चर्चा:भारतातील सामूहिक बौद्ध धर्मांतरांची यादी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:भारतातील बौद्ध धर्मांतरे या पानावरून पुनर्निर्देशित)

@संदेश हिवाळे: या लेखातील आकड्यांना पडताळणीयोग्य संदर्भ द्यावेत. विधाने व अतिशयोक्ती टाळावी ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:२१, ११ जून २०१८ (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी: आकड्यांना योग्य संदर्भ दिले आहेत. काही आवश्यक संदर्भ पुन्हा जोडेन. माझ्या परीने मी सुधार करणार आहे. कृपया, आपणही अतिशयोक्ती विधाने हटवून सहकार्य करा. --संदेश हिवाळेचर्चा ००:३८, १८ जून २०१८ (IST)[reply]


अमुक अमुक संख्येत दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला, ही बातमी होत नाही. पददलित नसूनही बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या बातम्या दिल्यास न्याय होईल. ... (चर्चा) १७:२५, ११ जून २०१८ (IST)[reply]

@: मला ज्ञात असलेल्या ज्यांनी ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे त्या सर्वांच्या नोंदी मी लेखात केल्या आहेत. मी यात दलित, पददलित किंवा अदलित असा भेद केलेला नाही. ओबीसींच्याही नोंदी दिल्यात आहेत. पददलित नसूनही बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या लोकांची माहिती उपलब्ध झाल्यास त्यांचा समावेश येथे नक्कीच करीन. कृपया, यासाठी आपणही सहकार्य करा.--संदेश हिवाळेचर्चा ००:३८, १८ जून २०१८ (IST)[reply]

'दलित' शब्दावरील बंदी[संपादन]

हायकोर्टांनी 'दलित' शब्द वापरायला बंदी केली असल्याने विकिपीडियाच्या सर्व पानांवरून दलित शब्द हटवावा. ... (चर्चा) २१:००, १३ जून २०१८ (IST)[reply]

@: आपण केलेले वरील विधान कोणत्या संदर्भाच्या आधारे केले आहे. न्यायालय निर्णय अवमान हा गंभीर मुद्दा आहे. तरी कृपया संदर्भ, दुजोरा द्यावा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३८, १४ जून २०१८ (IST)[reply]

मी लेखातील बातमीचा संदर्भ पाहिला. तसा दुवा जोडला. यासाठी अधिक विश्वसनीय मूळ स्रोत मिळवायला हवा असे वाटते.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:००, १४ जून २०१८ (IST)[reply]

@ आणि सुबोध कुलकर्णी: विकिपीडियावर 'दलित' या असंवैधानिक शब्दाला हटवून त्याऐवजी "अनुसूचित जाती" हा अधिकृत व संवैधानिक शब्द वापरला जावा, असे वाटते.--संदेश हिवाळेचर्चा ००:३९, १८ जून २०१८ (IST)[reply]

अप्रस्तुत मजकूर, पुनरावृत्ती[संपादन]

@संदेश हिवाळे:, हा लेख म्हणजे धर्मांतर घटनांची नोंद/यादी आहे. यात बाबासाहेब अांबेडकर लेखातील मजकूर पुन्हा तसाच आणण्याचे कारण नाही असे वाटते. सबब अप्रस्तुत मजकूर वगळला आहे.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:०६, २२ जून २०१८ (IST)[reply]


@सुबोध कुलकर्णी: हा लेख बौद्ध धर्मांतर घटनांची नोंद/यादी आहे पण याची प्राश्वभूमी किंवा मूळ बाबासाहेब आंबेडकरांचे सामूहिक बौद्ध धर्मांतर हे आहे. त्यामुळे याची नोंद मी लेखात केली होती, त्या मजकूरात सुधाराचे काम बाकी होते, त्याला संशिप्त स्वरूपात धर्मांतरांची प्राश्वभूमी म्हणून नोंदवायचे होते.
पाश्वभूमी हा विभाग बनवून त्यात धर्मांतराची पाश्वभूमी असावी, जी हटवलेल्या मजकूरातील काही आवश्यक भाग त्यात संशिप्त स्वरूपात असावा, असे वाटते. आपले मत?
--संदेश हिवाळेचर्चा १६:५१, २२ जून २०१८ (IST)[reply]

@अभय नातू:, संदेश हिवाळे हे तोच तोच मजकूर सर्व संबधित लेखात आणण्याचा वारंवार प्रयत्न करत आहेत. यात निष्पक्षपाती दृष्टीकोन या विकी तत्वाचे उल्लंघन होत आहे असे वाटते. कारण या मजकुरात मते, विधाने, विशेषणे यांचा बराच समावेश आहे. यासाठी नवयान, नवबौद्ध, नवबौद्ध चळवळ हे लेख पहा. हे ही पहा हा विभाग करण्याची तरतूद असताना अशी संपादने का करावीत?
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २२:३४, २९ जून २०१८ (IST)[reply]

या लेखात सामूहिक बौद्ध धर्मांतरांबद्दलच माहिती असावी. आंबेडकरांची पार्श्वभूमी असल्यास तसा उल्लेख करावा परंतु त्याबद्दलची विस्तृत माहिती (काहींच्या मते हे पाल्हाळ होऊ शकते) ठेवू नये.
हे बदल इतर ठिकाणीही करावे.
अभय नातू (चर्चा) २३:२४, २९ जून २०१८ (IST)[reply]

@अभय नातू: ठिक आहे. झालेल्या व सध्या होत असलेल्या बौद्ध धर्मांतरांना आंबेडकरांच्या सामुहिक धर्मांतराी पार्श्वभूमी आहेत, ही माहिती संशिप्त स्वरूपात नोंदवतो. --संदेश हिवाळेचर्चा ०९:२१, ३० जून २०१८ (IST)[reply]

योग्य पद्धत म्हणून सदर मजकूर आपल्या धूळपाटीवर हलवावा आणि काम करावे ही सूचना. मुळात हा मजकूर वर उल्लेख केल्याप्रमाणे निष्पक्षपाती दृष्टीकोन या विकी तत्वाचे उल्लंघन करतो हे तुम्हालाही मान्य असावे.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:१५, ३० जून २०१८ (IST)[reply]