चर्चा:भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेख/अथवा पानावर ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बद्दल चर्चा आणि सुयोग्य निर्णयासाठी साचा:उल्लेखनीयता लावला होता. सुयोग्य प्रचालकीय कारवाई नंतर साचा:उल्लेखनीयता साचा काढून त्या जागी साचा:उल्लेखनीयतासंपन्नचर्चा लावला जातो आहे. त्याचे वर्गीकरण वर्ग:ज्ञानकोशीय उल्लेखनीयता विषयक संपन्न चर्चा ने होते. लघुपथ साचा:उसंच

लेख वगळण्याची शिफारस करणार्‍याने जुन्या पुणे शहराच्या राजकारणाचा अभ्यास करावा , नानासाहेब देशमुख समाजातील एक प्रतिष्ठीत व्यक्तिमत्व होते सदरिल लेख वगळण्यास मज्जाव करावा ही विनंती


नुसतेच प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असले तरी ते पुरेसे नाही. जर लेखात भगवंतराव देशमुखांनी केलेल्या सामाजिक/राजकीय कार्याबद्दल माहिती नसेल, तर लेख वगळणेच योग्य....J (चर्चा) २३:५२, २७ डिसेंबर २०१४ (IST)

१. हा अभ्यास कोठे करावा हे कळवावे. तथापि त्या अभ्यासाच्या साधनांतील माहिती येथे संदर्भरूपाने द्यावी म्हणजे लेख वगळण्यास कारण उरणार नाही.
२. वर जे यांनी म्हणल्यानुसार प्रतिष्ठित व्यक्तिमत्तेबद्दल माहिती देण्यापेक्षा त्यांच्या कार्याबद्दल माहिती द्यावी नाहीतर वगळण्यामागील कारण उरतेच.
अभय नातू (चर्चा) ०१:४५, २८ डिसेंबर २०१४ (IST)

धन्यवाद[संपादन]

>>त्यांच्यामागे 3 मुले, सुना, 5 मुली, जावई व नातवंडे असा परीवार आहे.<<

ह्या माहितीबद्दल धन्यवाद! ... (चर्चा) ११:३४, २४ एप्रिल २०१५ (IST)

याचे पुरावे आहेत परंतु वारसांनी ते उघड करु नये असे सांगीतल्याने इथे देउ शकत नाही

लेख मजकुराचे विकिबाह्य-स्थानांतरण आणि लेख वगळणी[संपादन]

मराठी विकिपीडियावर एखादा लेख टिकुन राहण्यासाठी ज्ञानकोश म्हणून उल्लेखनीयतेचे निकष महत्वाचे ठरतात. कोणत्याही व्यक्ती बद्दल काही विशेषत्व दाखवल्या शिवाय ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्विकार्य ठरत नाही. हनुमाना सारखे भक्त स्वतःच देवता म्हणून स्वतंत्रपणे पुजले जातात, तर मंदिराच्या स्थापना/जिर्णोद्धार/दान-धर्म/देवालयातील पायरी इत्यादीवर नाव लिहून घेणार्‍या भक्तगणांची संख्य अगणीत असते काही जणांची एखाद ओळीतच मावेल एवढाच विश्वकोशिय मजकुर उपलब्ध होणार असतो. हनुमानाकरीता स्वतंत्र लेख बनवणे समजण्या सारखे आहे. हनुमानाच्या मंदीरांची शृंखला बांधवून घेणार्‍या समर्थ रामदास इत्यादी भक्तगणाकरिता स्वतंत्र लेख होऊ शकतील एवढा मजकुर असतो. पण अशा देवतांच्या पायरीवर नाव कोरुन घेणार्‍या व्यक्तींची भक्तीही विशेष असू शकेल परंतु १) इतर चारचौघांपेक्षा काही वेगळी नोंद होणे २) सहसा इतर माध्यमातून त्याची दखल घेतलेली असून तसा संदर्भ उपलब्ध असणे या निकषांना सर्वच भक्त पार करून ज्ञानकोशात स्थान मिळवू शकतील असे नाही.

काही वेळा काही व्यक्ती विशेषही असू शकतात की ज्याची ज्ञानकोशीय लेखक संपादकांना कल्पना असेलच असे नाही. पण अशी उल्लेखनीयता सिद्ध करण्याचा जिम्मा सर्वसाधारणपणे असे लेख तयार करणार्‍या व्यक्तीवरच सोडून अनुल्लेखनीय वाटणारे लेख सहसा वगळले जातात. श्री. भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख यांच्या बद्दल असाच एक लेख मराठी विकिपीडियावर आला इतर राजकारणी मंडळींपेक्षा काही विशेष उल्लेखनीयतेची नोंद उपलब्ध झाली तर कदाचित पुन्हाही मराठी विकिपीडियावर येऊ शकेल परंतु सद्य खाली दिलेल्या माहितीच्या आधारावरतरी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्विकार्य ठरत नाही आहे म्हणून सदर लेख मराठी विकिपीडियातून वगळून त्यांचे बद्दल मराठी विकिपीडियावर प्रकाशित माहिती इतर मराठी संकेतस्थळावर येथे स्थानांतरीत करीत आहे.

आपण इतरही मराठी संकेतस्थळेंचा मजकुर प्रकाशनार्थ विचार करु शकता परंतु मराठी विकिपीडियाच्या उल्लेखनीयता निकषात हा लेख सद्य स्थितीत तरी बसणे शक्य दिसत नाही. आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय वाचन लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:२५, २२ डिसेंबर २०१५ (IST)

कार्य विषयक अधिक माहितीची गरज[संपादन]

अलिकडे उपलब्ध केलेल्या संदर्भामुळे ते १९५१-५२च्या निवडणूकीत शेकापचे उमेदवार होते एवढीच ज्ञानकोशीय माहिती उपलब्ध होते आहे. जो पर्यंत त्यांच्या राजकीय आणि/अथवा सामाजिक कार्याचे अधिक माहिती ससंदर्भ उपलब्ध होत नाही तो पर्यंत लेखाचे ज्ञानकोशीय स्थान साशंकीत असेल. कदाचित १९६०च्या दशकातील शेकाप राजकारणी असा लेख बनवून हा लेख संक्षीप्त उल्लेखासहीत तिकडे विलीन करावा असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:०९, १८ मार्च २०१६ (IST)

श्री.माहीतगार हे पहा तुम्हाला लेख ठेवायचा नसेल तर तस कळवा परंतु सतत त्यात ढवळाढवळ करुण आपली व्रूत्ती दाखवु नका. राजकीय संदर्भ - त्यांचे कार्य साधारणपणे ६०-६५ वर्षांपुर्वीचे असल्याने आणी तो ग्रामीण भाग असल्याने माहीती मिळण्यास अडचण येत आहे , पण म्हणुन आपण त्यांचे कार्य संक्षिप्त रुपात मांडु नये. आणी विकिपीडिया साठी आपण काम करता आपण माझ्यामाहीती प्रमाणे पुणे शहरात बसुन काम करता लेखांचे मोजमाप करता असे दिसते आहे, संशोधन चालु आहे आपल्याला लवकरच सर्व पुरावे देऊ. आणी राजकीय माहीती कोणत्या स्वरुपात हवीये ते जरा कळवा म्हणजे आपणांस तशी माहीति देता येऊ शकते. स्वातंत्रोत्तर काळातील भोर आणी वेल्हा या परिसरातील ते प्रथम राजकीय नेत्रूत्व होते. त्यामुळे आपण थोडा धीर धरा आपणांस आवश्यक साहीत्य लवकर उपलब्ध करुन देऊ.