चर्चा:राष्ट्रीय एकात्मता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जन्मशताब्दी शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी असून, हा दिन ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा करण्याचे भारत सरकारने ठरविले आहे. १९८४ साली याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी अंगरक्षकांनी हत्या केली होती.

सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यानंतर देशाची राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी दिलेल्या योगदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी, असे सरकारला वाटते. सरदार पटेल हे भारताचे ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखले जातात. स्वातंत्र्यानंतर खासगी संस्थानांचे भारतात विल‌िनीकरण घडवून आणण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली व त्यामुळे एकसंघ आधुनिक भारताची निर्मिती झाली. ‘राष्ट्रीय एकता दिवस’ ही एक लोकप्रिय चळवळ व्हावी, या उद्देशाने सरकार विविध उपक्रम राबविणार आहे. त्यात विविध ठिकाणी ‘एकतेसाठी दौड’ (रन फॉर युनिटी) आयोजित केली जाईल. सायंकाळी पोलिस, एनसीसी, एनएसएस, बालवीर व वीरबाला, गृहरक्षक दल इत्यादींचे संचलन होईल. सर्व संबंधित विभागांना याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातमध्ये करमसंद या गावी झाला. गुजरातमध्ये खेडा, बोरसाड आणि बारडोली येथे शेतकऱ्यांची चळवळ त्यांनी उभारली होती व ब्रिट‌िश राजवटीविरुद्ध ‘चले जाव’ आंदोलन प्रभावी केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रारंभी देशातील सुमारे ५०० संस्थानात राजे-महाराजांचा स्वतंत्र कारभार चालत होता. परंतु सरदार पटेल यांनी या संस्थानांचे भारतात यशस्वी विलिनीकरण घडवून आणले. त्यामुळे देशाचे अनेक तुकड्यात विभाजन होण्याचे टाळण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा सिंहाचा वाटा आहे