चर्चा:फायब्रॉइड्स
उतक हा शब्द मराठी कोशात सापडला नाही, हा कुठून आणला?...J १६:०९, २८ ऑगस्ट २०११ (UTC)
पेशीसमुहास उतक किंवा उती म्हणतात.
[संपादन]आंतरजालावर शोधले असता खालील शोध लगला- http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20110423/5131643736736707226.htm या स्थितीतून बाहेर निघण्यासाठीचा उपाय म्हणजे हलकी, दिर्घ व संतुलित श्र्वसनक्रिया होय जी प्राणायमाद्वारे प्राण करता येते. प्राणायामाद्वारे परानुकंपन क्रियाशील होते आणि उतक पुनरुद्भवनाची अवस्था प्राप्त केली जाऊ शकते.
माझी मराठी कच्ची असू शकते किंवा आमच्या कॉलेज मध्ये ही गोष्ट चुकीची शिकवली असतील.
सचिन १६:४५, २८ ऑगस्ट २०११ (UTC)
=पटले नाही
[संपादन]पेशीसमूह म्हणजे पेशींचा समूह. वनस्पती किंवा प्राण्यांचे शरीर हा एक पेशीसमूह आहे. म्हणजे उतक म्हणजे प्राण्याचे किंवा वनस्पतीचे शरीर?
हिंदीत ऊतक(ऊ दीर्घ) आणि मराठीत ऊती म्हणजे टिश्यू(म्हणजे स्नायूमधले तंतू). प्राणायामाने टिश्यूंचे पुनरुत्पादन होऊ शकते यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. हिंदीत ऊती शब्द नाही आणि मराठी त्या अर्थाचे उतक किंवा ऊतक हे शब्द नाहीत. त्यामुळे जिथे उतक आला आहे तिथे ऊती करणे भाग आहे.
दुसरे असे की या लेखात सर्व वर्णन गर्भाशयातील गाठींसंबंधी आणि त्याकरिता स्त्रियांनी करायच्या गोष्टींसंबंधी आहे, त्यामुळे लेखाचे नाव गर्भाशयातील गाठी असे करावे असे मला वाटते. अर्थात त्यासाठी लेखाच्या अगदी सुरुवातीला आलेल्या पुरुषांच्या फायब्रॉइड्सचे उल्लेख त्यांतील उतक या शब्दासकट गाळायला पाहिजेत.
इंग्रजीत d नंतर s आला, तर s चा उच्चार ज़ होतो, त्यामुळे फायब्रॉइड्स हा शब्द फ़ायब्रॉइड्ज़ असा लिहायला पाहिजे. लेखाचे नाव गर्भाशयातील गाठी असे केले की सर्व प्रश्न सुटतील. लेखात ड्स ऐवजी ड्ज़ करावे लागेल, पण ती किरकोळ गोष्ट आहे....J १९:१०, २९ ऑगस्ट २०११ (UTC)
अर्बुद
[संपादन]फायब्रॉइड् ला मराठीत अर्बुद असे नाव आहे. त्यामुळे या लेखाचे नाव अर्बुद असे करावे असे मला वाटते --Abhijeet Safai १९:४४, १ जानेवारी २०१२ (UTC)