Jump to content

चर्चा:युनायटेड किंग्डमचा तिसरा जॉर्ज

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Latest comment: १ महिन्यापूर्वी by अभय नातू in topic स्थानांतर

स्थानांतर

[संपादन]

“यूनाइटेड किंग्डमचा तिसरा जॉर्ज” हे नाव अतिशय लांब आहे; आणि अजून दुसरे जॉर्ज तृतीय असे राजे छोटे आणि अप्रसिद्ध आहेत. “जॉर्ज तृतीय” लेखाचे नाव होऊ दे. यांना पूर्ण लेख राहू दे, आणि एक निःसंधिग्धीकरणाचे पान बनवू गरज पडली तर. TheonlyPuneriintown (चर्चा) २०:१३, १० एप्रिल २०२६ (IST)Reply

(देश)ाचा/ची (क्र)वा/वी (नाव) हा शीर्षकलेखन संकेत आपण पाळतो. याने नेमके कुठला राजा, कितवा राजा आणि नाव काय हे लगेचच कळते. जरी इंग्लंडचे (काही) राजे (भारतात) प्रसिद्ध असले तरी त्याच त्याच नावाचे अनेक राज्यकर्ते (विशेषतः युरोपमध्ये) आढळतात. यांच्यापैकी अनेकांना मोठा इतिहास आणि महत्व असते. विशिष्ट आणि नेमका संकेत न पाळल्यास गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. हा संकेत बदलण्यासाठीचे नेमके कारण समजले नाही.
अर्थात अपवादाने वेगळी शीर्षकेही असतात, उदा. दुसरे शाहू. तसेच इतर नामाभिधानांपासून, उदा. तृतीय जॉर्ज पुनर्निदशने असावीतच. यामुळे इतर नावे शोधल्यास नेमक्या लेखाकडे वाचक पोचेल.
अभय नातू (चर्चा) २०:२३, १० एप्रिल २०२६ (IST)Reply