चर्चा:फेसबुक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे पान फेसबुक लेखासंबंधी चर्चा करण्यासाठीचे चर्चा पृष्ठ आहे.

लेखन संबंधी नीती

फेसबुक हे कंपनीचे अधिकृत नाव आहे. त्यामुळे फेस बुक असे लेखनाव योग्य नाही.
Will do the redirect tomorrow unless there are some objections. क्षितिज पाडळकर (चर्चा) २३:५४, ११ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]


फेसबुक हे अधिकृत नाव आहे हे सर्वांना माहीत आहे, पण लेखाचे ते नाव नव्हते, तर फेसबूक असे होते. ’फेसबूक‘चे ’फेसबुक‘ करायला परवानगी मिळाली नाही, त्यामुळे फेसबुकशी सर्वात जवळचा शब्द म्हणून फेस बुक करावे लागले.

इंग्रजी शब्दाच्या स्पेलिंगमध्ये oo (डबल ओ)आला की त्या शब्दाच्या मराठी लिप्यंतरात दीर्घ ऊ करणे नेहमीच योग्य नसते.

पहा :

look=लुक; took=टुक; shook=शुक; hood=हुड; hook=हुक; Poona=पुणं, Coorla=कुर्ले; Coorg=कुर्ग; Ootuckmond=उटकमंड; foot=फ़ुट आणि book=बुक.

poor=पुअर; boor=बुअर; door=डोअर; floor=फ़्लोअर; flood=फ्लड; blood=ब्लड

या उलट, मराठीत दीर्घ ऊकार असला तर त्याचा इंग्रजीत अनेकदा oo(डबल ओ) होत नाही. कानपूर, जबलपूर, सोलापूर, बंगळूर, ऊर्मिला यांच्या स्पेलिंगमध्ये डबल ओ येत नाही. ...J (चर्चा) ००:५३, १२ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

’फेसबूक‘चे ’फेसबुक‘ करायला परवानगी मिळाली नाही, त्यामुळे फेसबुकशी सर्वात जवळचा शब्द म्हणून फेस बुक करावे लागले.
कुणाची परवानगी? स्थानांतरणाच्या पानावर हे स्थानांतरण करता आले नाही का?
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०१:२१, १२ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

जर एखादे शीर्षक नाव अयोग्य असेल किंवा पूर्वीच वापरले गेले असेल तर ते नाव शीर्षक म्हणून वापरण्यासाठी स्थानांतराची परवानगी मिळत नाही. फेसबुक या नावाबद्दल असेच काहीसे झाले आहे. ज्याला विकिपीडियाचे खास तांत्रिक ज्ञान असेल त्याने फेस बुक बदलून फेसबुक करावे. J (चर्चा) ११:३३, १२ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

ओह, ओके. अभिजीत यांनी योग्य ते स्थानांतरण केले आहे.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ११:५३, १२ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]