चर्चा:माणगंगा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इतर लेखातून आणलेला मजकूर येथे समाविष्ट करावा.

अभय नातू (चर्चा) ०९:३८, २३ ऑगस्ट २०१५ (IST)


माणगंगा नदी ही महाराष्ट्रातील एक नदी आहे.

माणगंगा नदीचे उगमस्थान[संपादन]

तमाम दुष्काळग्रस्तांची गंगामाई असणारी माण नदी ही सातारा जिल्ह्यातील दहिवाडी गावाजवळ सीतामाईच्या डोंगररांगामध्ये उगम पावते. हे ठिकाण झाडाखाली आहे. सध्या ते एका हौदात बंदिस्त करून ठेवलेले आहे. तिथे सीतामाईचे मंदिर आहे. शिवाय जवळच बाणगंगा नदीचाही येथे उगम होतो. येथून माण नदी जमिनीत लुप्त होते. ही नदी या ठिकाणापासून परत डोंगराच्या दुसऱ्या बाजूला उमाळ्याच्या स्वरूपात उगम पावते. तेथून पुढे मात्र अखंड ८ कि.मी. अंतरावरील आंधली धरणापर्यंत ओघळ स्वरूपात वाहते.

भौगोलिक निश्चित स्थान[संपादन]

माणगंगा नदीचा विस्तार ७४°२२’30” पूर्व रेखावृत्त ते ७५° ३०’ पूर्व रेखावृत्त आणि १७° ००’ उत्तर अक्षवृत ते १७°५१’४२” उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे.

उगमस्थान[संपादन]

माणगंगा नदीच्या उगमस्थानी असलेल्या सीता मंदिरातील सीतामातेची मूर्ती -
भगीरथाच्या अथक प्रयत्नाने स्वर्गातली गंगा भूलोकी अवतरली असे मानण्यात येते. त्या प्रमाणेच माणगंगा नदी बाबतही एक आख्यायिका सांगतात. रामायण काळात जेव्हा राम सीतेसह लक्ष्मणाला घेऊन शंभू महादेवाच्या डोंगरावर आले, त्यावेळी सीतेला तहान लागली म्हणून लक्ष्मण पाणी आणण्यासाठी डोंगराखाली कुठे पाणी मिळते का ते पाहण्यासाठी गेला. तोपर्यंत त्या जागीच रामाने एक बाण जमिनीवर मारला आणि त्या ठिकाणातून पाण्याची धार वर आली. परंतु तोवर सीतेला ग्लानी आली. ती तिथेच झोपी गेली. हे पाहून रामाने एका द्रोणात ते वाहू लागलेले पाणी भरले आणि सीतेला दिसेल असे तिच्या डोक्यालगत ठेवले आणि तो लक्ष्मणाच्या शोधात निघून गेला. इकडे सीता जागी झाली अन्‌ अचानक तिच्या मानेचा धक्का त्या द्रोणाला लागला आणि द्रोण रिता झाला. सगळे पाणी सांडले, हे सांडलेले पाणी आजही अखंड एका प्रवाहाप्रमाणे वाहत आहे. हे वाहते पाणी म्हणजेच आपली माणगंगा नदी. सीता मातेच्या मानेच्या धक्क्यामुळे हे पाणी वाहिले म्हणून तिला माणगंगा असे नाव पडले.ही नदी आपल्या माणदेशाची गंगाच आहे.

या दोन चित्रांत नदीकाठचा माणेचा थर आणि माणगंगेचा प्रवाह दाखवला आहे.

माणगंगा नदीच्या खोऱ्यातील गावे[संपादन]

सातारा जिल्ह्यातील माण -दहिवडी (संपूर्ण तालुका) = ९१ गावे आणि वाड्या - वस्त्या तसेच म्हसवड नगरपालिका.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका संपूर्ण, ६२ गावे आणि वाड्या - वस्त्या.
कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, रायेवाडी, निमज, घोरपडी, शिंदेवाडी, दुधेभावी, चुडे खिंडी, कदमवाडी, घोलेवाडी, चोरुची, जांभूळवाडी आणि ढालगाव.
जत तालुक्यातील बेवनूर, नवलवाडी, शिंगणहळ्ळी, लोहगाव, अवंढी , मोकाशेवाडी, बागलवाडी, काशिलिंगवाडी, वाळेखिंडी, गुळवंची, प्रतापपूर, धावडवाडी, कोसारी, शेगाव, रेवनाळ, बनाळी, अंत्राळ, वायफळ, निगडी (खुर्द), अचकन हळ्ळी, तिप्पेहळ्ळी , बिरनाळ , हिवरे, कुंभारी , बागेवाडी , कंठी , वाशान, जत , पाळाल, रामपूर , खलाटी.
सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश सांगोला तालुका मात्र कटफळ, माहीम, महूद ,चिक महूद, खिलारवाडी, गायगव्हाण ही गावे वगळता उर्वरित गावे आणि वाड्या - वस्त्या.
मंगळवेढे तालुक्यातील मंगळवेढे गावठाण सोडून उरलेले शिवार तसेच मूढवी, धरणगाव, ढवळस, मल्लेवाडी, देगाव, घरनिकी, मारापूर, अकोले, गुंजेगाव, ममदाबाद (शे), लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव , गणेशवाडी , शिरसी, नंदेश्वर, गोणेवाडी, जुनोनी, खडकी , खुपसंगी, पाटकुळ, शेलेवाडी, लेंढवे - चिंचाळे.
पंढरपूर तालुक्यातील सरकोली, ओझेवाडी , नेपथगाव , तरटगाव , शिरगाव , एकलासपूर , सिद्धेवाडी , चिचुम्बे , तावशी , तनाळी , शेटफळ आणि खर्डी .
ही वरील सर्व गावे थेट माणगंगा नदीच्या पाणलोटात येतात.

माण मातीचे वैशिट्य[संपादन]

माणदेशाच्या भूमीचे वैशिष्ट्य म्हणजे इथली माती. ही माती माण माती या नावानेच प्रसिद्ध आहे. माणदेशातील सर्व ओढे किंवा माणगंगा नदी ही वर्षातून १० ते ११ महिने कोरडेच असतात. परंतु नदीकाठच्या किंवा ओढ्याकाठच्या ५०० फुटाहून अधिक भागातील विहिरींना उन्हाळ्यात सुद्धा पाणी असते. हे या माण मातीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या भागातील विहिरी सरासरी ६५ ते ७५ फूट खोल आहेत. या विहिरींत प्रथम २ ते १० फूट खोल करलाची माती चोपण किंवा क्षार माती लागते. त्याखाली मऊ माण ५ ते १५ फूट आणि त्याच्याही खाली १० ते २० फूट कठीण माण आणि नंतर अगदी खाली गेले तर चुनखड लागते. ही चुनखड अत्यंत कठीण असते, ती पहारेने अगर सुरुंगानेच फोडावी लागते. त्याखाली काळी रेती, जळक्या राखेसारखी राळ २ ते ८ फूट लागते. त्या खाली खडक लागतो. या खडकात मात्र पाणी नसते. या भागातील खडकात पाणी नसते तर माणमध्ये हमखास पाणी असते. हे ही वैशिष्ट्यच म्हणायचे.