासाठी त्यांच्या बद्दलचे काही संदर्भ शोधतो आहोत.

Gnome-edit-redo.svgमेघना केळकर, माधवी वाघ:

 • धन्यवाद, आपण दोघींही पुढील लिखाण करण्या आधी मी वर दिलेले वाचून घ्याल अशी आशा जेणेकरुन समस्या येणार नाहीत.
 • दोन सदस्यांना साद देताना असे लिहायचे, हे माहिती म्हणून सुचवतो.
 • संदर्भ कसे द्यायचे हे सोप्या पद्धतीने मी इथे लिहिले आहे ते ही पाहून घ्या. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १३:३१, ७ सप्टेंबर २०१८ (IST)

संदर्भांसहित स्पष्टीकरण..[संपादन]

Gnome-edit-redo.svgसुरेश खोले:

आपल्याला पुनश्च धन्यवाद ! आपल्या सुस्पष्ट लिखाणातून माझा संदेह मिटला. दोन दिवस मी विकिपीडियासाठी वेळ देऊ शकले नाही. मात्र आता आपले लेख आणि आपण सुचवलेले अधिकीचे अभ्यासासाठीचे माहिती-लेख प्रथम नीट वाचून आणि समजून घेते. आणि त्यानंतरच मूळ मसुदा / लिखाण संपादन करते. थोडीशी चाचपणी करताना लक्षात आलं की, हे काम बरेच क्लिष्ट आहे, त्यामुळे चांगल्या अभ्यासावाचून गत्यंतर नाही. अभ्यासासाठी मला काही दिवसांची मुदत देण्यात यावी. शक्यतो लवकरात लवकर योग्य त्या पद्धतीने आणि योग्य ते संदर्भ घालून ह्या लेखात सुधारणा करण्यात येईल. संदर्भ कसे द्यावेत ह्यासाठी आपण करीत असलेल्या अधिकीच्या मार्गदर्शनाबद्दल आपले पुनश्च आभार ! - माधवी वाघ *उत्तम ते घ्यावे ... मळमळीत अवघेचि टाकावे !* (चर्चा) १८:३९, ८ सप्टेंबर २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgमेघना केळकर:

आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. संदर्भ-बदलांविषयीचे आपले मत मला मान्य आहे. तसेच समाजात अशा बऱ्याच व्यक्ती असतात, ज्या निःस्वार्थ आणि निरपेक्ष वृत्तीने कार्यरत असतात.आपण त्यांचा सन्मान योग्य पद्धतीने केलाच पाहिजे. संदर्भित लेख विकिपीडियाच्या तत्त्वांनुसार संपादित करण्यासाठी, मी नक्कीच योग्य ते संदर्भ जोडण्याचा प्रयत्न करीन. जिथे आवश्यकता भासेल, तिथे आपण सहाय्य करालच ह्याची खात्री आहे. धन्यवाद ! - माधवी वाघ *उत्तम ते घ्यावे ... मळमळीत अवघेचि टाकावे !* (चर्चा) १८:३९, ८ सप्टेंबर २०१८ (IST)

नवीन संदर्भांसहित पुनर्लेखन[संपादन]

Gnome-edit-redo.svgसुरेश खोले:

नवीन संदर्भांसहित पुनर्लेखन सुरु केले आहे. एक-दोन दिवसांत लेख संदर्भांसहित पूर्ण करण्यात येईल. कृपया त्यानंतर आपण त्यात बदल / सूचना सुचवाव्यात. संदर्भ शोधून लेख सुधारण्याचे काम खरंच अवघड आणि किचकट असल्याने, ह्या कामासाठी लागलेल्या विलंबानिमित्त क्षमस्व. - माधवी वाघ *उत्तम ते घ्यावे ... मळमळीत अवघेचि टाकावे !* (चर्चा) २२:४३, २६ ऑक्टोबर २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgमाधवी वाघ: धन्यवाद, आपण प्रयत्न करुन लेख सुधारत आहात हे वाचुन आनंद झाला. काही मदत लागली तर बिनधास्त साद द्या, QueerEcoFeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २१:४०, २३ ऑक्टोबर २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgसुरेश खोले: नमस्कार. संदर्भ घालताना एक अडचण येतेय. एक संदर्भ हिंदी मासिकातला असल्याने, संदर्भ लेखाचे शीर्षक हिंदीतून आहे. आणि ते मराठी विकिपीडिया स्वीकारीत नाहीये. काय करावे? दोनदा प्रयत्न करून झाला. हिंदी भाषा / मजकूर चालणार नाही, अशा आशयाचा साचा येतोय. संदर्भ लेखाचे शीर्षक मला इथेही लिहिता येत नाहीये ! तोच साचा इथेही दाखवला जातोय. हे शीर्षक गाळल्यावर लेख / बदल स्वीकारले जात आहेत. हा संदर्भ कसा घालावा ? मी बाकीच्या बाबी ठेवून फक्त शीर्षक गाळले आहे. कृपया मदत करावी. - माधवी वाघ *उत्तम ते घ्यावे ... मळमळीत अवघेचि टाकावे !* (चर्चा) २२:४३, २६ ऑक्टोबर २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgमाधवी वाघ:

 • मला साद देताना आता, सुरेश खोले या नावाऐवजी, QueerEcoFeminist या नावाने द्या म्हणजे मला मिळेल मी नाव बदलून घेतले आहे.
 • आपल्याला समस्या असलेला संदर्भ मी बदलेला आहे, मी आपल्याला सायटोईड वापराबद्दल सुचवले होते ते वापरून आपण संदर्भ दिले असते तर हा त्रास झाला नसता.
 • असो, लेख बरा झाला आहे, अजुन तांत्रिक बाबी राहातात, त्या हळूहळू होतीलच, जाहिरातबाजीची भाषा सुधारणे आवश्यक आहे, पण तेही हळूहळू होईलच. मस्तच तुमची मेहनत कामाला आली.
 • आता धार्मिक बाबीं व्यतिरिक्तही लिहा इतर इषयांवर, अडचण आली तर विचारा बिनधास्त. तुमचा पहिला लेख आणि तो ही बराच मोठा तुम्ही स्वत: लिहिला आहे आणि संदर्भ देऊन लिहिला आहे, त्यामुळे तुमचे अभिनंदन.
 • आता तुम्हीच बघा तुम्ही आधी केलेला लेख आणि आता झालेला लेख ह्यात काय नक्की फरक आहे आणि कोणता तुम्हाला चांगला वाटतो. ? QueerEcoFeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०३:३६, २७ ऑक्टोबर २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgमाधवी वाघ: उत्तम प्रकारे लेखाला उचित असे संदर्भ दिले आहेत. अजूनही थोडे बदल करून लेख चांगला करुया .

Gnome-edit-redo.svgQueerEcoFeminist: श्री खोले, आपल्या सूचनांनुसार लेखामध्ये बरेच बदल सुरु आहेत. सुधारण्याची प्रक्रिया निरंतर सुरु राहील. परंतु आता ह्या लेखाला " विश्वकोशिय उल्लेखनीयता साशंक" आणि " ह्या महिन्यात वगळण्यात येणारे लेख" ह्या मथळ्यातून वगळण्याला हरकत नसावी. दिनांक ११ नोव्हेंबर २०१८ रोजी श्री गुरुजींचे तृतीय पुण्यस्मरण आहे. तेव्हा हे औचित्य साधून आपण जर हा लेख त्यांच्या पुण्यस्मृतीला अर्पण करू शकलो तर आम्ही आपले अत्यंत आभारी राहू.