चर्चा:बाराखडी

    विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

    या लेखात मराठीत दीर्घ ॠ नाही असे लिहिले आहे, ते तितकेसे बरोबर नाही.ज्या अर्थी ऱ्हस्व ऋ हे ऱ्हस्व उच्चाराचे अक्षर आहे, त्या अर्थी दीर्घ उच्चाराचा ॠ तत्त्वत: असायला पाहिले. शब्दकोशांत हा दीर्घ ॠ असलेला शब्द सापडला नाही तरी, तसला शब्द काव्यात सापडतो. उदा०

    बहू शापिता कष्टला अंबषी । तयाचे स्वयें श्रीहरी जन्म सोशी ॥.
    ..(मनाचे श्लोक, श्लोक ११६वा)
    षी वचने ऐकोनी संतोषला सूतमूनी । बरवा प्रश्न केला म्हणोनी ॥ हर्षे उल्हासे ॥
    (श्री मुक्तेश्वर आख्यान अध्याय १, श्लोक १५वा)

    ऌ असलेले मराठी शब्द[संपादन]

    • ऌकार= ऌ हे अक्षर, किंवा त्या अक्षराचा उच्चार. हा उच्चार लि आणि लु यांच्या मधला उच्चार असतो.
    • कॣप्ती = युक्ती

    वरील शब्दांशिवाय संस्कृतमध्ये असलेले ऌ चे अन्य शब्द[संपादन]

    • ऌट्‌ = द्वितीय भविष्यकाळ
    • ऌङ्‌ = संकेतार्थ
    • शकॢ = शक्‌ या ४थ्या गणातील धातूला पाणिनीने दिलेले नाव. व्यंजनान्त एकावयवी धातूंपैकी जे १०२ धातू ’अनिट’ आहेत त्यांतला पहिला धातू. पहा : कारिकेतील पहिली ओळ-
    शकॢ पच्‌ मुचि रिच्‌ वच्‌ विच्‌ सिच्‌ प्रच्छि त्यज्‌ निजिर्भज
    • शाऌ = पहिल्या गणाच्या शाल्‌ (अर्थ खुशामत करणें) या धातूला पाणिनीने दिलेले नाव.
    • कॢप्‌ = एक संस्कृत धातू. अर्थ कल्पणें. वगैरे.

    संस्कृतमध्ये दीर्घ ॡ नाही(मराठीत आहे!) मात्र, संस्कृतमध्ये दीर्घ ॠ असलेले अनेक शब्द आहेत. भ्रातॄण(भावाचे कर्ज), पितॄण (पित्याचे कर्ज), धातू : ॠ =जाणें; कॄ = इतस्तत: फेकणें; स्‍तॄ = आच्छादणें, वगैरे.