चर्चा:प्राथमिक शाळा
विषय जोडा
कचरेवाडी ... नावावर जाऊ नका . नाव खोटं पण लक्षण मोठं ..
कचरेवाडी , तालुका मंगळवेढा ,जिल्हा सोलापूर .... एक १००/१२५ उंबऱ्याचं गाव.,मूळ रस्त्याच्या आडबाजूला , S T ची सोय नाही. (अर्थात हे मी ५०/५५ वर्षांपूर्वीची परिस्थिती सांगतोय ) असे गाव अचानक गेल्यावर्षी पेपरात आले आणि माझ्या आठवणी जागवल्या. कारण त्या गावाशी/शाळेशी माझे नाते होते.
गेल्या वर्षी त्या गावातून शिक्षण घेतलेला विद्यार्थी CA च्या परीक्षेत भारतात पहिला आला. मला अभिमान वाटला त्या शाळेचा ,तेथील शिक्षणाचा ,आणि शिक्षकांचा . कारण मी त्या शाळेत एक वर्ष होतो , त्यावेळी ते वर्ष महत्वाचे होते ,व्ह फा फायनल म्हणजे सातवी , बोर्डाची परीक्षा.
माझे गाव तिथून अडीच तीन मैलावर , आमच्या गावात चौथी पर्यंतच शाळा असल्याने आम्ही सर्वजण १०/१२ जण सातवीला कचरेवाडीला शाळेत जात होतो.
परीक्षेच्या साधारण एक दीड महिना आधी गुरुजींनी वर्गात आम्हा सर्वाना सांगितले ,' सोमवारपासून तुम्हाला फक्त एकदाच गावी जायला मिळेल . तुम्ही इथेच शाळेत रहायचं आहे ,तसे घरी सांगून या सोमवारी येताना अंथरून पांघरून घेउन या ,तुमची झोपायची सोय शाळेतच केली जाईल. सर्वानी इथेच अभ्यास करायचा आहे . फक्त शनिवारी घरी जाऊन सोमवारी परत यायचे आहे ,कुणीही कुठल्याही कारणाने शाळा 'बुडवायची' नाही .कारण आता परिक्षा जवळ आली आहे , 'आपल्या ' शाळेचा निकाल १०० टक्के लागला पाहिजे आणि तुम्ही सर्वजण चांगल्या मार्काने पास होऊन पुढे जावा "
आणि झाले , सोमवारपासून आम्ही शाळा सुटली कि शाळेच्या समोरच्या पटांगणात अर्धा एक तास खेळायचो तेवढ्यात गुरुजी घरून २०/२५ भाकरी आणि कालवण घेऊन यायचे आणि मग आम्ही सर्वजण ( गुरुजींसह ) मिळून जेवायचो. आणि अभ्यासाला बसायचो , गुरुजी आम्हा सर्वांसाठी चिमण्या आणि कंदील घेऊन यायचे ,सकाळी लवकर उठून आमच्यासाठी चहा घेऊन यायचे ,हे सर्व एक दोन दिवस नाही तर सतत एक दीड महिना चालू होते .नंतर परीक्षा केंद्र मंगळवेढ्यास ( म्हणजे तिथून पुढे दोन अडीच मैल) ,आम्हाला रोज बैलगाडीतून घेऊन जायचे , परत शाळेत आणायचे असे चार दिवस चालू होते इतके मनापासून शिकवल्यावर कोण शिकणार नाही ,अपेक्षेप्रमाणेच आमचा निकाल १०० टक्के लागला .
पण धन्य ते शिक्षक आणि धन्य ती शाळा. मी त्या शिक्षकांचा आणि शाळेचा जन्मभर ऋणी राहीन . शाळा ही ज्ञानाचे सागर आहे.
गुरुर देवो भव ।
जिल्हा परिषद केंद्र शाळा वेळूक. ता - मुरबाड , जि- ठाणे.
वेळूक केंद्र शाळा ही आज राज्यात ओळखली जाते. वेळूक केंद्र अंतर्गत " बुरसुंगे जि. प. शाळा" ही कृतीतून शिक्षण देणारी शाळा, ग्रामीण भागातील पहिली ISO प्रमाणित शाळा ठरली आहे. आज वेळूक केंद्राचा आणि बुरसुंगे शाळेचा जो मानसन्माण होत आहे त्याचे सर्व श्रेय जाते ते श्री सुपेकर सरांना. शाळा सुधारणेचे व्रत पाळणारे , विद्यार्थ्यांचे हित जोपासणाऱ्या सुपेकर सरांसारख्या असंख्य शिक्षकांची आज आपल्या देशाला गरज आहे.
वेळूक केंद्र शाळा देखील बुरसुंगे शाळेप्रमाणे नावारूपास यावी, यासाठी शाळेचे माजी विदयार्थी एकत्र येऊन काम करत आहेत. लोकवर्गणी आणि माजी विदयार्थी निधी यातून आज शाळा दुरुस्ती,डिजिटल शाळा, शाळेभोवती संरक्षक भिंत, शाळा पटांगनाचे सपाटीकरण आणि लादी बसवणे या कामांची पूर्तता लवकरच होणार आहे. येत्या महिनाभरात सुसज्ज आणि आधुकीन शाळा तयार होणार आहे.
सुधारणांच्या या विचारांचे श्रेय जाते ते आमचे गुरुजी श्री जयदीप देशमुख सर, श्री अनिल सुतार सर , श्री विजय डेरे सर. संगीत पवार मॅडम यांना. या सर्व शिक्षकांनी आम्हाला त्या काळात जे काही चांगले शिकवले, घडवले, जीवन मूल्य सांगितली,शिकवली ती आज आम्हाला आमच्या गावाशी, शाळेशी , आमच्या मातीशी घट्ट ठेवण्यास कारणीभूत ठरत आहेत .
दहा वर्षांपूर्वी शाळेचा पट ३०० पर्यंत होता तो आज ९८ पर्यंत आहे. यासाठी कारणीभूत ठरलेली काही कारणे म्हणजे शाळेची पडझड, शाळेकडे गावकऱ्यांचे दुर्लक्ष आणि महत्वाचे म्हणजे या काळात आलेल्या शिक्षकांची उदासीनता.. अवेळी येणे... नोकरी करायची म्हणून शाळेवर येणे ही घातक भावना. या सर्व गोष्टी संपवून आणि शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास लक्षात घेऊन शाळा सुधारणेची आणि आधुनिकरणाची जी गरज होती ती आज पूर्ण होत आहे.
आज गावात आम्ही ज्ञानसंवाद सार्वजनिक वाचनालय आणि स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु केले आहे. येथे कथा, कादंबऱ्या ,कविता संग्रह या अवांतर वाचन साहित्यासह सुमारे ५०० पुस्तके स्पर्धा परीक्षांची आहेत. आज वाचनालयात सुमारे १००० पुस्तके उपल्बध आहेत आणि हा साठा दिवसागणिक वाढणारा आहे.
ज्या प्रमाणे गावात वाचनालय आहे. त्याच प्रमाणे आमच्या शाळेत देखील वाचनालय आहे. येथे बालसाहित्याचा मोठा संग्रह उपलब्ध आहे .
Start a discussion about प्राथमिक शाळा
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve प्राथमिक शाळा.