चर्चा:बॉम्बे (१९९५ चित्रपट)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:बॉम्बे (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)

कृपया या पानावर छायाचित्र टाकण्यास मदत करावी. मी देखील टाकण्याचा प्रयत्न केला परंतु का आले नाही समजले नाही. कृपया चित्र टाकावे व माझे कुठे चुकले ते मार्गदर्शन करावे.उदय कुलकर्णी (चर्चा) १८:३०, १५ जून २०१४ (IST)[reply]


यात तात्रीक कारण सुद्धा आहे आणि कॉपीराईट कायद्याचा संबंध सुद्धा. माझ्या अंदाजाने आपण इंग्रजी विकिपीडियावर वापरलेले छायाचित्र इकडे वापरू इच्छित होता. केवळ विकिमीडीया कॉमन्स या प्रकल्पातील छायाचित्रे कॉमन असतात आणि कॉपीराइटेड छायाचित्रे विकिमीडिया कॉमन्स अपवादाने सुद्धा घेत नाही. आपण वापरू इच्छित असलेले छायाचित्र इंग्रजी विकिपीडियावर उचीत उपयोग (फेअर यूज) सदराखाली वापरण्याचा प्रयत्न झाला असण्याची शक्यता वाटते. (विकिमीडिया कॉमन्सवर नसलेली इंग्रजी विकिपीडियातील छायाचित्रे जशीच्या तशी मराठी विकिपीडियावर वापरता येत नाहीत)
जिथे पर्यंत माझे कॉपीराईट कायद्याचे ज्ञान आहे विकिपीडियास उचीत उपयोग (फेअर यूज) अपवादाच्या तत्वाचा भारतीय कायद्या खाली कोणताही लाभ होत नाही असे उपयोग भारतीय कायद्यांनी मान्य नाहीत. कॉपीराईट कायद्याच्या संदर्भाने माझे मत मी वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे येथे मांडलेले आहे.
संबंधीत मूळ छायाचित्र मालकाशी संपर्क करून छायाचित्र वापराचा लेखी परवाना मिळत असेल तर ठिक नाही तर गिलास फोडा बारा आना वाली झंझट नको म्हणून अशा छायाचित्रांचा नाद सोडणे अधीक श्रेयस्कर.
आपणास आपल्या वाचन आणि लेखना साठी शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:३७, १६ जून २०१४ (IST)[reply]
आपण सांगितलेल्या माहितीबद्दल खूप धन्यवाद. उदय कुलकर्णी (चर्चा) १६:३८, १६ जून २०१४ (IST)[reply]